
सचिन पिळगांवकरांच्या तुफान ट्रोलिंगवर Shriya Pilgoankar म्हणाली, “शेवटी माझ्या बाबांना…”
कधी कोणत्या कलाकाराला त्यांच्या विधानांवरुन किंवा Acting वरुन किंवा कुठल्याही कारणाने ट्रोल केलं जाऊ शकतं… गेल्या काही महिन्यांपासून खरं तर मराठीच नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीतलेही दिग्गज अभिनेते-दिग्दर्शक सचिन पिळगांवकर (Sachin Pilgoankar) चांगलेच चर्चेत आहे… त्यांच्या बऱ्याच विधानांमुळे त्यांना ट्रोलर्सनी टार्गेट केलं… आता ५० वर्षांपेक्षा जास्त अनुभव ज्या कलाकाराच्या गाठीशी आहे, ज्याने बालकलाकार म्हणून आपल्या अभिनयाची सुरुवात केली होती, नक्कीच त्या माणसाकडे बऱ्याच लोकांना माहित नसलेल्या गोष्टी सांगण्यासाठी असणारच… मात्र, महागुरुंना त्यांच्या ‘शोले’ चित्रपटातील गब्बरला धडा दिल्याबद्दल असो किंवा अन्य वक्तव्यांसाठी असो तुफान ट्रोल केलं गेलं होतं… यावर आता त्यांची लेक श्रिया पिळगांवकर (Shriya Pilgoankar) हिने ट्रोलर्सना सणसणीत उत्तर दिलं आहे…नेमकं आपल्या बाबांची बाजू घेत श्रिया काय म्हणाली आहे जाणून घेऊयात…

तर, श्रिया तिच्या मंडाला मर्ड्स या वेब सीरीजमुळे चर्चेत आहे… याच सीरीजच्या प्रमोशनादरम्यान महाराष्ट्र टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत वडिलांच्या ट्रोलिंगवर प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर तिने दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. श्रिया म्हणाली की, “ते सगळंच खेदजनक होतं. पण आम्हा कलाकारांना ट्रोलिंगची इतकी सवय झालीय की आम्हाला त्याबद्दल काही वाटेनासं झालंय. ट्रोलर्सना काहीच काम नसतं, म्हणून ते आम्हा कलाकारांवर टीका करतात. शेवटी बाबांना मायबाप प्रेक्षकांकडून अमाप प्रेम मिळतंय, त्यापुढे ट्रोलिंग काहीच नाही. लक्ष वेधून घेण्यासाठी ट्रोलर्स कोणत्याही थराला जाऊ लागले आहेत. सोशल मीडियावरचं जग असंच आहे, त्यामुळे तिथल्या गोष्टी फारशा मनाला लावून घ्यायच्या नाहीत. कृतज्ञ राहून चांगलं काम करत राहायचं, हे आम्ही आमच्या मनावर बिंबवून घेतलं आहे”. (Entertainment News)
================================
हे देखील वाचा : Sachin Pilgoankar : जयवंत वाडकर यांनी सचिन पिळगांवकरांच्या यशाचं सांगितलं कारण!
=================================
श्रियाने आपल्या वडिलांच्या ट्रोलर्सला दिलेलं हे खणखणीत उत्तर प्रेक्षकांना फार आवडलं आहे… कारण, कलाकाराने चांगलं काम केलं किंवा वाईट केलं तरी ट्रोलर्स त्यांना टार्गेट करतात हे काही नवीन नाही… आता श्रियाने वडिलांची बाजू मांडल्यानंतर तरी सचिन पिळगांवकर यांना ट्रोल करणं थांबतं का? आणि स्वत: सचिन यावर काही प्रतिक्रिया देतील का हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे…तुम्हाला हा इंटरेस्टिंग व्हिडिओ कसा वाटला आणि कलाकारांना जे ट्रोल केलं जातं त्याबद्दल प्रेक्षक म्हणून तुमचं काय मत आहे हे आम्हाला नक्की कळवा…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi