Prajakta Mali मुंबई सोडून चालली? अभिनेत्रीच्या पोस्टने चाहत्यांना बसला धक्का !

Last Stop Khanda: ‘शालू झोका दे गो मैना’, Prabhakar More यांची शालू आहे तरी कोण?
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या सुपरहिट कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या मनात घर करणारे अभिनेते प्रभाकर मोरे यांनी आपल्या वेगळ्या स्टाईलमुळे नेहमीच लोकप्रियता मिळवली आहे. त्यांच्या प्रत्येक अभिनयाने आणि हावभावाने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले आहे. अलीकडेच त्यांच्या ‘शालू झोका दे गो मैना’ या गाण्याने संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घातला होता. हे गाणं सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं आणि लोकांच्या तोंडी तोंडी झळकू लागलं. प्रेक्षकांना मात्र एकच प्रश्न सतावत होता की, “प्रभाकर मोरेंची शालू नेमकी कोण?” याच प्रश्नाचं उत्तर अखेर आता मिळालं आहे. नुकतंच रिलीज झालेल्या ‘लास्ट स्टॉप खांदा’ या आगामी मराठी चित्रपटातून हे गाजलेलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. खास बाब म्हणजे या गाण्यात प्रभाकर मोरेसोबत लोकप्रिय अभिनेत्री धनश्री काडगावकर झळकली आहे आणि तीच म्हणजे प्रेक्षकांना अनेक दिवस वाट पाहायला लावणारी “शालू”!(Last Stop Khanda)

हे गाणं खूपच रंगतदार पद्धतीने सादर करण्यात आलं आहे. प्रभाकर मोरे त्यांची खास हुक स्टेप करताना दिसत असून धनश्रीसोबतची त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना नक्कीच भावणार आहे. गाण्याला प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांचा दमदार आवाज लाभला आहे. गीतकार श्रमेश बेटकर यांनी शब्दबद्ध केलेलं हे गाणं आणि संगीतकार किशोर मोहिते यांचं संगीत यामुळे गाणं अजूनच प्रभावी झालं आहे.

‘लास्ट स्टॉप खांदा… प्रत्येकाच्या प्रेमाची गोष्ट’ या टॅगलाईनसह येणाऱ्या या चित्रपटात एक वेगळी म्युझिकल लव्हस्टोरी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. २१ नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमाची चर्चा सध्या जोमात सुरू आहे. या चित्रपटात श्रमेश बेटकर, जुईली टेमकर, निखिल बने, मंदार मांडवकर, शशिकांत केरकर, सुदेश जाधव, महेश काप्रेकर आणि प्रियांका हांडे यांच्यासारख्या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. यासोबतच प्रभाकर मोरे, धनश्री काडगावकर आणि अशोक ढगे हे पाहुणे कलाकार म्हणून प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का देणार आहेत.(Last Stop Khanda)
===========================
===========================
चित्रपटातली गाणी, नृत्यदिग्दर्शन आणि संगीतमय सादरीकरण ही सगळीच बाजू खूप आकर्षक बनवण्यात आली आहे. नृत्यदिग्दर्शनाची जबाबदारी राहुल बनसोडे आणि रवी आखाडे यांनी पार पाडली आहे. गाण्याचं आकर्षण इतकं आहे की येत्या काही दिवसांत संपूर्ण महाराष्ट्र “शालू झोका दे गो मैना” म्हणत थिरकणार यात शंका नाही. ‘लास्ट स्टॉप खांदा’ या सिनेमातून प्रेक्षकांना प्रेम, मैत्री आणि नातेसंबंधांची एक आगळीवेगळी गोष्ट अनुभवायला मिळणार आहे. त्यात प्रभाकर मोरे आणि धनश्री काडगावकरची जोडी प्रेक्षकांसाठी मोठं आकर्षण ठरणार आहे.