Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Bigg Boss Marathi 6 च्या घरात होणार Abhijit Bichukale ची

मराठमोळ्या Tejaswi Prakash ने मुंबईत घेतलं अलिशान घर, किंमत ऐकून तुम्हाला

Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam Ott Release: क्रांतीज्योतीची पोरं आता OTT ही

Nutan : ‘चंदन सा बदन चंचल चितवन..’; गाण्याच्या मेकिंगची भन्नाट

Geetu Mohandas : ४ पुरुष दिग्दर्शकांना भिडणार १ स्त्री दिग्दर्शिका;

Big Boss Marathi : “रेशमताईच्या बेडजवळ रोज कुणीतरी रात्री टकटक

रितेशला शिवरायांच्या रुपात पाहून भारावला Vicky Kaushal; ‘त्या’ कमेंटमुळे प्रेक्षकांचं

तन्वी आणि प्रभूच्या नात्यात फूट? Rakhi Sawant ने लावली काडी

Lata Mangeshkar, आशा भोसले आणि गीता दत्त यांची एकाच ट्यूनवरील

Big Boss Marathi Sesaon 6 : “माझ्या आई-बाबांना हे आवडणार

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Shantanu Moghe : “काम करत राहणं हिच माझी प्रियाला श्रद्धांजली”

 Shantanu Moghe : “काम करत राहणं हिच माझी प्रियाला श्रद्धांजली”
मिक्स मसाला

Shantanu Moghe : “काम करत राहणं हिच माझी प्रियाला श्रद्धांजली”

by रसिका शिंदे-पॉल 20/09/2025

मराठी मालिका, नाट्य आणि चित्रपटसृष्टीतील हरहुन्नरी अभिनेत्री प्रिया मराठे (Priya Marathe) हिचं काही दिवसांपूर्वी कॅन्सरमुळे निधन झालं… वयाच्या अवघ्या ३८व्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला… तिच्या निधनामुळे संपूर्ण सिनेसृष्टीत शोककळा पसरली होती… तसेच, तिचा पती शंतनु मोघे (Shantanu Moghe) याच्यातर पायाखलची जमीनच निघून गेली होती… मात्र, आता पुन्हा एकदा शंतनुने काम करण्यास सुरुवात करण्याचा निर्णय घेतला असून “काम करत राहणं हीच प्रियाला माझी श्रद्धांजली आहे”, अशी प्रतिक्रिया त्याने पत्नीच्या निधनानंतर पहिल्यांदाच दिली आहे…

प्रिया मराठे हिचा कर्करोगाचे निदान झाल्यापासून शंतनु तिची काळजी घेत होता.. एकदा कॅन्सरवर मात करणाऱ्या प्रियाला दोन वर्षांपूर्वी पुन्हा एकदा कॅन्सर झाला होता..या सगळ्या कठीण काळात शंतनू मोघेने शेवटपर्यंत तिची साथ दिली… दीड वर्षापासून तोही काम सोडून फक्त प्रियाच्या सोबत वेळ घालवत तिची काळजी घेत होता… अशातच आता पुन्हा एकदा त्याने’येड लागलं प्रेमाचं’ मालिकेत एन्ट्री घेतली आहे… प्रियाच्या निधनानंतर शंतनू पुन्हा मालिकेत दिसत असून त्याने भावना व्यक्त केल्या आहेत.(Marathi Entertainment News)

महाराष्ट्र टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत शंतनू मोघे म्हणाला की, “मधल्या काळात जवळच्या व्यक्तीला वेळ देणं गरजेचं होतं. म्हणून मी कुठेही दिसलो नाही. आयुष्यातलं ते वळण पार केल्यानंतर आता पुन्हा कामावर परतलो आहे. माझे वडील नेहमी सांगायचे की आपण कलाकार मायबाप रसिकांचे असतो. त्यामुळे वैयक्तिक आयुष्यात किती संघर्ष असला तरी प्रेक्षकांचं मनोरंजन करत राहायचं. त्यात कसर सोडायची नाही. व्यवसायाशी प्रामाणिक राहायचं. वैयक्तिक सुख-दु:ख खुंटीला बांधून आपण साकारत असलेल्या व्यक्तिरेखेचं सुख दु:ख आपलंसं करणं हाच कलाकाराचा धर्म असतो. काहीही झालं तरी आपल्या कलेशी असलेली कमिटमेंट पाळायची हा आपण स्वत:शीच केलेला करार असतो. त्यामुळे काम करत राहणं हीच प्रियाला माझी श्रद्धांजली आहे. आजपर्यंत प्रिया आणि माझ्यावर सर्व प्रेक्षकांनी खूप प्रेम केलं हीच आमची खरी ताकद आहे.”(Priya Marathe death news)

पुढे तो म्हणाला की, “माझी मालिकेत शंतनू ही मंजिरीच्या दादाची भूमिका आहे. या भूमिकेला अनेक छटा आहेत. सध्या मी नकारात्मक भूमिकेत वाटत असलो तरी इतर छटा लवकरच प्रेक्षकांच्या समोर येतील. तसंच मधल्या काळात मला समजून घेतल्याबद्दल मी स्टार प्रवाह वाहिनी, सतीश राजवाडे आणि सोल प्रोडक्शनचा कायमच ऋणी असेन.”

================================

हे देखील वाचा : Priya Marathe : ‘२ वर्षांपूर्वी ‘नमो रमो नवरात्री’मध्ये…’ रवींद्र चव्हाण यांनी प्रियाला वाहिली श्रद्धांजली!

================================

प्रियाच्या निधनानंतर सुबोध भावे, अभिजीत खांडकेकर, मृणाल दुसानिससह अनेक कलाकारांनी भावुक होत प्रतिक्रिया दिल्या होत्या.. शिवाय, प्रत्येकानेच शंतनूचं कौतुक करत कशी त्याने शेवटप्रयंत प्रियाची काळजी घेतली हे देखील बऱ्याच जणांनी सांगितलं होतं… (Entertainment news in marathi)

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Celebrity News enetrtainment news marathi entertainment news priya marathe priya marathe death priya marathe serials shantanu moghe shrikant moghe
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.