Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    sulochana chavan

    Sulochana Chavan : हिंदी चित्रपटातील लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचा स्वर!

    Dosti

    Dosti : मैत्रीच्या नात्याची भावस्पर्शी संगीतमय कहाणी!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Raja Shivaji : मराठीतील पहिल्या बिग बजेट ऐतिहासिक चित्रपटात हिंदीतील

Shaktimaan Returns : चाहत्यांच्या भेटीला पुन्हा येतोय प्रसिद्ध शो ‘शक्तिमान’;

Rana Naidu Season 2 Release Date: ‘राणा नायडू सीझन 2’

Shatir Marathi Movie: मराठी चित्रपट प्रदर्शनाच्या अनियंत्रित जत्रेतून “शातिर” चित्रपटाची

Sanjeev Kumar : ‘एक्स्ट्रा पासून एक्स्ट्रा ऑर्डीनरीपर्यंत झेप घेणारा अभिनेता

Hera Pheri 3 : राजूने पाठवली बाबू भैय्याना २५ कोटींची

Ramayan : रणबीर कपूर आणि यश स्क्रिन शेअर करणार नाहीत;

War 2 : ह्रतिक-Jr NTRच्या चित्रपटाबद्दल करण जोहर म्हणतो, “हा

Gulkand : ‘संगीत मानापमान’ ते ‘गुलकंद’; जाणून घ्या बॉक्स ऑफिस

Usha Nadkarni : “एक चित्रपट केला की स्वत:ला हॉलिवूडचे समजतात”

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Shatir Marathi Movie: मराठी चित्रपट प्रदर्शनाच्या अनियंत्रित जत्रेतून “शातिर” चित्रपटाची माघार; आता ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित !

 Shatir Marathi Movie: मराठी चित्रपट प्रदर्शनाच्या अनियंत्रित जत्रेतून “शातिर” चित्रपटाची माघार; आता ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित !
Shatir Marathi Movie
मिक्स मसाला

Shatir Marathi Movie: मराठी चित्रपट प्रदर्शनाच्या अनियंत्रित जत्रेतून “शातिर” चित्रपटाची माघार; आता ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित !

by Team KalakrutiMedia 21/05/2025

Shatir Marathi Movie: मराठी चित्रपटसृष्टीत दरवर्षी शंभराहून अधिक चित्रपट निर्माण होतात, म्हणजे प्रत्येक आठवड्याला किमान दोन मराठी चित्रपट येणार हे निश्चित आहे. परंतु मराठी चित्रपट प्रदर्शित होण्यावर कोणत्याही संस्थेचे, चित्रपट महामंडळाचे नियंत्रण नसल्याने अनेकदा तीन – चार मराठी चित्रपट एकाच आठवड्यात येतात यामुळे कोणत्याच चित्रपटाला प्राइम टाइम मिळत नाही, २३ मे रोजी तर तब्बल सात मराठी चित्रपट प्रदर्शित होणार होते. ही मराठी चित्रपटांची अनियंत्रित स्पर्धा टाळण्यासाठी शातिर द बिगिनिंग च्या निर्मात्यानी एक पाऊल टाकले असून आता १३ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. ‘… तर ही वानरसेना तुझ्या सोन्याच्या लंकेची राख रांगोळी करेल, असा इशारा अट्टल गुन्हेगारांना देणारा शातीर चित्रपटाचा ट्रेलर सोशल मिडियावर नुकताच लॉन्च झाला आहे. या ट्रेलरमुळे आधीच चर्चेत असलेल्या या चित्रपटाबद्दल उत्सुकता निश्चितपणे वाढवली जाणार आहे.  चित्रपटाच्या पोरी आम्ही मराठी पोरी…. या गाण्याप्रमाणेच टीजर आणि ट्रेलरला मराठी पेक्षकांच्या पसंतीची पावती मिळाली आहे.(Shatir Marathi Movie)

Shatir Marathi Movie
Shatir Marathi Movie

सध्याच्या तरुणाईची कथा सांगणारा, सत्य कथेवर आधारित शातीर, द बिगिनिंग या चित्रपटाची निर्मिती श्रियांश आर्ट्स अँड मोशन पिक्चर्सच्या माध्यमातून रेश्मा वायकर यांनी केली आहे. या चित्रपटा द्वारे सुनील सुशीला दशरथ वायकर यांनी दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले आहे. सध्याच्या तरुण पिढीला पडलेला अमली पदार्थांचा विळखा, ड्रग्स माफिया आणि पोलीस यंत्रणेच्या संघर्ष, व्यसनाधीनता, गुन्हेगारी यांच्याविरुद्ध महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी उभारलेला लढा या चित्रपटात प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.

Shatir Marathi Movie
Shatir Marathi Movie

या बद्दल बोलताना दिग्दर्शक सुनील वायकर म्हणाले, शातिर The Beginning माझा दिग्दर्शक म्हणुन पाहिलाच प्रयत्न आहे. समाजातील अंमली  पदार्थाच्या सेवनामुळे होणारी व्यसनाधीनता आणि त्यामुळे वाढणारी गुन्हेगारी त्या विरुद्धचा कॉलेज मधील विद्यार्थ्यांचा लढा या चित्रपटातून दाखवून एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे. २३ मे रोजी आम्ही चित्रपट रिलीज करणार होतो मात्र ऐनवेळी काही निर्मात्यांनी याच दिवशी त्यांचे चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला यामुळे आम्ही पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. (Shatir Marathi Movie)

======================================

हे देखील वाचा: Chidiya Hindi Movie Trailer: जगभर गौरवलेला “चिडिया” या हिंदी चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर लॉन्च !

====================================== 

शातिर The Beginning या चित्रपटात रेश्मा वायकर या प्रमुख भूमिकेत असून योगेश सोमण, रमेश परदेशी, मीर सरोवर, रामेश्वर गीते, गौरव रोकडे, निशांत सिंग, मनोज चौधरी यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाला रोहित नागभिडे यांचे संगीत असून वैभव देशमुख गीतकार आहेत. चित्रपटातील गीतांना वैशाली सामंत, मुग्धा कऱ्हाडे यांनी स्वरसाज चढवला आहे. सत्य घटनेवर आधारित, तरुणाईतील ड्रग्ज, व्यसनाधीनता असा संवेदनशील विषय घेऊन येणार, सस्पेन्स थ्रीलर असलेला  शातिर The Beginning हा मराठी चित्रपट येत्या १३ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actress Reshma Vaikar Entertainment Gaurav Rokade Manoj Chaudhary Marathi Movie Meer Sarovar Nishant Singh Ramesh Pardeshi Rameshwar Geete Shatir The Beginning Yogesh Somn
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.