
Sikandar : पहिल्याच दिवशी ‘सिकंदर’ विकीच्या ‘छावा’ला मागे टाकू शकला?
ईदच्या निमित्ताने सलमान खान याचा ‘सिकंदर’ (Sikandar) चित्रपटअखेर प्रदर्शित झाला आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच अॅव्हान्स बुकिंगमध्ये सिकंदरने कमाई करण्यास सुरुवात केली होती. आणि आता प्रदर्शनानंतर पहिल्याच दिवशी चित्रपटाने किती कमाई केली जाणून घेऊयात… २०२५ वर्षाची सुरुवात विकी कौशलच्या ‘छावा’’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जोरदार केली होती. पण ‘छावा’ला ओपनिंगमध्ये मागे टाकण्यास सलमानचा ‘सिकंदर’ काही अंशी मागे पडला आहे. जाणून घेऊयात आकडेवारी…(Sikandar movie)
सॅकनिल्कने दिलेल्या माहितीनुसार बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी चित्रपटाने २६ कोटी रुपये कमावले आहेत. ३० मार्च २०२५ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘सिकंदर’ची हिंदी ऑक्युपन्सी २०.९५ टक्के होती, तर चेन्नईमध्ये सर्वाधिक ४६.६७ टक्के, बंगळुरूमध्ये २८ टक्के, जयपूर आणि कोलकातामध्ये २४.६७ टक्के, हैदराबादमध्ये २२ टक्के, एनसीआरमध्ये २१ टक्के आणि मुंबईत २०.६७ टक्के प्रेक्षकांची उपस्थिती नोंदवण्यात आली. (Entertainment masala)

दरम्यान, आज ३१ मार्च २०२५ ईदच्या दिवशी ‘सिकंदर’च्या कमाईमध्ये दुप्पटीने वाढ होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. तरण आदर्शच्या मते, सिकंदरवर ‘टायगर ३’ च्या ४३ कोटींच्या ओपनिंगपेक्षा चांगली कामगिरी करेल असे सांगितले आहे. सलमानचा सिकंदर विकी कौशलच्या (Vicky kaushal) ‘छावा’ चित्रपटाला मागे टाकेल असं म्हटलं गेलं होतं. पण ‘छावा’ चित्रपटाने पहिल्या दिवशी ३३.१० कोटींची कमाई केली होती. पण सिकंदर यापूढे जाऊ शकला नाही. (Bollywood movies)

३० वर्षांपेक्षा अधिक काळ सलमान खान (Salman Khan) हिंदी चित्रपटसृष्टीत एकाहून एक दर्जेदार चित्रपट देत सुपरस्टार बनला आहे.. पण आजपर्यंत त्याचा एकही चित्रपट ५०० कोटी क्लबमध्ये गेला नाही आहे.. तर, सिकंदर चित्रपट ५०० कोटींचे बॅक टू बॅक हिट चित्रपट देणारी रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) असल्यामुळे चित्रप ५०० कोटींपर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा आहे… हिंदी चित्रपसृष्टीत रश्मिकाने एन्ट्री केल्यापासून तिने प्रत्येक चित्रपट सुपरहिट दिला आहे. ‘अॅनिमल’ (Animal),’छावा’ (Chhaava) नंतर आता ‘सिकंदर’ (Sikandar) या यादीत यावा अशी अपेक्षा केली जात आहे… (Entertainment news)
===========================
हे देखील वाचा: Sikandar Day 1 Box Office Prediction: सलमान खानचा सिकंदर छावा चा रिकॉर्ड तोडू शकेल? काय सांगतात आकडे?
===========================
ए.आर. मुरुगदास दिग्दर्शित ‘सिकंदर’ (Sikandar) चित्रपटाची साजिद नाडियाडवाला यांनी त्यांच्या नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली याची निर्मिती केली आहे. या सलमान खानसह रश्मिका मंदान्ना, काजल अग्रवाल, सत्यराज, शर्मन जोशी, प्रतीक बब्बर, अंजिनी धवन आणि जतिन सरना हे प्रमुख भूमिकेत आहेत. (Sikandar box office collection)