Ramayana Movie : १६०० कोटींच्या भव्य ‘रामायण’ चित्रपटात रणबीर कपूरचं

Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi मधून स्मृती इराणींचं कमबॅक; एका एपिसोडसाठी मिळतात तब्बल ‘एवढे’ पैसे !
भारतीय टेलिव्हिजनसह राजकारणातही आपली वेगळी छाप सोडलेल्या स्मृती इराणी पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर झळकणार आहेत. ‘क्योंकी सास भी कभी बहू थी’ या गाजलेल्या मालिकेचा दुसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे, आणि त्यात पुन्हा एकदा तुलसी विराणी या लोकप्रिय भूमिकेत स्मृती इराणी दिसणार आहेत. १९९९ साली सुरू झालेली ‘क्योंकी सास भी कभी बहू थी’ ही मालिका भारतीय टेलिव्हिजनसाठी क्रांतिकारी ठरली होती. अनेक वर्षं टीआरपीच्या शिखरावर राहिलेली ही मालिका आता पुन्हा नव्या स्वरूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सीझन २ ची अधिकृत घोषणा झाली असून, निर्मात्यांनी नुकताच याचा पहिला लूक जाहीर केला आहे, ज्याला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळतो आहे. (Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi)

एका काळी जिच्या अभिनयाने घराघरात ठसा उमटवला, तीच तुलसी आता नव्या जमान्यात परतते आहे. विशेष म्हणजे, मूळ मालिकेत स्मृती इराणींना एका एपिसोडसाठी केवळ 1800 रुपये मानधन मिळत होतं. पण आता परिस्थिती वेगळी आहे. मिळालेल्या रिपोर्ट्सनुसार, ‘क्यूंकी सास भी कभी बहू थी 2’ या नव्या सीझनमध्ये स्मृती इराणींना एका एपिसोडसाठी तब्बल 14 लाखांचं मानधन मिळत असल्याचं बोललं जातं! अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली तरी, हे आकडे त्यांच्या अद्याप टिकून असलेल्या लोकप्रियतेचं आणि मालिकेच्या यशाबद्दलच्या विश्वासाचे प्रतीक ठरतात.

स्मृती इराणी सध्या केंद्रीय मंत्रीपदाची जबाबदारी पार पाडत असून, त्यांनी स्पष्ट केलं आहे की, टेलिव्हिजनवरील त्यांचा हा पुनरागमन पार्टटाइम असेल. त्या अजूनही पूर्णवेळ राजकारणीच राहणार आहेत. मात्र चाहत्यांसाठी हे कमबॅक पर्व नक्कीच आनंदाची बातमी आहे.
=============================
=============================
‘तुलसी विराणी’ हे पात्र इतकं गडद ठसलं आहे की, आजही लोक स्मृती इराणींना त्या नावानेच ओळखतात. नव्या सीझनचा पहिला लूकही समोर आला असून त्याला भरभरून प्रतिसाद मिळतो आहे. आता सर्वांचं लक्ष या नव्या पर्वाकडे लागलं आहे जिथे जुन्या आठवणींना नव्याने उजाळा मिळणार आहे.