Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    sulochana chavan

    Sulochana Chavan : हिंदी चित्रपटातील लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचा स्वर!

    Dosti

    Dosti : मैत्रीच्या नात्याची भावस्पर्शी संगीतमय कहाणी!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Preeti Zinta ने कार अपघातात गमावले होते पहिले प्रेम, अभिनेत्रीने

April May 99 Movie: ‘एप्रिल मे ९९’ आता २३ मे

Jr NTR : दादासाहेब फाळकेंच्या भूमिकेत दिसणार RRRचा सुपरस्टार; राजामौली

Amitabh Bachchan : बच्चन यांच्या कुठल्या गाण्यावर राजेश खन्नांनी सडकून

Amir Khan : दादासाहेब फाळके यांच्या बायोपिकसाठी आमिर-हिरानी पुन्हा एकत्र!

Criminal Justice 4: माधव मिश्रा इज बॅक; ट्रायअॅंगल मर्डर मिस्ट्री

Madhuri Dixit : माधुरीला अभिनयात नाही, तर ‘या’ गोष्टीत करायचं

Madhuri Dixit : २३ वर्षांपूर्वी आलेल्या ‘त्या’ चित्रपटातील गाणं शुट

Gulkand : बॉक्स ऑफिसवर सई-प्रसादच्या ‘गुलकंद’चा गोडवा!

PSI Arjun Marathi Movie: ‘पी.एस.आय. अर्जुन’ चित्रपटाच्या ‘प्रमोशनल साँग’चा व्हिडीओ प्रेक्षकांच्या

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Sonu Nigam सोनू निगमने पद्म पुरस्कारांवर व्यक्त केली नाराजी, व्हिडिओ पोस्ट करत म्हणाला….

 Sonu Nigam सोनू निगमने पद्म पुरस्कारांवर व्यक्त केली नाराजी, व्हिडिओ पोस्ट करत म्हणाला….
कलाकृती तडका

Sonu Nigam सोनू निगमने पद्म पुरस्कारांवर व्यक्त केली नाराजी, व्हिडिओ पोस्ट करत म्हणाला….

by Jyotsna Kulkarni 28/01/2025

दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर पद्म पुरस्कारांची (Padma Awards) घोषणा केली जाते. देशातील विविध क्षेत्रातील दिग्गज आणि महान व्यक्तींना सर्वोच्च अशा पद्म पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येते. यंदा देखील पद्म पुरस्कारांची घोषणा केली गेली आणि अनेक मोठ्या व्यक्तिमत्त्वांना या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. मनोरंजनविश्वातील अनेक खास लोकांना या पुरस्काराने सन्मानित केले गेले. मात्र या पुरस्कारांवर मनोरंजनविश्वातील एका मोठ्या गायकाने नाराजी व्यक्त केली आहे. (Padma Awards)

बॉलिवूडमधील प्रसिद्ध आणि लोकप्रिय गायक असलेल्या सोनू निगमने (Sonu Nigam) सोशल मीडियावर एका व्हिडिओ शेअर करत जाहीर करण्यात आलेल्या पद्म पुरस्कारांवर नाराजी व्यक्त केली आहे. २५ जानेवारी रोजी केंद्र सरकारने पद्म पुरस्कार विजेत्यांची घोषणा केली. यात भारतीय संगीतविश्वातील अनेक चेहऱ्यांच्या नावांचाही समावेश आहे. मात्र गायक सोनू निगमने यावर प्रश्न उपस्थित केला आहे. सोनू निगमने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट करून आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्याने व्हिडिओला भारत आणि त्याचे प्रलंबित पद्म पुरस्कार असे कॅप्शन दिले आहे. (Sonu Nigam)

