Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Bigg Boss Marathi 6 च्या घरात होणार Abhijit Bichukale ची

मराठमोळ्या Tejaswi Prakash ने मुंबईत घेतलं अलिशान घर, किंमत ऐकून तुम्हाला

Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam Ott Release: क्रांतीज्योतीची पोरं आता OTT ही

Nutan : ‘चंदन सा बदन चंचल चितवन..’; गाण्याच्या मेकिंगची भन्नाट

Geetu Mohandas : ४ पुरुष दिग्दर्शकांना भिडणार १ स्त्री दिग्दर्शिका;

Big Boss Marathi : “रेशमताईच्या बेडजवळ रोज कुणीतरी रात्री टकटक

रितेशला शिवरायांच्या रुपात पाहून भारावला Vicky Kaushal; ‘त्या’ कमेंटमुळे प्रेक्षकांचं

तन्वी आणि प्रभूच्या नात्यात फूट? Rakhi Sawant ने लावली काडी

Lata Mangeshkar, आशा भोसले आणि गीता दत्त यांची एकाच ट्यूनवरील

Big Boss Marathi Sesaon 6 : “माझ्या आई-बाबांना हे आवडणार

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Virat Kohli : “विराटसोबत शूट करताना खूप निर्बंध, खूप सुरक्षा”; मराठी अभिनेत्रीने सांगितला अनुभव

 Virat Kohli : “विराटसोबत शूट करताना खूप निर्बंध, खूप सुरक्षा”; मराठी अभिनेत्रीने सांगितला अनुभव
मिक्स मसाला

Virat Kohli : “विराटसोबत शूट करताना खूप निर्बंध, खूप सुरक्षा”; मराठी अभिनेत्रीने सांगितला अनुभव

by रसिका शिंदे-पॉल 13/05/2025

भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) याने नुकतीच कसोटी क्रिकेट सामन्यांमधून आपली निवृत्ती जाहिर केली. त्याच्या या निर्णयामुळे चाहत्यांना धक्का बसला आहे. मात्र, आजवरच्या त्याच्या क्रिकेटमधील कामगिरीचे लोकं कौतुक करत विराटला पुढील वाटचालीस शुभेच्छा देत आहेत. बरं, विराट कोहली केवळ क्रिकेटपटू नसून जाहिरात क्षेत्रातीलही फार मोठं नाव आहे. बड्या बड्या ब्रॅण्ड्सचा तो अॅम्बॅसेडर देखील आहे. पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मासह (Anushka Sharma) अनेक अभिनेत्रींसोबत तो विविध जाहिरातींमध्ये झळकला आहे. पण तुम्हाला माहित हे का नुकत्याच एका मराठमोळ्या अभिनेत्रीने विराट कोहलीसोबत जाहिरात केली असून त्याच्यासोबत स्क्रिन शेअर करताना नर्वस होती अशा भावना तिने व्यक्त केल्या आहेत.(Bollywood)

तर, विराट कोहलीसोबत जाहिरात करणारी अभिनेत्री आहे ‘राधा ही बावरी’ मालिका फेम श्रुती मराठे (Shruti Marathe) . एका मुलाखतीमध्ये तिने आपल्या भावना व्यक्त करताना म्हटलं होतं की, “विराट कोहलीसोबत शूट करताना खूप निर्बंध, खूप सुरक्षा आणि पटापट शूट करुन त्यांना जाऊ द्या असं वातावरण असेल असं मला वाटलं होतं. पण प्रत्यक्षात तो खूप चिल्ड आऊट होता. कृणाल पांड्या (Krunal Pandya) आणि विराट (Virat Kohli) दोघंही होते. दोघंही इतके टाईमपास गप्पा मारत होते. म्हणजे एक वेळ तर अशीही होती की ते चक्क मीम्सवरही चर्चा करत होते.  मला असं वाटलं की अरे सोशल मीडियावर काय चालू आहे, कोणतं मीम मजेशीर आहे कोणतं व्हायरल झालं आहे यावर त्यांचं पण लक्ष असतं. हे बघून मला आश्चर्यच वाटलं.” (Entertainment)

दरम्यान, श्रुती मराठे केवळ मराठीच नव्हे तर दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही छोटेखानी पण ठसठशीत भूमिका साकारताना दिसत आहे. काही महिन्यांपूर्वी आलेल्या ‘देवारा’ या चित्रपटात ज्युनिअर एन.टी.आरच्या (Jr NTR) बायकोची भूमिका तिने साकारली होती.

================================

हे देखील वाचा: Banjara Marathi Movie: निसर्गात हरवून, मैत्रीत रंगणारे ‘बंजारा’ मधील ‘कम ऑन लेट्स डान्स’ गाणे प्रदर्शित !

=================================

भारतीय चित्रपटसृष्टीत कलाकारांची खरी नावं आणि स्क्रिनवरील नावं वेगवेगळी होती आणि आहेतही. त्याचप्रमाणे श्रुतीचं दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत नाव श्रुती प्रकाश (Shruti Prakash) असं आहे. आणि केवळ ‘देवारा’ (Devara 1) चित्रपटच नव्हे तर ‘इंदिरा विझा’, ‘Naan Avanillai 2’, ‘Aravaan’, ‘Aadu Aata Aadu’ अशा तमिळ आणि कन्नड चित्रपटांतही तिनं कामं केली आहेत. (Shruti marathe south indian film list)

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Anushka Sharma Bollywood Entertainment indian cricket team krunal pandya Shruti Marathe virat kohli
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.