श्रावण, सण आणि गाणी..
मराठी चित्रपट आणि सण, उत्सव, व्रतवैकल्ये यांचे जवळचे नाते आहे. श्रावण महिना आणि व्रतवैकल्ये यांचा उल्लेख गीतांमधून येतो. ‘थोरली जाऊ’ चित्रपटाच्या वेळची गोष्ट आहे. गीतकार सुधीर मोघे यांना सांगण्यात आलं की त्यांना एका घरातील मंगळागौरीच्या व्रताचे गीत लिहायचे आहे. प्रसंग असा होता की, एका घरात चार सुना आहेत आणि त्या चार सुना वेगवेगळ्या प्रांतातून आहेत. कोणी कोकणातील आहे, तर कोणी वऱ्हाड प्रांतातील आहे तेव्हा सुधीर मोघे यांनी गीत लिहिले
“एका फुलाच्या चार पाकळ्या
पूजिते मंगळागौर
दिसाया साऱ्या जरी निराळ्या
एकाच गंधात सूर”
कोकणातील सून म्हणते
कोकणची वेळ कुठेही फुलेल, जाऊदे किती दूर दूर
या गीतात चार कडवी आहेत आणि प्रत्येक कडवे वेगळ्या गायिकेच्या आवाजात आहे. रंजना पेठे, उत्तरा केळकर , शुभा जोशी, अपर्णा मयेकर यांनी गायले आहे. या गीताला सुधीर फडके यांचे संगीत आहे. आशा काळे ,प्रिया तेंडुलकर या अभिनेत्री या गाण्यात आहेत .
गणेश आचवल