Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    rajesh roshana nd julie movie

    Julie सिनेमाच्या दिग्दर्शकाने संगीतकार राजेश रोशन यांना कां झापले होते?

    kishore kumar

    Kishore Kumar यांचे ‘कोई हमदम ना रहा…’ हे राग झिंजोटीवर आधारीत बेमिसाल गाणे कसे बनले?

    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

‘माझं एका राजकीय नेत्यासोबत लग्न झालंय आणि…’ अखेर Sonalee Kulkarni

Prajakta Mali : प्राजक्ता माळीचं पंढरपूर शहरासोबत आहे विशेष नातं!

Rabindranath Tagore : गुरुदेव टागोरांच्या अभिजात साहित्यकृतीवरील ‘काबुलीवाला’ चित्रपट

Sonali Kulkarni: “सध्या नाटक वर्सेस सिनेमा युद्ध सुरु झालंय”

Marathi Movies: नेहरुंनी कोटावरील दिलेलं गुलाब; कोण आहे ‘हा’ मराठीतला

Family Man 3 चा टीझर रिलीज, ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता खलनायकाच्या

Abhishek Bachchan : बच्चनपुत्र अभिषेकच्या कारकिर्दीची पंचवीशी

Shefali Jariwala : ‘कांटा गर्ल’ फेम अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचे

Raaj Kumar यांनी त्यांच्या अंत्यविधीबद्दल व्यक्त केली होती ‘ही’ इच्छा!

Sangeet Sannyast Khadag: स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित ‘संगीत संन्यस्त खड्ग’ नाटक नव्या

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Shekhar Kapur : हॉलिवूडमध्येही दबदबा निर्माण करणारा भारताचा ग्रेट डिरेक्टर!

 Shekhar Kapur : हॉलिवूडमध्येही दबदबा निर्माण करणारा भारताचा ग्रेट डिरेक्टर!
कलाकृती विशेष

Shekhar Kapur : हॉलिवूडमध्येही दबदबा निर्माण करणारा भारताचा ग्रेट डिरेक्टर!

by रसिका शिंदे-पॉल 18/06/2025

भारतीय चित्रपटसृष्टीचा एक असा दिग्दर्शक ज्याने बॉलिवूडला ८०च्या दशकात sci-fi चित्रपटाचं वेड लावलं.. एक असा दिग्दर्शक ज्याने खरं तर त्याचं करिअर एक अभिनेता म्हणून सुरु केलं होतं… पण कालांतराने केवळ हिंदीच नाही तर हॉलिवूडचे एकाहून एक दर्जेदार चित्रपट त्यांनी direct केले आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या कामाची दखल घेण्यास भाग पाडलं… ते Multi Talented दिग्दर्शक म्हणजे शेखर कपूर… राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांच्या चित्रपटांना अनेक पुरस्कार मिळाले. चला तर बॉलिवूड ते हॉलिवूड असा प्रवास करणाऱ्या शेखर कपूर (Shekhar Kapur) यांच्याबद्दल जाणून घेऊयात…

शेखर कपूर यांचा जन्म आजच्या पाकिस्तानातला… सुप्रसिद्ध अभिनेते देव आनंद हे शेखर यांचे मामा.. त्यामुळे नकळत चित्रपट किंवा इंडस्ट्रीचं बाळकडू शेखर यांना बालपणापासूनच मिळालं.. चित्रपटात करिअर करायचं असा कधीच विचार न केलेले शेखर कपूर by profession Chartered Accountatnt आहेत… परदेशात जाऊन त्यांनी नोकरी देखील केली.. मात्र, कुठेतरी आत चित्रपट, कॅमेरा, अॅक्शन हे अनुभवण्याची मनात खुमखुमी होती असल्यामुळे शेखर यांनी १९७४ मध्ये ‘इश्क इश्क इश्क’ या चित्रपटातून अभिनयाची सुरुवात केली.. पुढे १९७५ मध्ये ‘जान हाजिर है’ या चित्रपटात ते lead hero म्हणून झळकले… या व्यतिरिक्त ‘उडान’, ‘उपन्यास’ या मालिकांमध्येही त्यांनी कामं केली… मग मात्र त्यांनी दिग्दर्शनाचं शस्त्र काढलं आणि १९८३ मध्ये ‘मासूम’ चित्रपटाचं दिग्दर्शन करुन एक नवा प्रवास सुरु केला.. film making, film production याचा कसाच अनुभव गाठीशी नसताना नसीरुद्दीन शाह, शबाना आझमी, उर्मिला मार्तोंडकर या कलाकारांना घेऊन त्यांनी पहिला चित्रपट केला.. पहिल्याच direction मध्ये सिस्कर मारत मासूम चित्रपटाने फिल्मफेअर पुरस्कार जिंकले… मग काय शेखर कपूर आणि राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय पुरस्कार हे समीकरण फिक्स झालं…

