‘शिवा’ मालिकेतून ‘रामभाऊ’ची एक्झिट; आता ‘या’ हिंदी मालिकेत झळकणार !

Shitti Vajali Re Finale: ‘शिट्टी वाजली रे’ च्या महाअंतिम सोहळ्यात डॉ. निलेश साबळेंची खास हजेरी !
स्टार प्रवाहवरील लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘शिट्टी वाजली रे’ आपल्या शेवटच्या टप्प्यात पोहोचला असून २ आणि ३ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजता त्याचा महाअंतिम सोहळा जल्लोषात साजरा होणार आहे. या खास कार्यक्रमात सेलिब्रिटी जोड्यांचा धमाल स्वयंपाक, हशा-पटी आणि मनोरंजनाची मेजवानी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. याचबरोबर सोहळ्यात दोन खास पाहुण्यांची उपस्थिती विशेष आकर्षण ठरणार आहे. आणि ते पाहुणे आहेत, निलेश साबळे आणि अभिनेता सिद्धार्थ जाधव.(Shitti Vajali Re Finale)

अभिनेता सिद्धार्थ जाधव लवकरच स्टार प्रवाहवर नवीन कार्यक्रम “आता होऊ दे धिंगाणा” घेऊन येत आहे. त्यामुळे त्याची उपस्थिती सोहळ्यात धमाल उडवून देणार यात शंका नाही. दुसरीकडे, ‘चला हवा येऊ द्या’ च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात घर करणारा निलेश साबळे देखील पहिल्यांदाच स्टार प्रवाहच्या मंचावर दिसणार आहे. निलेश ‘शिट्टी वाजली रे’च्या टीमचं कौतुक करण्यासाठी आणि खास पदार्थांची चव चाखण्यासाठी या विशेष भागात सहभागी होणार आहे.

या संधीबद्दल बोलताना निलेश साबळे म्हणतो, “स्टार प्रवाहसोबतचा हा माझा पहिलाच प्रोजेक्ट आहे. त्यांचं प्रेम आणि आपुलकी मनाला भिडली. मला स्वयंपाक येत नाही, पण अभिनेत्री सुपर्णा श्यामच्या मदतीने मी काहीतरी बनवायचा प्रयत्न केला. तो अनुभव खूप मजेशीर होता. ‘शिट्टी वाजली रे’ आणि ‘आता होऊ दे धिंगाणा’ हे दोन्ही कार्यक्रम माझ्या आवडीचे आहेत. त्यामुळे मंचावरचा हा दिवस माझ्यासाठी खास ठरला.”(Shitti Vajali Re Finale)
===============================
हे देखील वाचा: Muramba Serial: ‘मुरांबा’ मालिकेनं पार केला ११०० भागांचा टप्पा; शशांक केतकरनं व्यक्त केली कृतज्ञता !
===============================
या महाअंतिम भागात मनोरंजन, विनोद, पदार्थांची चव आणि त्याबरोबर सेलिब्रिटींची धमाल ही पाहायला मिळणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांनी हे खास दोन दिवस नक्कीच चुकवू नये असाच असणार आहे. ‘शिट्टी वाजली रे’चा हा धम्माल महाअंतिम सोहळा, प्रेक्षकांना २ आणि ३ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजता, स्टार प्रवाह या वाहिनीवर पाहता येईल!