Kiran Mane किरण मानेंची क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीदिनी खास पोस्ट
Shashank Ketkar अभिनेता शशांक केतकर पुन्हा होणार बाबा, नवीन वर्षात दिली गोड बातमी
आजपासून नवीन वर्ष २०२५ सुरु होत आहे. नवीन उमेद, नवीन चेतना घेऊन सर्वच लोकं या नवीन वर्षाचे स्वागत करताना दिसत आहे. प्रत्येकासाठी २०२४ हे वर्ष अनेक कारणांमुळे चांगले वाईट ठरले असेल, मात्र सकारात्मकता घेऊन सगळेच आता २०२५ मध्ये प्रवेश करत आहे. (Shashank Ketkar)
याच नवीन वर्षाचे निमित्त साधत अनेक लोकांनी त्यांच्या आयुष्यातील खास गोष्टी शेअर केल्या आहेत. अनेकांनी त्यांच्या आयुष्यातील प्रेमाबद्दल सांगितले तर काहींनी थेट लग्नच केले. यात अजून एका मराठी अभिनेत्याने त्याच्या आयुष्यातील अतिशय खास गोष्ट सर्वांसोबत शेअर केली आहे. (Latest Marathi News)
२०२५ या नवीन वर्षाच्या निमित्ताने मराठी टीव्ही इंडस्ट्रीमधील लोकप्रिय अभिनेता शशांक केतकरने (Shashank Ketkar) त्याच्या आयुष्यातील अतिशय सुंदर आणि खास गोष्ट लोकांसोबत शेअर केली आहे. या नवीन वर्षात शशांक पुन्हा एकदा बाबा होणार आहे. (Shashank Ketkar Second Child Announcement) हो शशांक ने नवीन वर्षाचा मुहूर्त साधत सोशल मीडियावर काही फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी सगळ्यांना दिली आहे. (Marathi News)
शशांकने पोस्ट करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, “२०२५ चं स्वागत यापेक्षा छान बातमीने होऊच शकत नाही. आम्ही पुन्हा एकदा आई-बाबा व्हायला, ऋग्वेद दादा व्हायला आणि आमचे आई-बाबा पुन्हा एकदा आजी-आजोबा व्हायला तयार झालो आहोत”. शशांकच्या या पोस्टवर कलाकारांसोबतच त्याच्या फॅन्सला देखील नवीन वर्षाचा सुखद धक्का बसला आहे. सगळेच जणं आता त्याच्या या पोस्टवर कमेंट्स करत त्याचे अभिनंदन करत आहे. (Shashank Ketkar Social Media Post)
शशांकने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तो आणि त्याची बायको प्रियंका दिसत असून, त्याचा मोठा मुलगा ऋग्वेद देखील दिसत आहे. या तिघांच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट आपल्याला या फोटोंमध्ये पाहायला मिळत आहे. या फोटोंमध्ये तिघांनी देखील गुलाबी रंगाचे कपडे घातलेले आपल्याला दिसत आहे. (Shashank Ketakar and Priyanka Dhavle)
दरम्यान शशांकबद्दल सांगायचे झाले तर तो मराठी मालिका विश्वातील अतिशय लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने आजवर अनेक मालिका आणि सिनेमे केले. त्याला खरी ओळख होणार सुन मी या घरची (Honar Sun Me Hya Gharchi) या झी मराठीवरील मालिकेमुळे मिळाली. त्यानंतर त्याने सुखाच्या सरींनी हे मन बावरे , पाहिले न मी तुला यांसारख्या मालिका केल्या. ३१ दिवस, एरोन, सोपं नसतं काही, अवगत आदी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. सोबतच तो अनेक नाटकांमध्ये देखील दिसला होता.
============
हे देखील वाचा : Pran : प्राण यांच्या हिंदी सिनेमातील प्रवेशाचा भन्नाट किस्सा!
============
शशांकने अभिनेत्री तेजश्री प्रधानसोबत पहिले लग्न केले होते. मात्र दुर्दैवाने त्यांचे लग्न मोडले आणि मग त्याने त्याची मैत्रीण प्रियांकासोबत पुन्हा लग्न केले. डिसेंबर महिन्यातच शशांक आणि प्रियांकाच्या लग्नाला सात वर्ष पूर्ण झाली. त्यांना ऋग्वेद नावाचा ४ वर्षाचा पहिला मुलगा देखील आहे. आता पुन्हा ते आई बाब होत आहे.