Vicky Kaushal-Katrina Kaif यांनी अखेर आपल्या लेकाचं नाव केलं रिव्हील,

Shashank Ketkar नंतर ‘या’ कलाकारांनीही केली मंदार देवस्थळींची पोलखोल
निर्मात्यांकडून कलाकारांचे पैसे थकवले जातात हे बऱ्याचदा चर्चेत असतं पण कधीच कुठला कलाकार उघडपणे त्यांची नावं घेत नाहीत. परंतु, हे महत्वाचं पाऊल अभिनेता शशांक केतकर याने उचललं आहे. ५-६ वर्षांपासून एका निर्मात्याने त्याचे पैसे थकवल्याचं वारंवार मुलाखती किंवा सोशल मिडियाच्या पोस्टवरुन त्याने सांगितलं होतं. आणि आता त्याने थेट त्या फ्रॉड निर्मात्याचं नाव जाहिर केलं आहे. आणि ती व्यक्ती म्हणजे दिग्दर्शक-निर्माते मंदार देवस्थळी. शशांकने सोशल मिडियावर त्यांच्या व्हॉट्सअॅपवरील चॅट्सचे स्क्रिनशॉर्ट्स आणि एक व्हिडिओ पोस्ट करत सगळी हकीकत सांगितली आहे. (Shashank Ketkar)
तर, आभाळमाया या कल्ट क्लासिक मराठी मालिकेचं दिग्दर्शन करत मंदार देवस्थळी यांनी आपला प्रवास सुरु केला होता. यानंतर, ‘वादळवाट’, ‘अवघाचि हा संसार’, ‘होणार सून मी ह्या घरची’, ‘फुलपाखरू’, ‘हे मन बावरे’, ‘ मन उडु उडु झालं ‘ अशा अनेक लोकप्रिय मालिकांचंही त्यांनी दिग्दर्शन केलं. परंतु, बऱ्याच कलाकारांचे लाखोंच्या घरात त्यांनी पैसे थकवल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला असून शशांकने फसवणूकीचे पुरावे लोकांच्या समोर मांडत कायदेशीर कारवाई करणार असल्याचं देखील म्हटलं आहे. (Mandar Devasthali)

दरम्यान, शशांकने हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर त्याच्या या व्हिडिओखाली कमेंट्समध्ये मराठीतील बऱ्याच कलाकारांनी त्यांची देखील कशाप्रकारे फसवूक झाली आणि मंदार देवस्थळींकडे किती पैसे अडकले आहेत हे लिहिलं आहे.अभिनेत्री विदिशा म्हसकरने शशांकच्या पोस्टवर कमेंट करत ३ लाख थकवल्याचं म्हटलं आहे. विदिशा मन हे बावरे मालिकेत खलनायिकेच्या भूमिकेत होती. “माझेही TDS सहित जवळपास ३ लाख रुपये आहेत. त्यावेळी आम्ही बोललो म्हणून आम्हाला ट्रोल केलं गेलं. चुकीचं ठरवलं गेलं. आपल्या इंडस्ट्रीमध्ये हे असंच चालतं, असं आम्हाला ऐकवलं गेलं. नंतर ही गोष्टच आपण सोडून दिली. या अनुभवातून चांगला धडा घेऊन मी ठरवलं की हेच प्रयत्न मी माझ्या पुढच्या कामात लावेन. जॉब, व्यवसाय बाकी सगळ्या गोष्टींसाठी कायदे आहेत. पण, आमच्या इंडस्ट्रीसाठी एकही कायदा नाही, हे वाईट आहे”, असं विदिशाने म्हटलं आहे.

तसेच, पुढे तिने संताप व्यक्त लिहिलं आहे की, “कामाच्या तासापासून, वीकेंड किंवा पेमेंटपर्यंत कशाचेच कायदे किंवा नियम नाहीत. मी याविषयी खूप वकिलांशी बोलले होते की काही होऊ शकतं का…पण काहीच झालं नाही. नॉन स्टॉप एंटरटेनमेंट सगळ्यांना हवं आहे पण त्यासाठी रोज १४-१४ तास काम करणंच चालत आलंय. तेही आम्ही आनंदाने करतो. पण त्या बदल्यात आम्हाला हे मिळतंय”.
================================
================================

तर, अभिनेता संग्राम समेळनेही शशांकच्या पोस्टवर कमेंट करत त्याचे तब्बल ३.५ लाख रुपये येणं बाकी असल्याचं सांगितलं आहे. “माझेही अजूनही जवळपास ३.५ लाख बाकी आहेत. TDS तर बोलायलाच नको. मागे ५ वर्षांपूर्वी आम्ही जेव्हा पोस्ट केली होती तेव्हा दादाला पाठिंबा देणारे काही लोक अचानक उभे राहिले. ४००-५०० लोक…त्यांनी ५००-५०० रुपये काढले असते तरी आपले थोडे फार पैसे मिळाले असते”, असं संग्रामने म्हटलं आहे. त्यामुळे आता यावर मंदार देवस्थळी काही प्रतिक्रिया देणार का? आणि अजून कोणते कलाकार त्यांच्यासोबत झालेल्या आर्थिक फसवणूकीबद्दल उघडपणे बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi