Prajakta Mali मुंबई सोडून चालली? अभिनेत्रीच्या पोस्टने चाहत्यांना बसला धक्का !

Shraddha Kapoor हिचं हॉलिवूडमध्ये पदार्पण!
बॉलिवूडची मराठमोळी मुलगी अशी ओळख असणारी श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) सध्या तिच्या आगामी बऱ्याच चित्रपटांमुळे चर्चेत आहे… २०१० मध्ये तीन पत्ती चित्रपटातून तिने आपल्या अभिनयाची सुरुवात केली… सिलेक्टिव्ह पण जबरदस्त भूमिका तिने सादर केल्या… नेपोटिझमच्या जगात तिने स्वत:मधील अभिनय आणि गायनाचं कौशल्य सिद्ध केलं… आता थेट गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्याशी तिचं कौटुंबिक नातं आहे म्हटल्यावर आवाज सुरेल असणारच की… आणि आता याच आवाजाच्या जोरावर तिने थेट हॉलिवूड गाठलं आहे… अभिनेत्री म्हणून नाही तर व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट म्हणून… (Bollywood News)

तर, श्रद्धाने सुप्रसिद्ध डिस्नीच्या ‘झूटोपिया २’ या ऍनिमेटेड चित्रपटात तिने एका कॅरेक्टरला हिंदी भाषेतील व्हर्जनमध्ये आवाज दिला आहे…. श्रद्धाने ज्या कॅरेक्टरला आवाज दिला आहे त्याचं नाव आहे ‘जूडी हॉप्स’ आणि हे पात्र पात्र जगभरात प्रचंड लोकप्रिय आहे… दरम्यान, ‘झुटोपिया २’ (Zootopia 2) चं हिंदी वर्जन २८ नोव्हेंबर २०२५ रोजी रिलीज होणार आहे… त्यामुळे आता ग्लोबल स्टार झालेल्या श्रद्धा कपूरचं तिचे चाहते कौतुक आणि अभिनंदन करत असून लवकरच तिने एखाद्या हॉलिवूड चित्रपटातही झळकावं अशी अपेक्षा देखील सोशल मिडियावर बोलून दाखवली जात आहे…. (Shraddha Kapoor Hollywood Debut)

तसेच, श्रद्धा कपूरच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ती ‘स्त्री ३’ (STree 3) मध्ये दिसणार आहे… याशिवाय, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लावणीसम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या बायोपिकमध्ये ती प्रमुख भूमिकेत म्हणजेच विठाबाईंच्या भूमिकेत दिसणार असं सांगितलं जात आहे.. अजून अधिकृतरित्या या बायोपिकबद्दल काहीही जाहिर केलं गेलं नसलं तरी या चित्रपटाचं दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर (Laxman Utekar) करणार असं देखील म्हटलं जात आहे… सोशल मिडियावर या चित्रपटाचं नाव इठा असेल अश्या पोस्ट व्हायरल होताना दिसत आहेत, त्यामुळे लवकरच अधिकृतरित्या चित्रपटाचं नाव, दिग्दर्शक आणि प्रमुख अभिनेत्रीचं नाव जाहिर होण्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत… (Entertainment News)
================================
================================
श्रद्धा कपूर हिच्या अन्य चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर २०१० मध्ये सुरु झालेल्या तिच्या अभिनय प्रवासाला १५ वर्ष पूर्ण झाली आहेत… या १५ वर्षांमध्ये तिने ‘लव्ह का द इन्ड’, ‘आशिकी २’, ‘द विलन’, ‘हैदर’, ‘बागी’, ‘हाफ गर्लफ्रेंड, ‘हसिना पारकर’, ‘ABCD’, ‘ओके जानू’, साहो’, ‘स्त्री’, ‘स्त्री २’, ‘तु झुठी मैं मक्कार’ अशा चित्रपटांमध्ये उत्कृष्ट भूमिका साकारल्या आहेत… (Shraddha Kapoor Movies)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi