Jaran Marathi Movie Motion Picture: विवाहिता आणि बाहुली, काय आहे

Sikandar : सलमानच्या चित्रपटाने ‘छावा’ला मागे टाकलं? काय आहे आकडेवारी?
गेले अनेक वर्ष नित्यनियमाने सलमान खानला ईदच्या निमित्ताने त्याच्या चाहत्यांना एक नवा चित्रपट भेट म्हणून देतोय.. यंदाही ‘सिकंदर’ (Sikandar) चित्रपट त्याने प्रेक्षकांसाठी आणला खरा पण खास प्रतिसाद चित्रपटाला मिळाला नाही असं दिसतंय.. ३० मार्च २०२५ रोजी प्रदर्शित झालेल्या सलमानच्या ‘सिकंदर’ची दोन दिवसांची बॉक्स ऑफिसवरील आकडेवारी समोर आली आहे.. जाणून घेऊयात दोन दिवसांत भाईजानच्या चित्रपटाने किती कोटी कमावले आहेत…(Entertainment news)
सॅकनिल्कच्या वृत्तानुसार, ‘सिकंदर’ (Sikandar) चित्रपटाने पहिल्या दिवशी २६ कोटी, दुसऱ्या दिवशी २९ कोटी कमवून दोन दिवसांमध्ये ५५ कोटींचा गल्ला जमवला आहे…खरं तर सलमानचा ‘सिकंदर’ विकी कौशलच्या ‘छावा’ चित्रपटाला मागे टाकेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र, सलमान खान यात यशस्वी होऊ शकला नाही आहे… (Bollywood update)

विकी कौशल (Vicky Kaushal) ‘छावा’ चित्रपट १४ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रदर्शित झाला होता तो आज ४५ दिवस उलटून गेले असले तरीही थिएटर गाजवत आहे.. ‘छावा’ने पहिल्या दिवशी ३१ कोटी आणि दुसऱ्या दिवशी ३७ कोटींची कमाई केली होती.. मात्र, ‘सिकंदर’ ‘छावा’ चित्रपटाला या शर्यतीत अद्याप मागे टाकू शकला नाही… आता पुढे हा चित्रपट किती गल्ला जमवतो आणि कमीत दिवस थिएटरमध्ये टिकतो हे पाहावे लागेल…(Chhaava box office collection)
===========
हे देखील वाचा : Chhaava : चित्रपटातील एका गाण्यात दिसले प्रभू श्रीराम आणि मारुतीराय
===========
A R Murugadoss दिग्दर्शित ‘सिकंदर’ (Sikandar) या चित्रपटात सलमान खान, रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांच्या प्रमुख भूमिका असून त्यांच्यासोबत काजल अग्रवाल, शर्मन जोशी, सत्यराज असे अनेक कलाकार आहेत… दरम्यान, २०२५या वर्षातील रश्मिकाचा हा दुसरा बिग बजेट चित्रपट असून ‘छावा’ (Chhaava) इतकीच किंवा त्यापेक्षा जास्त किंवा जवळपास हा चित्रपट कमाई करेल का हे पाहणं महत्वाचं असणार आहे…(Sikandar movie)