Mukesh Khanna उधारीवर पैसे घेऊन सुरु केले होते’ शक्तिमान’; एक

Star Pravah : गौतमी पाटील ते पुष्कर श्रोत्री; जाणून घ्या सेलिब्रिटी कुकिंग शोचे स्पर्धक!
मालिकांच्या विश्वात सध्या अनेक रिएलिटी शो प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी येत आहेत… काही दिवसांपूर्वीच झी मराठीवर ‘चल भावा सिटीत’ (Chal Bhava Citit) हा कार्यक्रम सुरु झाला होता आणि याचं सुत्रसंचलन अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) करत आहे… आता याच शोच्या पाठोपाठ स्टार प्रवाह वाहिनीवर नवा कुकिंग शो येत असून याचं सुत्रसंचलन अभिनेता अमेय वाघ (Amey Wagh) करताना दिसणार आहे… शोचं नाव काय आणि कोणते सेलिब्रिटी स्पर्धक यात दिसणार आहेत जाणून घेऊयात… (Shitti Vajli Re)

स्टार प्रवाह वाहिनीवर ‘शिट्टी वाजली रे’ (Shitti Vajli Re) या नवा शो सुरु होणार असून या शोमध्ये सेलिब्रिटींना विविध पदार्थ बनवण्याचा टास्क मिळणार आहे. आता रोज विविध मालिकांमधून आपलं मनोरंजन करणारे सेलिब्रिटी किचनमध्ये वेगवेगळे पदार्थ बनवताना दिसणार आहेत…. ‘शिट्टी वाजली रे’ या कार्यक्रमाचा प्रोमो पाहून ‘Laughter Chefs – Unlimited Entertainment’ या शोची झलक पाहायला मिळते…(Cooking reality show)
‘स्टार प्रवाह’ने ‘शिट्टी वाजली रे’ या कार्यक्रमामध्ये सेलिब्रिटी मास्टर शेफ शो नुकताच गाजवलेली आणि मराठी बिग बॉसचा पाचवा सीझन दणक्यात वाजवणारी निक्की तांबोळी (Nikki Tamboli) दिसणार आहे.. याव्यतिरिक्त आशिष पाटील, विजय पाटकर, (Vijay Patkar) प्रियदर्शन जाधव, माधुरी पवार, संकेत पाठक, गौतमी पाटील, पुपाली भोसले, स्मिता गोंदकर, छोटा पुढारी घन:श्याम दरवडे या कलाकारांचं आजवर कधीही न पाहिलेलं पाककौशल्य ‘शिट्टी वाजली रे’ या कार्यक्रमाच्या मंचावरून पहिल्यांदाच महाराष्ट्रासमोर येणार आहे. (Celebrity cooking show)
===============================
हे देखील वाचा: Madhura Velankar : लग्नातल्या पाहूण्यांना ‘जा’ म्हणायची वेळ का आली?
===============================
दरम्यान, ‘शिट्टी वाजली रे’ (Shitti Vajli Re) हा कार्यक्रम येत्या २६ एप्रिलपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा शो शनिवार आणि रविवार रात्री ९ वाजता प्रसारित करण्यात येणार आहे. प्रेक्षकांनी शोच्या प्रोमोवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. मराठीत पहिल्यांदाच कुकिंगचा असा आगळावेगळा कार्यक्रम येणार असल्याने सगळेच हा शो पाहण्यासाठी उत्सुक आहेत.(Entertainment)