Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    sulochana chavan

    Sulochana Chavan : हिंदी चित्रपटातील लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचा स्वर!

    Dosti

    Dosti : मैत्रीच्या नात्याची भावस्पर्शी संगीतमय कहाणी!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Jr NTR : दादासाहेब फाळकेंच्या भूमिकेत दिसणार RRRचा सुपरस्टार; राजामौली

Amitabh Bachchan : बच्चन यांच्या कुठल्या गाण्यावर राजेश खन्नांनी सडकून

Amir Khan : दादासाहेब फाळके यांच्या बायोपिकसाठी आमिर-हिरानी पुन्हा एकत्र!

Criminal Justice 4: माधव मिश्रा इज बॅक; ट्रायअॅंगल मर्डर मिस्ट्री

Madhuri Dixit : माधुरीला अभिनयात नाही, तर ‘या’ गोष्टीत करायचं

Madhuri Dixit : २३ वर्षांपूर्वी आलेल्या ‘त्या’ चित्रपटातील गाणं शुट

Gulkand : बॉक्स ऑफिसवर सई-प्रसादच्या ‘गुलकंद’चा गोडवा!

PSI Arjun Marathi Movie: ‘पी.एस.आय. अर्जुन’ चित्रपटाच्या ‘प्रमोशनल साँग’चा व्हिडीओ प्रेक्षकांच्या

Banjara Marathi Movie: ‘भावनांची भटकंती’, ‘बंजारा’ सिनेमाचे टायटल साँग प्रदर्शित…

Mahavatar Narsimha Movie: नृसिंह जयंतीनिमित्त ‘महावतार नरसिंह’च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर; ‘पाच भाषणांमध्ये

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Shammi Kapoor : शम्मी कपूर मधुबालावरील (एकतर्फी) प्रेमात अक्षरशः पागल झाला होता!

 Shammi Kapoor : शम्मी कपूर मधुबालावरील (एकतर्फी) प्रेमात अक्षरशः पागल झाला होता!
बात पुरानी बडी सुहानी

Shammi Kapoor : शम्मी कपूर मधुबालावरील (एकतर्फी) प्रेमात अक्षरशः पागल झाला होता!

by धनंजय कुलकर्णी 28/04/2025

अभिनेता शम्मी कपूर (Shammi Kapoor) हिंदी सिनेमाच्या पडद्यावर पहिल्यांदा झळकला १९५३ सालच्या ‘जीवन ज्योती’ या चित्रपटात.  या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश कौल यांनी केले होते तर त्यांची नायिका चांद उस्मानी होती. (या चित्रपटाची कथा ग दि माडगूळकर यांनी लिहिली होती) हा चित्रपट निर्मिती अवस्थेत असतानाच शम्मी कपूर यांनी दुसरा चित्रपट साइन केला. हा चित्रपट होता ‘रेल का डीब्बा’ या चित्रपटाचे दिग्दर्शक पी एन अरोरा होते तर या चित्रपटात त्याची नायिका होती रूपसुंदरी मधुबाला! शम्मी कपूरने मधुबालाला पहिल्यांदा जेव्हा पाहिले तर तो पाहतच राहिला!  कारण त्याच्या मते इतकी देखणी मुलगी त्याने यापूर्वी कधीच पाहिली नव्हती. (actress Madhubala)

शम्मी  कपूर तिच्या सौंदर्याने अक्षरश: मोहित झाला , पागल झाला होता.  तिला पाहताना तो आपले डायलॉग बोलायचे विसरून जात होता बोलताना त्याच्या घशाला कोरड प्पडत होती.  रात्रंदिवस आता आता तो फक्त मधुबाला चाच  विचार करायचा. त्याने एका व्हिडीओ मॅगझीन ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले “ दिवस रात्र तिचाच चेहरा डोळ्यापुढे यायचा. रात्र रात्र झोप लागत नसे!”  शम्मी मधुबालाच्या  प्रेमात पडला होता.  त्याला ठाऊक होते की त्यावेळी मधुबाला आणि दिलीप कुमार यांच्या प्रेम प्रकरणाची चर्चा त्या काळात जोरात होती त्याचप्रमाणे अभिनेता प्रेमनाथ हा देखील मधुबाला वर जीव टाकत  होता.  हे दोघे तिच्यावर प्रेम करत असताना आपला नंबर लागणार की नाही याची त्याला खात्री नव्हती पण तरीही तो तिच्यावर मनापासून प्रेम करत होता.  आणि त्या प्रेमाच्या भरातच एकदा त्याने लंच टाईम मध्ये मधुबाला चक्क प्रपोज देखील केले.  (Untold story)

