Bollywood Movies : महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी बॉलिवूडच्या सुपरहिट चित्रपटांचं झालंय

Actress Snehlata Vasaikar आता होणार माईसाहेब; ‘तुझ्यासाठी तुझ्यासंगं’ मालिकेत करणार दमदार एंट्री!
‘तुझ्यासाठी तुझ्यासंगं’ ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली असून १४ जुलैपासून ती ‘सन मराठी’ वाहिनीवर प्रक्षेपित होणार आहे. पहिल्या नजरेतल्या प्रेमाची गोष्ट सांगणाऱ्या या मालिकेचे प्रोमोज सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. प्रेक्षकांकडून मालिकेला सकारात्मक आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. तेजा आणि वैदही यांच्या नव्या जोडीसह मालिकेत अजून एक महत्त्वाची आणि लक्षवेधी भूमिका अभिनेत्री स्नेहलता वसईकर साकारत आहे. (Actress Snehlata Vasaikar)

या मालिकेत स्नेहलता ‘माईसाहेब’ या खलनायिकेच्या भूमिकेत दिसणार असून, ही व्यक्तिरेखा गडद, राजकारणात पारंगत, गावासाठी झगडणारी, मुलावर जीवापाड प्रेम करणारी आणि अनेक भावछटांनी सजलेली आहे. ही केवळ खलनायिकेची भूमिका नसून, तिच्या भावविश्वामध्ये अनेक अंतर्गत संघर्ष, सत्ता आणि स्नेह यांचं मिश्रण आहे. स्नेहलता सांगते की, याआधी मी स्वतःच ठरवलं होतं की वयापेक्षा मोठं पात्र कधी करायचं नाही. पण माईसाहेबचं पात्र ऐकताच मी त्या भूमिकेच्या प्रेमात पडले. तिच्या व्यक्तिमत्त्वातला दम मला सतत सजग ठेवतो.

या भूमिकेसाठी विशेष लूक तयार करण्यात आला असून स्नेहलता सांगतात की, “प्रेक्षक मला या नव्या रुपात पाहून थक्क होतील. एवढा बदल मी पहिल्यांदाच अनुभवतेय.” सध्या मालिकेचं शूटिंग नाशिकमध्ये सुरू आहे. मुंबई-नाशिक प्रवास करतानाच कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागतात, पण घरच्यांचा पाठिंबा हे माझं मोठं बळ आहे, असं त्या सांगतात.तिच्या १२ वर्षांच्या मुलीने, शौर्याने दिलेली प्रतिक्रिया या सगळ्यात जास्त भावणारी ठरली. “मम्मा, तुला खतरनाक रोल करायला मिळतोय, तू नक्की कर. मला माईसाहेबच्या भूमिकेत तुला बघायचंय,” असं जेव्हा शौर्याने म्हटलं, तेव्हा मला त्या भूमिकेसाठी हवं असलेलं आत्मविश्वास आणि उर्जा मिळाली. माझ्या नवऱ्यानेही ही भूमिका स्वीकारताना मला पूर्ण पाठिंबा दिला. (Actress Snehlata Vasaikar)
=================================
=================================
‘तुझ्यासाठी तुझ्यासंगं’ ही मालिका आता स्नेहलता वसईकरच्या या नव्या अवतारामुळे अधिकच रंगतदार ठरणार आहे. पहिल्या प्रेमाची कोवळी नाजूक गोष्ट आणि त्यावर साकारलेले सत्तेचे सावट यामुळे मालिका केवळ प्रेमकथा न राहता एक बहुपरतीय नाट्य बनतेय, याची झलक पहिल्याच प्रोमोजमधून मिळते. स्नेहलता यांचं अभिनय कौशल्य आणि माईसाहेबसारखी गडद भूमिका यांची संगत प्रेक्षकांच्या मनात नक्कीच घर करेल.