सोनुने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, “भारतात असे काही गायक आहेत, ज्यांनी संपूर्ण जगातील गायकांना प्रेरणा दिलेली आहे. मोहम्मद रफी साहेबांना फक्त पद्मश्री पुरस्कार देण्यात आला. किशोर कुमार यांच्या नशिबात तर पद्मश्री पुरस्कारही नाही. हयात असलेल्या गायकांमध्ये अलका याज्ञिक आहेत. त्यांची कारकीर्द फार मोठी आणि दीर्घ आहे. त्यांना अद्याप कोणताही पुरस्कार मिळालेला नाही. (Sonu Nigam unhappy with Padma Awards 2025)

View this post on Instagram

A post shared by Sonu Nigam (@sonunigamofficial)

श्रेया घोषाल अनेक दिवसांपासून आपली कला सिद्ध करत आहे. सुनिधी चौहानने आपल्या अनोख्या आवाजाने संपूर्ण पिढीला प्रेरित केले आहे. त्यांनाही पुरस्कार मिळालेला नाही. अशी अनेक नावे आहेत, मग ती कोणत्याही क्षेत्रातील असोत, अभिनय क्षेत्रातील असोत किंवा विज्ञान क्षेत्रातील असोत, ज्यांना अजूनही न्याय मिळाला नाही असे वाटत आहे. तुम्हालाही असे वाटत असेल तर, त्यांची नावं कमेंट्समध्ये लिहा.” (Entertainment mix masala)

सोनू निगमच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत मनोरंजनविश्वातील विविध कलाकारांची नावं लिहिली आहेत. यात एका कमेंटने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. ही कमेंट आहे दिवंगत गायक आणि संगीतकार बप्पी लहरी यांचा मुलगा बाप्पा लहरीची. बाप्पा लहरीने कमेंट करत त्याची देखील या पुरस्कारांवर नाराजी व्यक्त केली आहे. (Bollywood Masala)

बाप्पा लहरीने कमेंट्स करताना लिहिले, “सोनू निगम सर तुम्ही अगदी बरोबर बोलत आहेत. भारतीय संगीताला एका वेगळी ओळख देणारे आणि जागतिक स्तरावर आपली ओळख निर्माण करणाऱ्या माझ्या वडिलांसारख्या व्यक्तीला हा पुरस्कार कधीच मिळाला नाही. हे खरोखरच खूपच दुःखद आणि अन्यायकारक आहे. ते फक्त एक संगीत दिग्दर्शकच नव्हते तर ट्रेंड सेटरसुद्धा होते. मात्र त्यांना त्यांच्या कामाची पोचपावती या पुरस्कारांच्या स्वरूपात कधीच मिळाली नाही. संगीतासाठी आपले जीवन अर्पण करणाऱ्या व्यक्तीला मान्यता मिळत नाही हे पाहून खूप वाईट वाटते. परंतु त्यांचा वारसा हा कोणत्याही पुरस्कारापेक्षा जास्त बोलका आहे.”

==================================

हे देखील वाचा: आठवणीतल्या पहिल्या प्रेमाची गोष्ट ‘इलू इलू’…

==================================

दरम्यान सोनू निगमला ‘मॉडर्न रफी’ ही पदवी देण्यात आली आहे. त्याने ३२ हून अधिक भाषांमध्ये सुमारे ६ हजार गाणी गायली आहेत. सोनू निगमला त्याच्या उत्कृष्ट गायनासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार, फिल्मफेअर पुरस्कारासह इतर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. सोनू निगमला २०२२ मध्ये पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे.

यंदा केंद्र सरकारने १३९ पद्म पुरस्कारांची घोषणा केली. कलाक्षेत्रातील योगदानाबद्दल लोकगायिका शारदा सिन्हा यांना मरणोत्तर पद्मविभूषण आणि पंकज उधास यांना मरणोत्तर पद्मभूषण प्रदान करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. यासोबतच आजच्या काळातील सुपरहिट गायक अरिजित सिंगला पद्मश्रीने सन्मानित करण्यात येणार आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bollywood hindi Padma Awards 2025 Singer sonu nigam Sonu Nigam post Sonu Nigam unhappy with Padma Awards 2025 पद्म पुरस्कार बाप्पा लहरी बॉलिवूड गायक सोनू निगम सोनू निगम पोस्ट
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.