‘Mi Pathishi Ahe’ सांगणार नव्या युगातील स्वामी समर्थांच्या अस्तित्वाची प्रेरणादायी

Sharad Kelkar : ‘तान्हाजी’नंतर महाराज का साकारले नाही? शरद म्हणाले….
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास एका चित्रपट किंवा नाटकामध्ये सामावणारा नाहीये. शिवाय स्वराज्य मिळवण्यासाठी त्यांच्यासोबत खंबीर उभे राहणाऱ्या मावळ्यांचा इतिहास आणि त्यांचं शौर्य देखील कौतुक आणि अभिमानास्पद आहेच. शिवरायांच्या अनेक मावळ्यांपैकी एक म्हणजे सुभेदार तान्हाजी मालुसरे. त्यांच्या जीवनावर आधारित ‘तान्हाजी’ हा चित्रपट काही वर्षांपूर्वी आला होता ज्यात अजय देवगणने मालुसरे साकारले होते तर मराठमोळे अभिनेते शरद केळकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसले होते. त्यांनी साकरलेले शिवराय सगळ्यांना भावले. शिवरायांची भूमिका साकारल्यानंतर शरद केळकरांच्या या आयुष्यात काय बदल झाला होता याबद्दल एका मुलाखतीत ते व्यक्त झाले. जाणून घेऊयात… (Sharad Kelkar)
अभिनेते शरद केळकर (Sharad Kelkar) यांनी डिजीटल कॉमेंट्रीला दिलेल्या मुलाखतीत छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारल्यानंतरचे अनुभव सांगितले. ते म्हणाला की,”जनतेकडून हे मला मिळालेलं प्रेम आहे. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण, ‘तान्हाजी’ (Tanhaji) रिलीज झाल्यानंतर मला असंख्य इव्हेंट्ससाठी आमंत्रणं मिळाली. त्यांची एकच विनंती असते की, महाराजांच्या वेशभुषेत यावं. त्यामुळे अशा ठिकाणी आजवर कधीच गेलो नाही. मी स्पष्ट नकार दिलाय. माझा नियम आहे की, ज्या व्यक्तीमुळे मला इंडस्ट्रीत इतका सन्मान मिळालाय त्याचा मला स्वतःसाठी वापर करुन घ्यायचा नाहीये.” (Historical movies)

पुढे शरद म्हणाले की, “स्वतःच्या स्वार्थासाठी वापर करणं मला कधीच कळलं नाही. सर आमच्या चित्रपटात महाराजांचे ६ सीन्स आहेत तुम्ही कराल का? अशी विचारणा कधी-कधी केली जाते. मी थे नकार देतो. मला असं करायचं नाहीये. कारण तुम्ही फक्त महाराजांचा वापर करु इच्छिता; त्यांच्या नावाचा उपयोग करुन तुम्ही त्या चित्रपटाला मोठं करायचा प्रयत्न करत आहात. तुम्ही फक्त छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट बनवा मी नक्कीच करेन असा माझा अट्टहास असतो.” त्यामुळे ‘तान्हाजी’ चित्रपटातील महाराजांची भूमिका गाजल्यानंतरही पुन्हा महाराज साकारण्याची संधी का नाकारली याचं उत्तर शरद केळकर यांनी स्पष्टपणे दिलं आहे. (Bollywood update)
========
हे देखील वाचा – मराठी चित्रपटसृष्टीत भगवं वादळ!
========
शरद केळकर (Sharad Kelkar) यांनी अभिनयाची सुरुवात दुरदर्शन वाहिनीवरुन ‘आक्रोश’ या मालिकेतून केली होती. त्यानंतर ‘सी.आय.डी’, ‘उतरन’, ‘सात फेरे’, ‘कुछ तो लोग कहेंगे’ अशा मालिकांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या. मालिकेनंतर शरद यांनी हलचल या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर एन्ट्री केली. पुढे मग ‘लक्ष्मी’, ‘आदिपुरुष’, ‘राम लीला’, ‘१९२०’, ‘’छत्रपथी’, ‘लय भारी’ अशा अनेक मराठी, हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही उल्लेखनीय भूमिका केल्या. शिवाय व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट म्हणून स्वत:ची ओळख जपत ‘बाहुबली’, ‘सलार’ चित्रपटात प्रभासला आवाज देत स्वत:ची वेगळी ओळखही त्यांनी निर्माण करत हिंदी चित्रपटसृष्टीला दखल घेण्यासही भाग पाडले. (Celebrity interviews)