Jaran Marathi Movie Motion Picture: विवाहिता आणि बाहुली, काय आहे

गायिका उषा उत्थुप यांचे दुसरे पती जानी चाको उत्थुप यांचे निधन
पॉप आयकॉन उषा उत्तुप यांचे दुसरे पती जानी चाको यांचे अचानक निधन झाले आहे. 8 जुलै रोजी वयाच्या 78 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अखेरच्या क्षणी जॉनी चाको आपल्या कोलकात्यातील घरी उपस्थित होते. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. ९ जुलै मंगळवार म्हणजेच आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. उषा उत्थुप यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, जानी त्यांच्या घरी टीव्ही पाहत असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. जानी चाको यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. जानी यांच्यावर मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली.(Jani Chacko Uthup Death)

जानी चाको उत्थुप हे पॉप आयकॉन उषा उत्थुप यांचे दुसरे पती होते. उषा आणि जानी यांची पहिली भेट सत्तरच्या दशकात प्रतिष्ठित त्रिंकांमध्ये झाली होती. उषा आणि चाको यांना दोन मुले आहेत. त्यांना एक मुलगी अंजली आणि एक मुलगा सनी आहे. उषा आणि जानी यांची पहिली भेट ७० च्या दशकाच्या सुरुवातीला प्रसिद्ध नाइटक्लब ट्रिंकसमध्ये झाली होती. जानी चाको हे उषा यांचे दुसरे पती होते. त्यांचा पहिला विवाह दिवंगत रामू यांच्याशी झाला होता. उषा यांची मुलगी अंजली हिने वडिलांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करत त्याचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

अंजली ने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत लिहिलं आहे की, ‘अप्पा खूप लवकर निघून गेलात. पण तम्ही किती स्टायलिशपणे जगलत. जगातील सर्वात देखणा माणूस, आम्ही तुमच्यावर प्रेम करतो. ” जॉनी चाको यांच्या व्यवसायाबद्दल बोलायचे झाले तर ते चहाच्या बागा क्षेत्राशी संबंधित होते. आणि उषा बद्दल बोलायचे झाले तर त्या म्युझिक इंडस्ट्रीतल्या एक प्रसिद्ध आणि खूप प्रसिद्ध गायिका आहे. त्यांनी बॉलिवूडमध्ये अनेक गाणी गायली आहेत आणि परदेशातही कॉन्सर्ट केल्या आहेत.(Jani Chacko Uthup Death)
=============================
=============================
शशी कपूर यांनी उषा उत्थुप यांना पहिला ब्रेक दिला. उषाने ‘अरमान’, ‘डिस्को डान्सर’, ‘शालीमार’, ‘शान, वर्दत’, ‘अरमान’, ‘रेस’, ‘भूत’, ‘हॅट्रिक’, ‘प्यारा दुश्मन’ आणि ‘जॉगर्स पार्क’ अशा अनेक चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत. ती नेहमीच कांजीवरम साडी, फ्लॉवर गजरा आणि मोठ्या गोल बिंदीत दिसते. हॉटेलमध्ये गाऊन त्यांनी आपल्या गायन कारकिर्दीला सुरुवात केली.