मधुबाला त्यावेळी इस्टॅबलिस्ट आर्टिस्ट होती.  वयाने जरी शम्मी पेक्षा लहान  असली तरी अभिनयाच्या क्षेत्रातील तिला पाच-सात वर्षे  झाली होती.  तिने शम्मी कपूरचे प्रपोजल तिने हसण्यावारी  नेले. त्या कडे एका अर्थाने दुर्लक्ष केले. शम्मी कपूरला मात्र ते खूप खटकलं. मनातल्या मनात तो खूप दुःखी झाला. घरी गेल्यानंतर तो आपल्या आईच्या कुशीत जाऊन ढसाढसा रडला आणि त्याने झालेला प्रकार सर्व सांगितला.. आईने शम्मी कपूरची समजूत काढली आणि तिने सांगितले,”  मधुबाला एक प्रस्थापित अभिनेत्री आहे. ऑलरेडी तिच्या आणि दिलीप कुमारच्या प्रेमप्रकरणाची चर्चा चालू आहे. (Entertainment masala)

दुसरे महत्त्वाचे म्हणजे तिच्यापुढे तू सध्या तरी कोणीच नाहीस आणि तिसरे महत्त्वाचे कारण तिचा आणि आपला धर्म वेगळा आहे. दोघांच्या  घरून या लग्नाला परवानगी मिळणार नाही त्यामुळे तिचा विचार सोडून आपल्या करीअर कडे लक्ष देणे जास्त योग्य ठरेल!” शम्मी कपूर तेंव्हा अवघा एकवीस वर्षाचा होता. आईचे समजुतीचे बोल कामी आले. मधुबाला वरील प्रेम (की आकर्षण?) विसरणं सोप्प नव्हतं.  बडी मुश्किल से दिल की बेकरारी को करार आया…  (Bollywood news)

==============

हे देखील वाचा : Madhubala : दिलीप कुमार – मधुबालाची अधुरी प्रेमकहाणी!

==============

शम्मी  कपूरने आपल्या आईचे बोल मनावर घेतले आणि चित्रपट पूर्ण केला आणि आपल्या करिअर कडे लक्ष द्यायला सुरुवात केली.  पण शम्मी कपूरचा पहिला क्रश मधुबाला होती हे निश्चित पुढे अनेक वर्षांनी एका व्हिडिओ मॅगझीनला मुलाखत देताना शम्मी कपूर हा संपूर्ण किस्सा सांगितला होता. शम्मी कपूरचा पहिला हिंदी सिनेमा १९५३ साली  आला. पण पहिले पाच सात वर्षे त्याला अजिबात यश मिळाले नाही. (entertainment tadaka)

ओळीने तब्बल १८  सिनेमे फ्लॉप झाले. हे सिनेमे होते ‘जीवन ज्योती’, ‘रेल का डीब्बा’, ‘ठोकर’, ‘लैला मजनू’, ‘गुल सनोबर’ ,’शमा परवाना’, ‘चोर बाजार’, ‘मेहबूबा’, ‘अहसान’,’साहिल’, ‘टांगा वाली’, ‘मिस कोका कोला’, ‘नकाब’, ‘डाकू’, ‘सिपाह सला’,’रंगीन राते’, ‘में साहिब’, ‘हम सब चोर है’….. १९५७  चा नासिर हुसैन दिग्दर्शित ‘तुमसा नही देखा’ या चित्रपटापासून तो क्लिक झाला आणि त्याला यश मिळू लागले! शम्मीकपूर आणि मधुबाला नंतर ‘बॉयफ्रेंड’ आणि ‘नकाब’ या सिनेमात एकत्र आले होते. (Bollywood flop old movies)

धनंजय कुलकर्णी : बात पुरानी बडी सुहानी

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bollywood Chitchat bollywood hit couple Bollywood News Entertainment Featured Madhubala News shammi kapoor trending
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.