
Kapil Sharma याच्या कॅनडातील Kaps Cafe वर गोळीबार, खलिस्तानी दहशतवाद्याने घेतली जबाबदारी!
कॉमेडियन कपिल शर्मा (Kapil Sharma) यांच्या कॅनडातील कॅफेवर १० जुलै २०२५ च्या रात्री काही अज्ञात लोकांनी गोळीबार केला… दरम्यान काही दिवसांपूर्वीच कॅनडामध्ये कपिलच्या Kaps Cafe चं उद्घाटन झालं होतं… आणि आता त्याच्या कॅफेवर अंधाधूंद गोळीबार झाला असून या हल्ल्याची जबाबदारी खलिस्तानी दहशतवादी हरजीत सिंग लड्डी याने घेतली आहे. (Bollywood News)
दरम्यान, एकीकडे कॉमेडी शो आणि चित्रपटांमध्ये सातत्याने काम करत असणाऱ्या कपिल शर्मा त्याच्या वैयक्तिक जीवनामुळे किंवा त्याच्या व्हायरल ट्विट्समुळे चर्चेत असतो… मात्र, आता थेट कॅनडातील कॅफेवर झालेल्या गोळीबारामुळे लोकांची त्याच्याप्रती चिंता वाढली आहे… या गोळीबाराची जबाबदारी घेतलेल्या खलिस्तानी दहशतवादी हरजीत सिंग लड्डीने कपिलला भविष्यात आणखी वाईट परिणामांची देखील धमकी दिली आहे.

हरजीत याने गोळीबार का केला याचं कारण सांगताना असं म्हटलं आहे की, “कपिलने काही काळापूर्वी निहंग शिखांच्या पोशाखाची खिल्ली उडवली होती. या विनोदामुळे हरजीत सिंगला राग अनावर झाला होता, ज्यासाठी त्याने कपिल शर्माच्या मॅनेजरशी बोलण्याचा प्रयत्नही केला होता. परंतु मॅनेजरकडून त्याला कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याकारणाने त्याने कपिलच्या कॅफेमध्ये गोळीबार केला”. गोळीबारानंतर हरजीतने जर कपिलने त्याच्या विनोदाबद्दल माफी मागितली नाही तर भविष्यात आणखी वाईट परिणाम होतील अशी धमकी दिली आहे…

या सर्व प्रकरणावर कपिल शर्माच्या टिमने अधिकृत स्टेटमेंट जारी केले आहे. यात कपिल म्हणतो की,”ग्राहकांना स्वादिष्ट कॉफी देण्यासाठी आणि मैत्रीपूर्ण भावनेने सर्वांना एकत्र आणण्यासाठी आम्ही हा कॅफे सुरु केला होता. आम्ही जे स्वप्न पाहिलं त्या गोष्टीला हिंसाचाराचा सामना करावा लागला, हे दुर्दैवी आहे. आम्ही या धक्क्यातून सावरत आहोत, पण आम्ही हार मानणार नाही. तुम्ही आम्हाला जो पाठिंबा दिलाय त्याबद्दल धन्यवाद. तुम्ही या कठीण काळात आम्हाला DM द्वारे जे मेसेज केले आहेत, ज्या प्रार्थना केल्या आहेत त्यासाठी आम्ही तुमचे आभार मानतो.” (Kapil Sharma official statement)
पुढे तो असं देखील म्हणतो की,”तुम्ही सर्व आमच्यासाठी एकत्र आला आहात, यामुळेच हा कॅफे तुमच्या विश्वासावर उभा आहे. चला हिंसाचाराच्या विरोधात उभे राहूया. आमचं कॅफे लोकांना एकत्र आणतं, याची खात्री पुन्हा एकदा सर्वांना देऊया. लवकरच भेटूया!” अशा शब्दात कपिल शर्मा आणि कॅप्स कॅफेच्या टीमने त्यांचं अधिकृत स्टेटमेंट जारी केलंय. अशाप्रकारे कॅफेवर गोळीबार झाल्याने कपिल शर्मा आणि त्याच्या संपूर्ण टीमला धक्का बसला असला तरीही या धक्क्यातून ते लवकरच पुन्हा सावरतील”, असा निर्धारही त्याने व्यक्त केला आहे…
================================
=================================
दरम्यान, खलिस्तानी हरजीत सिंग लड्डीबद्दल बोलायचं झालं तर, तो पंजाबमधील नवांशहरचा रहिवासी असून खूप दिवसांपूर्वी देश सोडून पसार झालाआहे. हरजीत बब्बर खालसा इंटरनॅशनलसाठी तो काम करत असून कॅनडामध्ये राहून भारतातील दहशतवादी कारवायांवरही तो लक्ष ठेवतो. हरजीत हा भारताच्या एनआयएचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी असून २ वर्षांपूर्वी एनआयएने त्याला पकडून दिल्यास त्याच्यावर १० लाख रुपयांचे बक्षीसही ठेवलं होतं. (Entertainment News)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi