दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
शम्मीकपूर आणि लता मंगेशकर यांनी विमानप्रवासात एकत्र गायलं हे गाणं
आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असे काही क्षण असतात जे आयुष्यभर आपण जपून ठेवतो. त्या सुरील्या आनंदाच्या प्रसंगाच्या आठवणीने आपलं मन पुन्हा पुन्हा प्रफुल्लित होत असतं. आयुष्यभर मोरपिसासारखं ती आठवण आपण जपून ठेवत असतो. अशा घटना प्रत्येकाच्या आयुष्यातच घडत असतात आणि जर त्याच कलावंताच्या आयुष्यात जर घडत असतील तर त्याला वेगळी खुमारी येते. ख्यातनाम अभिनेते शम्मी कपूर यांनी आपल्या ‘शम्मीकापूर अनप्लगड…’ या कार्यक्रमातून अशाच काही आठवणी एका व्हिडिओमध्ये शेअर केल्या होत्या. त्यातलीच ही एक सुरीली आठवण. (Song)
ही घटना आहे सत्तरच्या दशकातील. तेव्हा शम्मी कपूर आणि त्यांची पत्नी नीला देवी दिल्लीहून मुंबईला फ्लाईटने येत होते. एक्झिक्युटिव्ह क्लासमध्ये फारशी गर्दी नव्हती. ते हिवाळ्याचे दिवस होते त्यामुळे सगळीकडे वातावरणात गुलाबी गारवा पसरला होता. शम्मी कपूर आणि त्यांची पत्नी ब्लॅंकेटच्या उबदार पांघरुनाथ कॉफीचे घोट घेत होते. त्या मन उल्हासित करणाऱ्या वातावरणात शम्मी कपूरने गायला सुरुवात केली. शम्मी कपूरला संगीताची खूप आवड होती. त्यामुळे त्याने एक गाणं गायला सुरुवात केली. गाण्याचे बोल होते ‘बहे आंखियो से धार करे जिया बेकरार…’ ही ओळ त्याने गायली. आणि लगेच त्यांना याच ओळीचा एक प्रतिध्वनी एका गोड स्त्रीच्या स्वरात ऐकू आला. शम्मी कपूर त्या आवाजाने अतिशय मंत्रमुग्ध झाले. इतका गोड, इतका सुरीला आणि इतका मंजुळ स्वर कोण गात होतं? कानात साठवून घ्यावा असा हा स्वर होता. शम्मी कपूरला आश्चर्य वाटलं. माझ्या गाण्याला (Song) कोण इतका गोड प्रतिसाद देत आहे? म्हणून ते आपल्या सीटवर उठून उभे राहिले.
तर त्यांच्या समोरच्या सीटवरीलच एक स्त्री ते गाणं (Song) गात होती. त्यांना प्रचंड आश्चर्य वाटलं. तितक्यात त्या स्त्रीने मागे वळून पाहिलं आणि म्हटले,” क्यूं शम्मी भैया मजा आ रहा है ना..?” आता थक्क होण्याची पाळी शम्मी कपूरची होती. कारण ती स्त्री दुसरी तिसरी कोणी नसून स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर होती. बाप रे! माय गॉड! शम्मी कपूरच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता त्यांच्या आनंदाला पारावर राहिला नाही. आपल्या स्वराला, गाण्याला प्रतिसाद चक्क लता मंगेशकर देत आहे हे पाहून खूप आनंद झाला. हे गाणं होतं लतानेच गायलेलं ‘हमलोग’ या १९५१ साली प्रदर्शित झालेल्या सिनेमातील ‘बहे आंखियो से धार मेरा जिया बेकरार सुनो सुनो दिलदार जाओगे कहां दिल तोडके…’ मग काय या दोघांची जुगल बंदीच सुरू झाली. कितीतरी जुनी गाणी हे दोघेच चढाओढीने म्हणू लागले.
शम्मी कपूर गाणं (Song) सुरू करायचा.. लता मंगेशकर ते पूर्ण करायची. लता पुन्हा एक नवीन गाणं सुरू करायची शम्मी त्याला दुजोरा द्यायचा. कितीतरी सुरील्या आठवणी यातून निघायच्या. लता त्या गाण्याच्या (Song) मेकिंगची गोष्ट सांगायची. शम्मी कपूर भक्ती भावना त्या ऐकायच्या. मग शम्मी एखादी ओळ म्हणून दाखवायचा. लता त्याला पूर्ण करायची. जवळपास एक तास त्यांची ही मैफल चालली.
शम्मी कपूरची पत्नी हा सर्व प्रकार मोठ्या आनंदाने पाहत होती. ती म्हणाली,” आपल्याकडे खरंतर आता टेप रेकॉर्डर पाहिजे होता या क्षणाला मी साठवून ठेवणार होते!” नंतर शम्मी कपूर आणि लता मंगेशकर सज्जाद हुसेन यांच्या ‘सैय्या’ या चित्रपटातील एक गाणं गाऊ लागले. ‘काली काली रात रे दिल बडा सताये तेरी याद आये..’ हे गाणं नितांत सुंदर होतं. शम्मी कपूरने या व्हिडीओत सांगितले “माझ्या डोळ्यातून अक्षरशः अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर सोबत आपण गात आहोत हे माझं मन मानायला तयारच नव्हतं माझ्या आयुष्यातील ही अतिशय सुरीली आणि आयुष्यभर जपून ठेवावी अशी ही रम्य आठवण आहे!” (Song)
=========
हे देखील वाचा : किस्सा शम्मी कपूरच्या पहिल्या वहिल्या कारचा!
=========
अर्थात प्रत्येक चांगल्या गोष्टीला हा शेवट असतोच. विमान मुंबईला पोहोचलं आणि त्यांची सुरीली मैफिल संपली. विमानातून उतरताना लता शम्मी कपूरला म्हणाली,” शम्मी भैय्या, खूप मजा आली. आपण पुन्हा एकदा असंच कधीतरी भेटून ही गाण्यांची मैफल अशीच पुन्हा एकदा रंगवू.” पण दुर्दैवाने असला सुरीला क्षण परत कधी आलाच नाही!