Dashavatar चित्रपटाने हिंदी-साऊथलाही दिली टक्कर; २१ दिवसांत कमावले ‘इतके’ कोटी!

“देवा जर कुठलीही चुक झाली तर तुला माफ करणार नाही”; Priya Maratheच्या आठवणीत शंतनुची पोस्ट
मराठी नाट्य, मालिका आणि चित्रपटविश्वातील हरहुनन्री अभिनेत्री प्रिया मराठे (Priya Marathe) हिचं वयाच्या ३८ व्या वर्षी कॅन्सरमुळे निधन झालं… अभिनेता शंतनु मोघे याची प्रिया पत्नी… इंडस्ट्रीतील हॅपी कपलच्या यादीत यांचं नावं होतंच.. परंतु, दुर्दैवाने प्रियाचा अंत झाला… या काळात प्रियाची साथ तिच्या नवऱ्याने अर्थात शंतनुने दिलीच… आपलं करिअर बाजूला ठेवून तो तिच्यासोबत खंबीरपणे उभा होता… आणि आता प्रियाच्या निधनाला १ महिना उलटून गेल्यानंतर त्याने सोशल मिडियावर तिच्यासाठी एक खास भावनिक पोस्ट केली आहे… (Marathi Entertainment news)
शंतनू मोघेने (Shantanu Moghe) तिच्या आठवणीत एक पोस्ट शेअर करीत तिच्याबरोबरचे काही गोड फोटो शेअर केले आहेत. यावेळी त्याने पोस्टला कॅप्शन देत त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. प्रियाबरोबरचे फोटो शेअर करीत त्याने लिहिलं आहे की, “ही खूप खास पोस्ट आहे. मला सगळ्यांचे आभार मानायचे आहेत; ज्यांनी व्हॉट्सॲप, मेल, इन्स्टाग्राम, फेसबुक यांसारख्या विविध प्लॅटफॉर्मवरून प्रियाबद्दलच्या भावना व्यक्त केल्या. त्यासाठी मी मित्र-मैत्रिणी, कुटुंबीय आणि सगळ्या चाहत्यांचा खूप आभारी आहे.”

शंतनू मोघे पुढे म्हणाला की, “आज एक महिना झाला; पण हे वैयक्तिक दु:ख शब्दांत मांडता न येण्यासारखं आहे. प्रियाचं जाणं खूप अनपेक्षित, त्रासदायक, अयोग्य व दु:खद होतं. तिच्या जाण्यानं आपल्या सगळ्यांना खूप दु:ख झालं. पण, तिनं तिच्या प्रेमळ, समजूतदार स्वभावानं अनेकांची मनं जिंकली होती. या कठीण काळात आमच्याबरोबर खंबीरपणे उभं राहिल्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद! (Shantanu Moghe post for Priya Marathe)
================================
हे देखील वाचा : Shantanu Moghe : “काम करत राहणं हिच माझी प्रियाला श्रद्धांजली”
=================================
शंतनू मोघे देवाला उद्देशून म्हणाला, “देवा तिची काळजी घे, तिच्यावर प्रेम कर आणि जर कुठलीही चुक झाली तर तुला माफ करणार नाही.” शेवटी प्रियाला उद्देशून त्याने लिहिले माय ऐंजल पुन्हा भेटू…. असं म्हणत या पहिल्यांदाच प्रियाच्या निधनाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तसेच, प्रियाच्या निधनानंतर काही दिवसांनी शंतनू मोघेने काम करायला सुरुवात केली. सध्या तो ‘स्टार प्रवाह’वरील ‘येड लागलं प्रेमाचं’ मालिकेत मंजिरीचा मोठा भाऊ शंतनू ही भूमिका तो साकारत आहे..
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi