”स्वतःला मारु नकोस” सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येवर स्मृती इराणींचा मोठा खुलासा!
केंद्रीय मंत्री आणि अभिनेत्री स्मृती इराणी या सोशल मीडियावर कायमच चर्चेत असतात. कित्येक वर्ष उलटली असली तरीही स्टार प्लस वरील ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ ही मालिका आज ही प्रेक्षक विसरले नाहीत. या मालिकेत स्मृति इराणी यांनी तुलसी विरानी नावाची भूमिका साकारली होती. जी त्यांची भूमिका आजही प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात आहे. आधी यशस्वी अभिनेत्री आणि आता केंद्रीय मंत्री, स्मृती इराणी यांचा हा प्रवास काही सोपा नव्हता. त्यांच्या याच प्रवासातील काही खास आठवणी त्यांनी शेअर केल्या आहे. नुकतीच स्मृति इराणी यांनी एक मुलाखत दिली आणि या मुलाखतीमध्ये त्यांनी अनेक चांगल्या वाईट आठवणींना उजाळा दिला आहे. या मुलाखतीमध्ये स्मृति यांनी दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आठवणी ही जाग्या केल्या ज्यामुळे त्या त्यांच्या अश्रु रोखू शकल्या नाहीत.(Samriti Irani)
बॉलीवुड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने खुप कमी वेळात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली होती आणि त्यामुळेच त्याचे चाहते आजही त्याला आठवतात. सुशांत या जगात नसला तरी त्याचे चाहते दररोज अभिनेत्याशी संबंधित काही ना काही पोस्ट करत असतात. दरम्यान, केंद्रीय मंत्री आणि माजी अभिनेत्री स्मृती इराणी यांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूबाबत काही गोष्टी शेअर केल्या आहेत ज्याची आता सगळीकडे चर्चा होताना पाहायला मिळत आहे. स्मृती इराणी सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूबद्दल भाष्य करताना म्हणाल्या ”सुशांतच्या मृत्यूची बातमी जेव्हा मला समजली तेव्हा मी एका व्हिडिओ कॉन्फरन्स मध्ये होते. ही बातमी ऐकताच मला धक्का बसला आणि मी ती व्हिडिओ कॉन्फरन्स थांबवली. तेव्हा मला अस वाटल की त्याने मला कॉल का नाही केला? मी त्याला एकदा बोले होते ‘की यार तु स्वतःला कधी मारु नकोस.”
स्मृति इराणी पुढे म्हणाल्या ”मी सुशांत ला खुप आधीपासून ओळखते माझा आणि त्याच्या मालिकेचा मुंबईतील सेट बाजूबाजुला म्हणून मी त्याला ओळखत होतो., मी त्याला अनेकदा सेटवर काम करताना पाहिलं आहे. जेव्हा मला त्याच्या मृत्यूची बातमी मिळाली तेव्हा माझी अवस्था खुप वाईट झाली होती. ”त्यांनी अस ही सांगितले की”सुशांतच्या मृत्यूची बातमी मिळताच मी लगेच अमित साधला फोन केला. मला वाटलं त्याने अस पाऊल उचलू नये, मला त्याची खूप भीती वाटत होती. मी ताबडतोब त्याला फोन करून त्याच्या तब्येतीची विचारपूस केली. त्यानंतर मी अमितशी सुमारे दोन तास चर्चा केली” हे सांगत असताना स्मृती यांना अश्रु अनावर झाले आणि मुलाखत सुरु असतानाच त्या रडायला लागल्या.(Samriti Irani)
===================
(हे देखील वाचा: केवळ यशस्वी अभिनेत्री नाही तर, तापसी आहे उत्तम बिझनेसवुमन…)
===================
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतचे 14 जून 2020 रोजी निधन झाले होते. अभिनेत्याने त्याच्या राहत्या घरीच गळफास घेऊन स्वतःच आयुष्य संपवल होत. सुशांतच्या आत्महत्येची बातमी ऐकून त्याच्या चाहत्यांना आणि बॉलिवूड स्टार्सना धक्का बसला होता. आजही त्याचे चाहते त्याला न्याय मिळावा म्हणून विनवणी करत आहे.