त्यानंतर बॉलिवूडचा पहिला science fiction मुव्ही मिस्टर इंडिया शेखर कपूर यांनी दिग्दर्शित केला आणि प्रेक्षकांना एक वेगळंच जग आपल्या कॅमेऱ्यातून दाखवलं… मात्र, शेखऱ कपूर यांना भारतासह जागतिक पातळीवर १९९४ साली आलेल्या बॅंडिट क्वीन या चित्रपटाने ओळख मिळवून दिली.. कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये हा चित्रपट चांगलाच गाजला… आणि international film industry मध्ये शेखर कपूर हे नावं चर्चेत येऊ लागलं… शेखर कपूर यांनी १९९८ मध्ये पहिला हॉलिवूड चित्रपट एलिझाबेथ हा दिग्दर्शित केला… Queen Elizabeth 1 यांचा हा बायोपिक आंतरराष्ट्रीय स्तरावर फारच गाजला… एलिझाबेथ व्यतिरिक्त The Four Feathers, Elizabeth : the golden edge, New York i love you, what’s love got to do it?, Passage, हे हॉलिवूड चित्रपट शेखर कपूर यांनी direct करुन हॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीत आपला fan base निर्माण केला.. शिवाय Joker चित्रपट फेम the great Australian actor Heath Ledger याला The Four Feathers चित्रपटासाठी direct केलं होतं…

बरं… शेखऱ कपूर यांनी जरी सुपरहिट चित्रपट दिले असले तरी त्यांचे unreleased चित्रपटही फार आहेत… ज्यात Time Machine, Paani, Mehrunissa हे इनक्ल्यूड होतात.. time machine हा शेखर यांचा आणखी एक सायन्स फिक्शन चित्रपट होता जो १९९२ मध्ये त्यांनी Announced केला होता ज्यात आमिर खान नायक होता… पण financial अडचणीमुळे हा चित्रपट येऊ शकला नाही.. तर मेहरुनिसा या चित्रपटात अमिताभ बच्चन, ऋशी कपूर असणार होते पण काही कारणांमुळे हा चित्रपटही रखडला तो कायमचाच.. याशिवाय जोशीले ज्यात अनिल कपूर, सनी देओल, श्रीदेवी असे कलाकार होते त्याचं आधी शेखर कपूर दिग्दर्शन करत होते मात्र अर्ध्यातच त्यांनी हे प्रोजक्ट सोडले आणि दुसऱ्या दिग्दर्शकाने चित्रपट take over केला होता.. सेम दुश्मनी चित्रपटाच्या बाबतीत झालं होतं.. यात सनी देओल, जॅकी श्रॉफ, अनुपम खैर, मनीशा कोयराला अशी स्टारकास्ट होती.. पण काही कारणांमुळे हा देखील मुव्ही शेखर यांनी दिग्दर्शनातून अर्धाच सोडला होता..

================================

हे देखील वाचा: Abhishek Bachchan एकेकाळी होता LIC Agent; चित्रपटांची गिनीज बुकमध्येही आहे नोंद

=================================

आता पुन्हा एकदा शेखर कपूर यांच्या दिग्दर्शनाची जादू प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे… लवकरच त्यांचं पहिलं direction असणाऱ्या मासुम चित्रपटाचा सीक्वेल मासूम २ ते घेऊन येणार असून यात original cast म्हणजे नसीरुद्दीन शाह आणि शबाना आझमी असणार आहेत आणि त्यांच्यासोबत मनोज बाजपेयी आणि त्यांची मुलगी कावेरी दिसणार आहेत. २०२५ मध्ये हा चित्रपट on board जाणार असून लवकरच तो येईल अशी आशा आहे.. १९९४ ला Bandit queen हा कल्ट चित्रपट दिल्यानंतर तब्बल ३१ वर्षांनी शेखर कपूर पुन्हा बॉलिूडमध्ये चित्रपट direct करणार आहेत… film making चं formal शिक्षण न घेता केवळ अनुभव आणि दुरदृष्टीच्या जोरावर बॉलिवूड ते हॉलिवूड हा प्रवास करणाऱ्या शेखर कपूर यांना salute!

रसिका शिंदे-पॉल

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bollywood Bollywood Chitchat bollywood films bollywood update Celebrity director elizabeth movie entertainment masala Get Latest Marathi Entertainment update Hollywood Movies masoom movie Movies Reviews in Marathi shekhar kapur
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.