Ranveer Singh : आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ चित्रपटाचा टीझर ‘या’

Shah Rukh Khan : …नाहीतर ‘चक दे इंडिया’मध्ये कोच कबीर खानच्या भूमिकेत ‘हा’ अभिनेता दिसला असता
‘चक दे इंडिया’ (Chak De India Movie) या बॉलिवूडच्या स्पोर्ट्स चित्रपटांपैकी सर्वोत्कृष्ट चित्रपट होता. इतकंच नव्हे तर अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) याच्या करिअरमध्येही या चित्रपटाचं फार महत्व आहे. रोमॅंटिक भूमिका साकारणाऱ्या शाहरुखची ही वेगळीच बाजू पाहून त्याचे चाहते अवाक् झाले होते. मात्र, चक दे इंडियातील कोच कबीर खानसाठी शाहरुख नाही तर दुसराच अभिनेता फायनल होणार होता. कोण होता तो जाणून घेऊयात…(Bollywood News)

२००७ मध्ये आलेल्या ‘चक दे इंडिया’ चित्रपटात शाहरुख खान याने भारताच्या महिला हॉकी टीमच्या प्रशिक्षकाची म्हणजेच कबीर खानची भूमिका निभावली होती. मात्र, आधी मेकर्सची पसंती शाहरुखला नाही तर सलमान खान याला होती. काही मिडिया रिपोर्टमध्ये असं सांगण्यात आलं आहे की, आधी सलमान ही भूमिका करणार होता मात्र त्याने तगडं मानधन मागितल्यामुळे हा प्रोजेक्ट घडू शकला नव्हता. (Entertainment update)

मात्र, सलमान खान (Salman Khan) याने स्वत:च ‘चक दे इंडिया’मध्ये काम का केलं नव्हतं याबद्दल एका मुलाखतीमध्ये खुलासा केला होता. सलमान मस्करीत म्हणाला होता की,”शाहरुख खानलाही काही चांगले चित्रपट मिळावेत म्हणून मी हा चित्रपट सोडला.’ त्यावेळी त्याची प्रतिमा कबीर खानसारख्या प्रशिक्षकाची भूमिका साकारण्याची नव्हती. चाहत्यांमध्ये हिरोकडून काही अपेक्षा असल्याने त्याने ‘चक दे इंडिया’ चित्रपट सोडला होता.
सलमान खान पुढे म्हणाला होता की, ”जेव्हा मला ‘चक दे इंडिया’ मिळाला तेव्हा मी पूर्णपणे वेगळा होतो, मी पार्टनर आणि त्या पद्धतीचे चित्रपट करत होतो. मी ‘चक दे इंडिया’ सोडण्याचे एकमेव कारण म्हणजे माझ्या चाहत्यांना मी भारतासाठी सामना जिंकवण्याची अपेक्षा होती. पण तेव्हा शारिरीक आणि चित्रपटांच्या चॉईसमधील तफावतीमध्ये हा चित्रपट घडला नाही”. (Salman Khan movies)
================================
हे देखील वाचा: Aamir Khan : ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ बॉलिवूडमधून एक्झिट घेणार?
=================================
पुढे सलमान खान म्हणाला की,”चक दे इंडिया’ हा एक गंभीर चित्रपट होता. हा एक गंभीर प्रकारचा चित्रपट होता आणि मी जास्त व्यावसायिक प्रकारचा चित्रपट करत होतो जो मी अजूनही करतो. मी कधीही व्यावसायिक चित्रपटांच्या क्षेत्रातून बाहेर पडणार नाही, परंतु व्यावसायिक क्षेत्रात बरेच चांगले चित्रपट लवकरच येतील.”(Bollywood Tadaka)

दरम्यान, शाहरुख खान याची प्रमुख भूमिका असणाऱ्या चक दे इंडिया चित्रपटाचं दिग्दर्शन शिमित अमीन यांनी केलं होतं. २००७ मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट ‘ओम शांती ओम’ (Om Shanti Om Movie) नंतर त्याच वर्षातील दुसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता. या चित्रपटात शाहरुखसह विद्या माळवदे, चित्राशी रावत, सागरिका घाटगे, तान्या अबरोल, शिल्पा शुक्ला, रिओ कपाडिया, अंजान श्रिवास्तव असे अनेक कलाकार झळकले होते. (Chal De India Movie Cast)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi