Preity Zinta उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच हुशार बिसनेसवूमन आहे ‘डिंपल गर्ल’
Shatrughan Sinha : ‘हे’ पाकिस्तानी राष्ट्राध्यक्ष शत्रुघ्न सिन्हाला आपला मुलगा मानत!
हिंदी सिनेमाच्या दुनियेतील काही किस्से जुने जरी झाले तरी त्यातील गंमत अबाधित असते. असाच एक किस्सा १९९३ सालच्या चित्रपट मासिकांमधून मोठ्या प्रमाणावर वाचला गेला होता. ९ डिसेंबर हा अभिनेता शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha) यांचा वाढदिवस. ९ डिसेंबर १९९३ या वाढदिवसाच्या दिवशी सर्व दोस्त लोग शुभेच्छा द्यायला घरी आले तेव्हा एक अनोखा प्रकार त्यांना पाहायला मिळाला.
शत्रुघ्न सिन्हाने वाढदिवसाचा केक कट करण्यापूर्वी आपल्या लाडक्या मुलीला बाहेर बोलावले. तेव्हा सोनाक्षी सिन्हा सहा वर्षाची होती. सोनाक्षीच्या हातामध्ये एक राखी होती आणि तिने ती राखी आपल्या वडिलांच्या हातावर बांधली! त्यानंतर व्यवस्थित बर्थ डे केक कट झाला. वाढदिवस साजरा झाला. परंतु प्रत्येकाच्या मनात ही शंका होती हा काय प्रकार आहे? पण कुणाची हिम्मत झाली नाही शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha) ला असे विचारण्याची. कारण वाढदिवसाच्या दिवशी सर्व जण बर्थ डे केक कट करतात. राखी कोण बांधतात? आणि राखी बांधायचीच असेल तर बहिणीकडून बांधतात. मुलीकडून का बांधून घेतली? सर्वांच्या मनात गोंधळ होता. (Entertainment mix masala)
जेव्हा शत्रुघ्न सिन्हाच्या लक्षात आलं की प्रत्येकाच्या मनात उत्सुकता आहे हा काय प्रकार आहे तेव्हा ते स्वत: हातात माईक घेऊन पुढे आले सर्व प्रकार सांगितला. शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha) म्हणाला, ”आधी तुमच्या मनातील शंका दूर करतो. आज माझा वाढदिवस आहे पण मग आज राखी मी माझ्या मुलीच्या हातून का बांधून घेतली? याचे कारण ही राखी मला पाकिस्तानमधून आलेली आहे. पाकिस्तानचे दिवंगत राष्ट्राध्यक्ष जनरल झिया उल हक (zia ul haq) यांची मुलगी झेन जिया हिने मला वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवताना राखी देखील पाठवली आहे जनरल हक यांच्याशी माझ्या खूप कौटुंबिक चांगल्या संबंध होते. ते मला त्यांचा मुलगा मानत होते. त्या नात्याने झिया उल हक यांची मुलगी झेन जिया माझी बहीण आहे आणि तिने मला राखी पाठवली आहे त्यामुळे ही राखी मी माझ्या मुलीकडून बांधून घेतली. ही राखी जनरल झिया उल हक यांच्या मुलीने पाठवले होती.”
सर्वांना झालेल्या प्रकारचा खुलासा झाला आणि शत्रुघ्न सिंहा (Shatrughan Sinha) चा वाढदिवस हा अनोख्या पद्धतीने जोरदार साजरा झाला या वाढदिवसाचे वर्णननंतर अनेक फिल्म मॅगझिनमधून छापून आले. पाकिस्तानचे लष्करशहा जनरल झिया उल हक आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांच्यातील मैत्रीपर्व १९८० साला पासून चालू झाले. त्या वर्षी राष्ट्राध्यक्षानी सिन्हा यांना एका कार्यक्रमासाठी खास निमंत्रित केले होते. त्यांच्या दोघातील मैत्री बंध तिथेच सुरु झाले. ते शत्रुघ्न सिन्हाला आपला मुलगाच मानत. झिया यांची मुलगी झेन तेव्हापासून दरवर्षी सिन्हाला राखी पाठवत असे. (Untold stories)
झिया यांचा १७ ऑगस्ट १९८७ रोजी एका भीषण विमान अपघातात मृत्यू झाला. पण त्यांच्या कुटुंबियांचे सिन्हा यांच्यासोबतचे सबंध तसेच राहिले. २०१३ साली झिया यांच्या नातवाच्या निकाहसाठी शत्रुघ्न सिन्हा खास निमंत्रित होते. या लग्न सोहळ्याला संपूर्ण सिन्हा कुटुंबीय आणि इतर भारतीय राजकीय नेते देखील उपस्थित होते. सिन्हा कुटुंबीय आणि पाकिस्तान यांचे काही गमतीशीर योगायोग आहेत.
============
हे देखील वाचा : Juthika Roy : स्वातंत्र्यदिनाची पहाट सुरीली करणारी गायिका !
============
शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha) यांची मुलगी Sonakshi Sinha ही अभिनेता जहीर इक्बाल याच्यासोबत सात वर्ष रिलेशनमध्ये होती . २३ जून २०२४ रोजी त्यांनी मुंबईत लग्न केले. भारत आणि पाकिस्तान या देशातील वर्तमान तणावपूर्ण संबधामुळे झिया यांचे कुटुंबीय या लग्नाला उपस्थित राहू शकले नाही. शत्रुघ्नची एकेकाळची रील आणि रियल लाईफमधील मैत्रीण रीना रॉय हिचे आणि शत्रुघ्न यांचेच लग्न होईल असे सर्वाना वाटत होते पण शत्रुघ्नने त्याची मैत्रीण पूनम सोबत लग्न केल्यानंतर रीना रोयने पाकिस्तानी क्रिकेटपटू मोहसीन खानसोबत ऐंशीच्या दशकात लग्न केले होते. हे लग्न फार काळ टिकले नाही. १९९२ साली त्याच्या सोबत घटस्फोट घेवून ती भारतात परत आली!