Big Budget Films : आगामी बॉलिवूडच्या बिग बजेट चित्रपटांची यादी!

Shweta Tiwari ने मला काठीने मारले होते; अभिनेत्रीच्या EX नवऱ्याने केले गंभीर आरोप…
Shweta Tiwari आपल्या वैयक्तिक जीवनाबद्दल खूप चर्चेत असते. श्वेता तिवारीने दोन विवाह केले आणि दोन्ही विवाह फाल काही काळ टीकू शकले नाहीत. श्वेताने पहिला विवाह अभिनेता राजा चौधरीसोबत केला होता आणि दुसरा विवाह अभिनव कोहलीसोबत. आणि श्वेता ने दोन्ही वेळेला दोन्ही नवऱ्यांवर घरगुती हिंसाचाराचे आरोप केले होते. पण तिच्या दुसऱ्या पतीने अभिनेत्रीवर ही आरोप केले होते. श्वेता ने राजा चौधरीशी घटस्फोट घेतल्यानंतर काही कालानंतर अभिनव कोहलीसोबत लग्न केले होते. दोघांना या लग्नातून एक मुलगा ही आहे. पण काही काळानंतरच दोघे विभक्त झाले. श्वेताने अभिनव विरोधात तक्रार नोंदवली होती. त्याच्यावर घरगुती हिंसाचाराचे आरोप लावले होते. तथापि, नंतर अभिनव कोहलीनेही आपली बाजू मांडली होती आणि त्याने उलट श्वेतावरच आरोप केले होते.(Abhinav Kohli On Shweta Tiwari)

अभिनव कोहली आणि श्वेता तिवारी अनेक वर्षांपूर्वी वेगळे झाले आहेत आणि श्वेता ने एका मुलाखतीत सांगितले होते की ती घरगुती हिंसेची शिकार झाली होती आणि अभिनव ने तिच्यावर हात उचलला होता.असे झाल्यावर तिच्या पतीने उत्तरात सांगितले की त्यांनी मान्य केले की एकदा त्याने श्वेता ला कानाखाली मारली होता पण श्वेताने पण मला मारल होत अस तो म्हणाला. अभिनव कोहली ने सांगितलं होतं, ‘मी श्वेता ला कधीही मारलं नव्हतं, ज्याचा उल्लेख पलक ने आपल्या खुल्या पत्रात केला होता की, मी तिच्या कानाखाली मारली होती पण त्यासाठी मी दोघींचीही माफी मागितली होती. हे सगळं श्वेता तिवारीने पसरवलेला गोंधळ आहे. ज्यामुळे हे सिद्ध होऊ शकेल की मी घरगुती हिंसा केली आहे. पण हे खरं नाही. मी कधीही महिलांना मारलं नाही.’

त्याने पुढे अस ही सांगितले होते की, ‘उलट श्वेता नेच मला काठीने मारले आहे. श्वेता म्हणते की मी भडकतो, पण मी कोणालाही मारले नाही. पण श्वेताने मला मारले आणि जेव्हा तिने असे केले तेव्हा कोणीही आलं नाही कारण मी माध्यमांमध्ये गेलो नाही. श्वेताने मला मारले. तिच्या मुलीचा तिने वापर केला आणि माझ्यावर चुकीचे आरोप लावले . जगासमोर माझी चुकीची प्रतिमा तयार केली.’
===============================
हे देखील वाचा: ‘देवमाणूस’ मध्ये Sai Tamhankar पहिल्यांदाच थिरकणार लावणीवर!
===============================
२०१७ मध्ये आमची भांडण झाली आणि ती माझ्या ३ महिन्यांच्या बाळाला घेऊन गेली. मी तिला भेटण्याचा प्रयत्न केला, मी इन्स्टाग्रामवर एक फोटो देखील शेअर केला ज्यामध्ये माझ्या डोळ्याखाली काळा ठसा दिसतो. अस ही अभिनव म्हणाला होता.