
Shilpa Shetty : “मी महाराष्ट्राची मुलगी…”,मराठी-हिंदी भाषा वादावर शिल्पाचं सूचक विधान!
राज्यात सध्या मराठी आणि हिंदी भाषेचा वाद सुरु आहे… सामान्य नागरिकांसह कलाकारांनी देखीस मराठी भाषा जपली पाहिजे आणि मराठी भाषेची अस्मिता आपण टिकवली पाहिजे असा निर्धार व्यक्त केला आहे… आता या विषयात अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) हिने दिलेली प्रतिक्रिया विशेष लक्षवेधी ठरली आहे… सध्या शिल्पा केडी या तिच्या आगामी कन्नड चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असून यावेळी झालेल्या मुलाखतीमध्ये तिने मराठी भाषेवर महत्वाचं विधान केलं आहे…(Bollywood News)

फ्री प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, ‘केडी’ (KD Kannada Movie) चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान शिल्पा शेट्टीला मराठी-हिंदी वादाबद्दल प्रश्न विचारला गेला..त्यावर शिल्पा म्हणाली की, “याबद्दल संजय दत्त (Sanjay Dutt) त्यांची प्रतिक्रिया देतील”. नंतर ती म्हणाली, “मला मराठी माहीत आहे. मी महाराष्ट्राची मुलगी आहे; पण आज आपण ‘केडी’ या चित्रपटाबद्दल बोलण्यासाठी आपण जमलो आहोत. त्यामुळे कुठल्याही वादग्रस्त विषयावर आम्ही बोलणार नाही” पुढे शिल्पा म्हणाली की, “आमचा चित्रपट अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होत आहे. त्यामुळे आम्ही तो मराठीतही प्रदर्शित करू शकतो”. तिच्या या विधानर उपस्थितांनी टाळ्या वाजवून तिचं कौतुक केलं.

दरम्यान, शिल्पा शेट्टी जवळपास २० वर्षांनी कन्नड चित्रपटसृष्टीत कमबॅक करत आहे… याआधी २००५ मध्ये ऑटो शंकर या कन्नड चित्रपटात ती झळकली होती… आणि आता ‘केडी’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला शिल्पा येणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत संजय दत्त, विजय सेतुपती, नोरा फतेही अशी कलाकार मंडळी असणार आहेत… या चित्रपटाचं कथानक बंगळुरूमधील एका सत्य घटनेवर आधारित असल्याचं म्हटलं जात असून चित्रपटाचं दिग्दर्शन प्रेम यांनी केलं आहे…
================================
=================================
शिल्पा शेट्टी हिच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ९०च्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीत तिने सुपरहिट चित्रपट दिले आहेत… ‘बाजीगर’, ‘धडकन’, ‘फिर मिलेंगे’, ‘गॅम्बलर’, ‘लाल बादशाह’, ‘बधाई हो बधाई’, ‘कर्ज’, ‘परदेसी बाबू’ असे अनेक चित्रपट तिने साकारले आहेत…(Shilpa Shetty Movies)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi