‘अमानुष’ : उत्तमकुमार- Sharmila Tagore यांचा अप्रतिम सिनेमा!

Siddharth Jadhav : “मला मराठी चित्रपटांसाठी मल्टिप्लेक्स बांधायचंय!”
मराठी चित्रपटांना पुन्हा एकदा सुगीचे दिवस आले आहेत… ‘गुलकंद’, ‘आता थांबायचं नाय’ या अशा बऱ्याच मराठी चित्रपटांना प्रेक्षकांचा हाऊसफुल्ल प्रतिसाद मिळताना दिसत आहे… शिवाय, मेकर्स विविध विषयांवर आधारित नवे चित्रपट आणि जन्या गाजलेल्या चित्रपटांचे सीक्वेल्सही आणत आहेत… सध्या संजय जाधव दिग्दर्शित ‘येरे येरे पैसा ३’ (Yere Yere Paisa 3) हा चित्रपट थिएटर गाजवत असून प्रेक्षक उत्तम प्रतिसाद देत आहेत… अशात सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) याने मराठी चित्रपटांसाठी त्याला मल्टिप्लेक्स बांधायचं आहे अशी इच्छा व्यक्त केली आहे… नेमकं तो काय म्हणाला जाणून घेऊयात…

मराठीसह हिंदीतही आपल्या अभिनयाची अमिट छाप उमटवणारा हरहुन्नरी अभिनेता म्हणजे सिद्धार्थ जाधव… एकांकिका ते बॉलिवूडची बिग स्क्रिन गाजवणारा सिद्धार्थ मात्र मराठीत अधिक रमतो… नुकत्याच लोकमत फिल्मीला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सिद्धार्थने मराठी सिनेमासाठी थिएटर बांधण्याची इच्छा व्यक्त केली.
सिद्धार्थ म्हणाला की, “मी मराठीसोबत बाकीचे चित्रपट खूप फॉलो करतो. म्हणजे बंगाली वगैरे… तर तिथे ना देव, जीत नावाचे सुपरस्टार आहेत…त्यांनी बंगालमध्ये स्वत:चे मल्टिप्लेक्स बांधले आहेत. तर मला असं वाटतं की आमच्यासाठी आयकॉनिक म्हणजे मराठी चित्रपटांचं माहेरघर जे लहानपणापासून आपण ऐकतोय ते म्हणजे भारतमाता थिएटर, प्लाझा थिएटर किंवा पुण्याचं प्रभात थिएटर. मला माहित नाही किती पैसे लागतील ते बांधण्यासाठी पण मला मराठी चित्रपटांसाठी असं एक थिएटर किंवा मल्टिप्लेक्स बांधायचंय की पुढच्या येणाऱ्या पिढीला कळेल की हे मराठी चित्रपटांचं हे माहेरघर आहे”.
================================
हे देखील वाचा: ”नवोदित कलाकारांचे द्रोणाचार्य…” अभिनेता सिद्धार्थ जाधव ने अशोक मामांसाठी लिहिलेली खास पोस्ट चर्चेत
================================
पुढे तो म्हणाला की, “असं काहीतरी करायला मला आवडेल जिथे मराठी चित्रपटांचे शो लागतील. म्हणजे ३-४ स्क्रीन असतील आणि मराठी चित्रपटच फक्त लागतील. ते पुढच्या पिढीसाठी मराठी सिनेमाचं माहेरघर असेल ज्याचं नाव कदाचित भारत माताचा प्लाझा प्रभातमध्ये येऊन सिनेमा पाहा अशी टॅगलाईन वगैरे असेल. हे आयकॉनिक थिएटर अजूनही मनात आहेत. ते सिंगल स्क्रीन होते. तिथे पंखे चालू आहेत. गर्मी आहे पण सिनेमावर प्रेम करणारा प्रेक्षक आहे. ज्याला या गोष्टींची तमा नाही पण तो सिनेमात पूर्ण घुसलाय. तसं काहीतरी थिएटर मला मराठी सिनेमासाठी बांधायला आवडेल”.(Entertainment)
================================
================================
सिद्धार्थ जाधव याच्या सिनेकारकिर्दिबद्दल बोलायचं झालं तर नुकताच त्याचा ‘आता थांबायचं नाय’ हा चित्रपट रिलीज झाला होता. लवकरच त्याचा ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ हा चित्रपटही रिलीज होणार आहे…. यात अशोक सराफ, मकरंद अनासपुरे आणि भरत जाधव यांच्या प्रमुख भूमिका असून चित्रपटाचं दिग्दर्शन अंकूश चौधरी याचं असणार आहे…(Marathi upcoming movies 2025)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi