Ranveer Singh : आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ चित्रपटाचा टीझर ‘या’

Amir Khan : ‘सितारे जमीन पर’ मधील झळकणाऱ्या नव्या तारकांबद्दल जाणून घ्या!
२००७ मध्ये आलेल्या आणि प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलेल्या ‘तारे जमीन पर’चा स्पिरिच्युअल सिक्वेल असलेला ‘सितारे जमीन पर’ लवकरच रिलीज होणार आहे. आमिर खानच्या या चित्रपटातून १० नवे कलाकार पदार्पण करणार आहेत. नुकताच या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. जाणून घेऊयात १० नवोदित कलाकारांबद्दल… (Sitare Zameen Par movie)

‘सितारे जमीन पर’ चित्रपटात गुड्डू, सुनील, शर्माजी, करीम, लोटस, बंटू, सतबीर, राजू, गोलू आणि हरगोविंद हे कलाकार झळकणार आहेत. ‘शुभ मंगल सावधान’सारखा टॅबू तोडणारा ब्लॉकबस्टर देणारे दिग्दर्शक आर. एस. प्रसन्ना आता आमिर खान प्रोडक्शन्ससोबत ‘सितारे जमीन पर’मध्ये त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा कोलॅबोरेशन घेऊन परत येत आहेत.
==============================
हे देखील वाचा: Ek Tichi Gosht: नृत्य,संवाद आणि अभिनय यांचा उत्तम मिलाफ असलेली ‘एक तिची गोष्ट’ सांगण्यासाठी कलाकार आले एकत्र…
==============================
आमिर खान आणि जेनेलिया देशमुख यांच्या प्रमुख भूमिकेत असलेला हा चित्रपट अमिताभ भट्टाचार्य यांचे गीत, आणि शंकर-एहसान-लॉय यांचे संगीत घेऊन सजला आहे. दिव्य निधी शर्मा यांनी या चित्रपटाचे पटकथा लेखन केले असून आमिर खान, अपर्णा पुरोहित आणि रवि भागचंदका हे या चित्रपटाचे सह-निर्माते आहेत.