‘तुंबाड’ फेम दिग्दर्शक राही अनिल बर्वे घेऊन येणार Mayasabha; ‘हा’

लहानग्या गरजु मुलांसाठी गायिका Palak Muchhal बनली देवदुत; गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही झाली नोंद
बॉलिवूड इंडस्ट्रीतील बरीच कलाकार मंडळी सामाजिक कार्यात आपला हातभार लावत असतात… काही कलाकार जगजाहिरपणे आपलं सामाजिक कार्य लोकांसमोर मांडतात तर काही जणं गुपचूप आपलं काम सुरु ठेवतात… अशाच एका गायिकेने सध्या ३००० पेक्षा अधिक मुचालांना जीवनदान देण्याचं मोठं सामाजिक कार्य केलं आहे… पलक मुच्छल हिच्या नावे चालणाऱ्या पलक पलाश चॅरिटेबल फाऊंडेशनच्या माध्यमातून भारत आणि परदेशातील जवळपास ३८०० मुलांच्या हॉर्ट सर्जरीसाठी तिने निधी उभा केला आहे… (Palak Muchhal News)

दरम्यान, पलक मुच्चल हिने ३८०० मुलांना केलेल्या या मदतीसाठी तिचं नावं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स आणि लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये स्थान नोंदवण्यात आलं आहे… लहानपणापासूनच लोकांची मदत करावी ही भावना मनात जागृत ठेवून आपलं करणारी पलक गेले अनेक वर्ष कारगिल युद्धात शहीद झालेल्या कुटुंबियांची मदत करत आहे… इतकंच नाही तर तिने गुजरात पुरग्रस्तांनाही १० लाखांची मदत केली होती…
================================
हे देखील वाचा : जेव्हा सिनेमाच्या शौकापायी लहानपणी Dharmendra यांनी बसच्या टपावर बसून प्रवास केला!
================================
पलक मुच्छल ही गेल्या अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीत काम करत असून तिचा नवरा मिथुन शर्मा हा देखील लोकप्रिय संगीतकार आहे… महत्वाचं म्हणजे तिच्या या सामाजिक कार्यात तिच्या नवऱ्याची तिला साथ लाभली आहे…. पलकने आजवर अनेक सुपरहिट गाण्यांना आवाज दिला आहे… यापैकी, ‘मेरी आशिकी’, ‘कौन तुझे’, ‘सनम तेरी कसम’, ‘इक मुलाकात’ ही तिची विशेष गाजलेली गाणी आहेत… (Entertainment News)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi