
Sharvari : अमृतसरमध्ये शर्वरीची अटारी-वाघा सीमेला खास भेट!
‘मुंज्या’ चित्रपटातून आपली ओळख निर्माण करणारी अभिनेत्री शर्वरी (Sharvari) हिने नुकतीच अमृतसरजवळील वाघा बॉर्डरवर आयोजित केलेल्या प्रसिद्ध अटारी-वाघा सीमा समारंभाला हजर होती. पारंपरिक वेशात शर्वरीने भारतीय सीमा सुरक्षा दलाद्वारे पार पाडल्या जाणाऱ्या भव्य बीटिंग रिट्रीट समारंभाचा आनंद घेतला. देशभक्तीने भरलेला हा सोहळा पाहून शर्वरी भावूक झाली होती.

शर्वरीला बॉर्डर पाहताच तिच्याभोवती तिच्या चाहत्यांनी घोळका केला होता. त्याशिवाय, ध्वज अवतरण समारंभ आणि जोशपूर्ण संचलनासाठी प्रसिद्ध असलेल्या या समारंभाने शर्वरीला भारावून टाकले. समारंभानंतर तिने BSF जवानांशी संवाद साधत त्यांच्या समर्पणासाठी कृतज्ञता व्यक्त केली. (Bollywood Tadka)
=============
हे देखील वाचा : चित्रपटगृहात धुमाकूळ घातल्यानंतर ‘मुंज्या’ ओटीटी वर येण्यास सज्ज; जाणून घ्या कुठे आणि कधी पाहू शकाल
=============
शर्वरी वाघच्या आगामी चित्रपटांबद्दल सांगायचे झाल्यास ‘बंटी और बबली २’ या चित्रपटातून तिने तिच्या अभिनयाची कारकिर्द सुरु केली होती. याशिवाय ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटासाठी तिने बॅकस्टॅजही काम केलंय. याशिवाय, जॉन अब्राहमच्या ‘वेदा’ चित्रपटातही ती झळकली होती. पण तिची खरी चर्चा आदित्य सरपोतदार दिग्दर्शित ‘मुंज्या’ चित्रपटामुळे झाली होती. लवकरच शर्वरी आलिया भट्ट सोबत ‘अल्फा’ चित्रपटात झळकणार आहे.