Ramayana Movie : बॉलिवूडचा ८३५ कोटींचा पहिला बिग बजेट Mythological

Stree 2 Trailer Out: आता स्त्री नाही सरकटाची दहशत दिसणार; ‘स्त्री 2’चा धमाकेदार ट्रेलर रिलीज
राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर यांचा हॉरर कॉमेडी चित्रपट ‘स्त्री-२’ पुन्हा एकदा पडद्यावर येण्यासाठी सज्ज झाला आहे. गेल्या भागात आपण स्त्रियांची भीती पाहिली होती, आता दुसऱ्या भागात स्त्रियांची नाही तर पुरुषांची भीती पहायला मिळणार आहे आणि त्याच नाव सरकटा आहे जे पुरुषांवर नाही तर स्त्रियांवर अत्याचार करत आहे. राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर यांच्या हॉरर कॉमेडी चित्रपट ‘स्त्री-2’चा ट्रेलर रिलीज झाला आहे. हा ट्रेलर रिलीज होताच सोशल मीडियावर लोकप्रिय झाला आहे. ट्रेलर पाहिल्यानंतर हा चित्रपट पाहण्याची चाहत्यांची उत्सुकता पूर्वीपेक्षा ही अधिक वाढली आहे.(Stree 2 Trailer Out)

अमर कौशिक दिग्दर्शित या चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवात पंकज त्रिपाठी यांच्या डायलॉगने होते, ज्यात ते म्हणत आहेत, ‘चंदेरी पुराणाच्या पानांवर स्पष्टपणे लिहिलं होतं की, महिला निघून जाताच तो येईल. ज्याने वेश्याची हत्या करून तिला स्त्री बनवले, ज्याला इतिहास फक्त एकाच नावाने ओळखतो.’ यानंतर राजकुमार राव प्रश्न विताचतो- सरकटा यांच्याबद्दल आपल्याला काय माहित आहे? यावर अभिषेक बॅनर्जी यांनी गमतीशीर उत्तर दिले आहे पण अतिशय गंभीर शैलीत – सरकटा चे डोके कापलेले आहे. त्याच्या या उत्तरावर पंकज त्रिपाठी अभिषेकसाठी म्हणतो की, यालाच आता च्या आता आईएस घोषित करा.

श्रद्धा कपूर तिच्या आगामी ‘स्त्री २’ चित्रपटामुळे चर्चेत आहे आणि हा चित्रपट २०१८ मध्ये आल्यापासून चाहते त्याच्या दुसऱ्या भागाची वाट पाहत होते. पहिल्या भागात राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर ची जोडी प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती. आता या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचा ट्रेलरही समोर आला आहे. यात पुन्हा एकदा त्याच या जोडीला चंदेरीत होत असलेल्या दहशतीला सामोरे जावे लागणार आहे.(Stree 2 Trailer Out)
=================================
=================================
स्त्री-२ च्या ट्रेलरचं सर्वसामान्यांसोबतच सिनेकलाकारांनीही कौतुक केलं आहे, आता या यादीत आयुष्मान खुरानाच्या नावाचाही समावेश झाला आहे. आयुष्मानने लिहिले की, “हा ट्रेलर खूप मजेशीर आहे आणि या वेड्यांच्या टीमला पुन्हा पडद्यावर एकत्र पाहणे किती मजेदार आहे, संपूर्ण टीम आश्चर्यकारक आहे.” त्याने पुढे असे ही लिहिले की, “यात हॉरर, कॉमेडी आणि लोककथांचे उत्तम मिश्रण पाहायला मिळेल.” या चित्रपटात श्रद्धा कपूर, पंकज त्रिपाठी, राजकुमार राव, अपारशक्ती खुराना आणि अभिषेक बॅनर्जी यांच्याव्यतिरिक्त तमन्ना भाटिया ही देखील झळकणार आहे.