Ashok Saraf : ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने अशोक सराफ यांच्याशी अनेक

Shammi kapoor: ‘या’ मुलींनी शम्मी कपूरचे फुटबॉल करीअर संपुष्टात आणले?
अभिनेता शम्मी कपूर (Shammi Kapoor) हा हँडसम तर होताच पण त्याचा किलिंग लूक अनेक तरुणींचे हृदय त्या काळात घायाळ करून जात असे. कपूर खानदानीतले सर्वच कमालीचे देखणे होते. गुलाबी गोरेपण, दमदार उंची आणि नजरेतील किलिंग लूक (नजर बचाकर चले गये वो वरना घायल कर देता…)
पण तरुणपणी या शम्मी कपूरचे हृदय एकदा एका फुटबॉल सामन्याच्या वेळी दोन मुलीकडून घायाळ झालं होतं… साफ क्लीन बोल्ड! आणि शम्मी कपूरमुळे त्याची टीम ती मॅच अतिशय वाईट पद्धतीने हरलं होतं!! पराभवाचे सारं खापर शम्मी कपूर (Shammi Kapoor) च्या डोक्यावर फोडलं गेलं आणि त्याला टीममधून चक्क हाकलून देण्यात आलं. त्याच्या फुटबॉल कोचनी त्याला वॉर्निंग दिली की, ”यापुढे जर फुटबॉलच्या ग्राउंडच्या जवळ जर दिसलास तर याद रख!” शम्मी कपूर अशाचे शालेय जीवनातील फुटबॉल करीअर अशा रीतीने अकाली संपुष्टात आलं. अर्थात पुढे कॉलेजला गेल्यानंतर पुन्हा फुटबॉल सुरू झालं पण शाळेतील फुटबॉलचा अंत त्या दोन मुलींमुळे झाला होता हे नक्की. शम्मी कपूरने एका व्हिडिओ मॅक्झिनला दिलेल्या मुलाखतीत स्वतःच हा किस्सा सांगितला होता.

त्यावेळी शम्मी कपूरचे वय चौदा-पंधरा वर्षे असेल. तरणाबांड गोरा चिट्टा गबरू जवान. पौगंडावस्थेतील वय. रक्तातील बंडखोरी. शम्मी कपूर (Shammi Kapoor) मुलींसाठी एक लवर बॉय होता. चॉकलेट हिरो होता. स्पोर्ट्समध्ये देखील त्याला प्रचंड आवड होती. फुटबॉल त्याचा आवडता खेळ. या खेळात तो गोलकीपर असायचा. मुंबईच्या डॉन बॉस्को स्कूलमध्ये त्यावेळी तो शिकत होता. शाळेच्या फुटबॉल टीमचा सामना माटुंग्याच्या जिमखाना ग्राउंडवर होता. हा सामना अंतिम सामना होता. या सामन्यासाठी सर्व खेळाडूंनी जीवापाड मेहनत घेतली होती. शम्मी कपूरवर सर्वात जास्त भिस्त होती कारण तो गोलकीपर होता. सर्व जण त्याच्या कामगिरीकडे लक्ष ठेवून होते. फुटबॉल कोचचे तर त्याच्याकडे विशेष लक्ष होते.
अंतिम सामन्याचा दिवस आला. सर्व जण फुटबॉलचे कपडे घालून मैदानात उतरले. वॉर्म अप झाल्यानंतर खेळ सुरू झाला. शम्मी कपूर (Shammi Kapoor) गोलकीपर होता. त्याच्या डाव्या बाजूच्या स्टैंडवर पहिल्या रांगेमध्ये दोन सुंदर मुली बसलेल्या होत्या. त्यांनी शम्मी कपूरची तारीफ केली. उठून त्याला चिअर अप केले. शम्मी भलताच सुखावला. नंतर त्या मुलींनी ‘हाय हँडसमsss’ म्हणून त्याला फ्लाईंग किस देखील दिला! आता शम्मीची विकेटच गेली. दोन दोन सुंदर मुली त्याच्याकडे पाहून लाडे लाडे काय बोलतायत फ्लाइंग कीस काय देतात… शम्मी कपूर पहिल्यापासूनच थोडा लेडीकिलर होता. त्या दोन घाऱ्या डोळ्यांच्या मुलींनी त्याच्यावर जादू केली. त्या शम्मी कपूरकडे पाहून वारंवार कमेंट्स करत होत्या.

या सर्व हसीन माहौलमुळे शम्मी कपूरचे लक्ष फुटबॉल वरील उडाले आणि थेट पहिला गोल झाला!! शम्मीला तो सोपा गोल अडवता नाही आला कारण त्याचे लक्ष खेळात होतेच कुठे? तो त्या तरुणींच्या नेत्र कटाक्षानी घायाळ झाला होता. शम्मी कपूर (Shammi Kapoor) चे लक्ष वारंवार त्या मुलींकडे जात होते. नजरेची भाषा सुरू झाली होती. या सर्व प्रकारांमध्ये तब्बल सात गोल शम्मी कपूरच्या टीमवर झाले आणि या सर्व प्रकाराला गोलकीपर म्हणून तो जबाबदार होता. शून्य- सात असा दणदणीत पराभव झाला!
============
हे देखील वाचा : Motilal : विस्मृतीत गेलेला गुणी अभिनेता
============
या दणदणीत पराभवानंतर सर्वांनी शम्मी कपूरला धारेवर धरले. कोच तर शम्मी कपूरकडे दात ओठ खाऊन धावून आला आणि त्याला धमकी दिली, ”तुझ्या मूर्खपणामुळे आपण ही मॅच हरलेलो आहोत. उद्यापासून या ग्राउंड वर पाय ठेवला तर बघ. तुला या टीममधून मी आताच काढून टाकत आहे.” पण शम्मी कपूर (Shammi Kapoor) ची नजर मात्र प्रेक्षकांमध्ये त्या मुलींना शोधत होती. त्या मुली मात्र त्याला आयुष्यात पुन्हा कधीच भेटल्या नाहीत. कदाचित प्रतिस्पर्धी टीमने मुद्दाम शम्मी कपूरच्या टीमला हरवण्यासाठी या मुली पाठवल्या होते की काय असा विचार पुढे त्याच्या मनात येऊ लागला पण दोन घाऱ्या डोळ्यांच्या मुलींनी शम्मी कपूरचे शालेय फुटबॉल जीवन संपुष्टात आणले हेच खरे! शम्मी कपूरने एका व्हिडिओमध्ये दिलेल्या एका इंटरव्यूमध्ये हा किस्सा खूप मजेदारपणे सांगितला होता.