‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
शहीद: मनोजकुमारचा पहिला देशभक्तीपर चित्रपट!
देशभक्तीपर चित्रपट काढण्यामध्ये मनोज कुमार हे सर्वाधिक यशस्वी दिग्दर्शक आहेत असं म्हणावे लागेल कारण त्यांनी साठ आणि सत्तरच्या दशकामध्ये अनेक देशभक्तीपर चित्रपटातून हे वारंवार सिद्ध केले होते त्यांचा या जॉनरचा पहिला चित्रपट १९६५ साली आला होता. चित्रपटाचं नाव होतं ‘शहीद’(Shaheed). हा चित्रपट शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या जीवनावर आधारित होता. चित्रपट अतिशय अप्रतिम बनला होता.
या चित्रपटात वैशिष्ट्य म्हणजे या सिनेमाचे बरेचसे शूटिंग हे लुधियानाच्या तुरुंगात झाले होते जिथे ब्रिटिश काळामध्ये अनेक स्वातंत्र्यसैनिकांना करावास भोगला होता. या चित्रपटातील अनेक शॉट्समध्ये मनोज कुमार यांनी ॲक्च्युअल कैद्यांचा वापर केला होता. या चित्रपटाचे निर्मिती केवल कश्यप यांची होती ते मनोज कुमार यांचे मित्र होते. मनोज कुमार यांनी देखील या चित्रपटासाठी पैसा लावला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन एस राम शर्मा यांनी केले होते. परंतु संपूर्ण चित्रपटावर मनोज कुमारचा ठसा दिसतो त्यामुळे या चित्रपटाचे घोष्ट डायरेक्टर मनोज कुमारच होते.
या चित्रपटात शहीद भगतसिंग यांची भूमिका मनोज कुमार यांनी केली होती. राजगुरू यांची भूमिका प्रेम चोपडा यांनी तर सुखदेव यांची भूमिका अनंत मराठे या मराठी कलाकारांनी केली होती. चंद्रशेखर आझाद यांची भूमिका अभिनेता मनमोहन यांनी केली होती. कामिनी कौशल यांनी शहीद भगतसिंगच्या आईची भूमिका केली होती. या चित्रपटात प्राण यांनी डाकू केहेर संघ यांची एक वैशिष्ट्यपूर्ण भूमिका केली होती. खरं तर प्राण त्या काळातले लीडिंग ऍक्टर होते. त्यांची फीससुद्धा खूप जास्त असायची. परंतु या चित्रपटासाठी त्यांनी फक्त एक हजार रुपये मानधन घेतले. या चित्रपटाची शूटिंग लुधियानाला चालू होते. लुधियानामध्ये सर्व युनिट आणि क्रू मेम्बर्सचा संपूर्ण खर्च प्राण यांनी केला होता. जो जवळपास लाखभर रुपये होता. परंतु प्राण यांनी यातील एकही पैसाही निर्माते किंवा मनोज कुमार यांनी मागितला नाही! (Shaheed)
या चित्रपटातील गाणी आणि संगीत प्रेम धवन यांनी दिलं होतं. ऐ वतन ऐ वतन हम को तेरी कसम. मेरा रंग दे बसंती चोला, वतन पे मरने वाले जिंदा रहेगा तेरा नाम हि गाणी आजही देशभक्ती पात गीतांमध्ये आपलं वेगळं स्थान पटकावून आहेत. हा चित्रपट देशभक्तीने भारलेला होता. १ जानेवारी १९६५ रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री या चित्रपटाच्या प्रीमियरला आवर्जून उपस्थित होते.
सुरुवातीला केवळ दहा-पंधरा मिनिटं हा चित्रपट पाहीन असे ते म्हटले होते. परंतु त्यांना हा चित्रपट इतका आवडला की त्यांनी हा सिनेमा पूर्ण पाहिल्यानंतरच ते उठले. पंतप्रधानांना हा चित्रपट आवडला असे लक्षात आल्यानंतर मनोज कुमारने थिएटरवाल्याला इंटरव्यू करू नको असे सांगितल आणि सलग असा हा सिनेमा पंतप्रधानांना दाखवण्यात आला. या चित्रपटानंतरच पंतप्रधानांनी मनोज कुमार यांना सैनिक आणि शेतकरी या भारतातील दोन प्रमुख व्यक्तिरेखांवर चित्रपट निर्माण करा अशी सांगितले आणि दिल्लीच्या प्रीमियरवरून येतानाच ट्रेनमध्येच मनोज कुमार यांनी उपकार या चित्रपटाची कथा लिहून टाकली.
========
हे देखील वाचा : अभिनेता नसरुद्दीन शहा ‘या’ दिग्दर्शक सुभाष घई यांच्यावर का नाराज झाला?
========
या सिनेमाचा रिसर्च करण्यासाठी मनोज कुमार खूप मेहनत घेतली भारतातील सर्व ग्रंथालय पालथी घातली भगतसिंग यांच्या वकिलाची देखील त्यांनी घडी घेतली. चित्रपट अधिकाधिक परिपूर्ण कसा होईल आणि परिणामकारक कसा होईल याची त्यांनी काळजी मनोज कुमार यांच्या देशभक्तीपर चित्रपटाचा प्रारंभ याच सिनेमा पासून झाला. नंतर उपकार, पूरब और पश्चिम, क्रांती हे त्यांचे चित्रपट आले. ‘शहीद’ (Shaheed) या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. राष्ट्रीत एकात्मतेसाठीचा नर्गीस दत्त पुरस्कार देखील या सिनेमाला प्राप्त झाला. भारतीय स्वातंत्र्याच्या ६९ व्या वर्धापन दिनी १५ ऑगस्ट २०१६ रोजी हा चित्रपट देशभर पुन्हा दाखवण्यात आला. जाता जाता: यातील सुखदेव यांची भूमिका प्रेम चोपडा यांनी साकारली पण हि भूमिका आधी राजेश खन्नाला ऑफर झाली होती!