महाराणी येसूबाईंच्या भूमिकेतले अमृता खानविलकरचे फोटो व्हायरल
Shraddha Kapoor आणि Rahul Modi यांचे ब्रेकअप? सोशल मिडीयावर आले चर्चांना उधाण
बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या तिच्या आगामी स्त्री 2 चित्रपटामुळे चर्चेत आहे. यासोबतच अभिनेत्रीच्या लव्ह लाईफचीही अनेकदा चर्चा होत असते. अशातच आता श्रद्धा कपूरने तिचा कथित बॉयफ्रेंड राहुल मोदी सोबतचे सर्व संबंध तोडल्याचे बोलले जात आहे. हो, तुम्ही बरोबर वाचलंत, खरं तर या अभिनेत्रीने राहुलसोबतचं नातं संपुष्टात आणलं आहे आणि स्वत:ला त्याच्या कुटुंबापासूनही दूर केलं आहे अशी माहीती समोर येत आहे. याबाबत अद्याप काहीही अधिकृतपणे समोर आले नसले तरी अभिनेत्रीने आपल्या सोशल मीडियापासून या सर्वांना दूर ठेवले आहे.(Shraddha Kapoor and Rahul Modi Breakup)
श्रद्धा कपूरने राहुल मोदी ला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये केला जात आहे. सध्या एक पोस्ट व्हायरल होत आहे. श्रद्धाने केवळ राहुलच नाही तर त्याची बहीण आणि त्याच्या प्रॉडक्शन हाऊसच्या इन्स्टा पेजलाही अनफॉलो केल्याचा दावा या पोस्टमध्ये करण्यात आला आहे. इतकंच नाही तर श्रद्धा पाळीव कुत्र्यासाठी बनवलेले राहुलचे सोशल मीडिया पेजही फॉलो करत होती पण आता तिने त्या पेजलाही अनफॉलो केले आहे.
यावर्षी श्रद्धा कपूरने इन्स्टाग्राम स्टोरीवर कथित बॉयफ्रेंड राहुल मोदी सोबतचा एक फोटो शेअर केला होता, ज्यासोबत तिने लिहिले होते, ”दिल रख ले.. नींद तो वापस दे दे यार.”हा फोटो समोर आल्यानंतर चाहत्यांनी, त्या दोघांनी आपलं नातं अधिकृत केलं आहे, असं मानलं जात होतं. दरम्यान, आता या दोघांच्या ब्रेकअपच्या बातमीने चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. श्रद्धा कपूरचं राहुल मोदींशी ब्रेकअप झालं का? हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे कारण अभिनेत्रीने राहुलला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केले आहे. (Shraddha Kapoor and Rahul Modi Breakup)
=============================
हे देखील वाचा: Khatron Ke Khiladi 14: आसिम रियाजनंतर आता शिल्पा शिंदे ही शो मधून बाहेर !
=============================
श्रद्धा कपूर आणि राहुल मोदी यांनी कधीही एकमेकांच्या नात्याला दुजोरा दिला नाही, पण जेव्हा दोघे एकत्र सुट्टीसाठी बाहेर जायचे आणि तिथून दोघांनी एकाच ठिकाणी आपल्या इन्स्टाग्रामवर वेगवेगळे फोटो शेअर केले आहेत, तेव्हापासून चाहत्यांना समजले होते की नक्कीच या दोघांमध्ये काहीतरी शिजत आहे. यानंतर हे कपल अनेकदा एकत्र ही दिसले आहे.