महाराणी येसूबाईंच्या भूमिकेतले अमृता खानविलकरचे फोटो व्हायरल
.. म्हणून सुखविंदर सिंग विहिरीत उडी मारणार आहेत.
चक दे इंडिया, जय हो, कर हर मैदान फतेह सारखी इन्स्पिरेशनल आणि देशभक्तीपर गाणी असोत, चल छैय्याँ छैय्याँ, लगन लगन , रमता जोगी, दर्द-ए-डिस्को सारखी प्रेमाच्या वेगवेगळ्या छटा दाखवणारे गाणी असोत या प्रत्येक गाण्याचा आत्मा ओळखून त्यात जीव ओतणारा अवलिया गायक म्हणजे सुखविंदर सिंग ! सुखविंदर सिंगने (Sukhwinder Singh) गाण्याच्या प्रत्येक शैलीवर एवढी हुकूमत गाजवली आहे की, त्यांच्या उत्तुंग सुरांमुळे मनात बैचेनीचे ढग जमा होतात तर कधी त्यांच्या सुरांवर सर्वकाही उधळून टाकावे असे होते. सुखविंदर यांच्या गायकीत जेवढे रंग आहेत त्याच्या पेक्षा कितीतरी रंग त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात आहेत आणि आज आपण त्यावरतीच एक नजर टाकणार आहोत.
सुखविंदर सिंग (Sukhwinder Singh) यांचा जन्म अमृतसर मध्ये झाला. आपल्याला अशा महान गायकाबद्दल असे वाटते की, त्यांना लहानपणापासूनच गायनाची आवड असावी पण मजेशीर गोष्ट अशी की, त्यांना खेळात खूप रस होता आणि १०० मीटर पळण्यात भारतासाठी गोल्ड मेडल जिंकण्याचे त्यांचे स्वप्न होते. ते १५-१५ तास पळण्याचा सर्व करायचे आणि मग रियाझ. नियतीच्या मनात मात्र वेगळे होते.
झालं असे की, एका गायनाच्या स्पर्धेत छोट्या सुखविंदरचे खूप कौतुक केले गेले. त्यामुळे रनर सुखविंदर सिंगर बनला ! छोटे मोठे कार्यक्रम करत करत एके दिवशी सुखविंदरने मलकितसिंग यांच्यासाठी ‘तुतक तुतक तुतीया’ हे गाणे कंपोझ केले आणि ते खूप गाजले आणि त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली.
टी सीरिजने लगेच या टॅलेंटसोबत ‘मुंडा साऊथ हॉल दा’ नावाचा अल्बम काढला. तो सुद्धा खूप हिट झाला. यानंतर सुखविंदर लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या ग्रुपमध्ये म्युझिक अरेंजर म्हणून काम करू लागले. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनीच त्यांना पहिले हिंदी गाणे दिले. १९८८ साली आलेल्या सुरमा भोपाली या फिल्म मधील गाण्याने त्यांचे बॉलिवूडमध्ये डेब्यू झाले. मग लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनीच संगीत दिलेल्या यतीम, फतेह, अंबा, बंजारा फिल्म्समध्ये त्यांनी गायन केले.
त्यांनी त्यावेळी कारकिर्दीवरती नजर टाकली आणि त्यांना जाणवले की सगळी गाणी आपल्याला लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनीच दिली आहेत आणि त्यांना म्हणावे तेवढे आपलयाला यश मिळत नाहीये. मग त्यांनी वर्ल्ड टूरवरती जाण्याचे ठरवले. ते तब्बल १२ देशात फिरले आणि वेगवगेळ्या गाण्यांच्या शैलीचा अभ्यास केला.
वल्ड टूर वरून माघारी आल्यावर त्यांनी बॉलिवूडमध्ये गायन चालूच ठेवले त्यासोबत ते साऊथ मध्ये देखील गाऊ लागले. १९९७च्या दरम्यान १२-१३ फिल्ममधे गाणी गायली. साऊथ मध्ये असताना त्यांचा ए आर रहमान यांच्याशी ओळख झाली. दोघांनी पहिल्यांदा ‘तक्षक’ फिल्मसाठी काम केले नंतर ‘दिल से’ साठी पण ‘दिल से’ १९९८ मध्ये रिलीज झाली आणि ‘तक्षक’ १९९९ साली आणि ‘दिल से’ मधील चल छैय्याँ छैय्याँसाठी त्यांना फिल्फेअर अवॊर्ड तर मिळालेच पण हे गाणं एवढं प्रसिद्ध झाले की त्यांना खूप सारी प्रसिद्धी देखील मिळाली.(Sukhwinder Singh)
दिल से फिल्म पर्यंत त्यांना शाहरुख खान बद्दल त्यांना माहिती नव्हते. चल छैय्याँ छैय्याँच्या शुटवेळी हा ट्रेनवरती चढून नाचणारा मुलगा कोण आहे? असे त्यांनी ए आर रहमान यांना विचारले होते. रहमान सोबत सुखविंदर यांनी १९९९ साली ‘ताल’ फिल्मसाठी ७ गाणी गायली आणि ती सुखविंदर यांच्या सुफियाना, एनरजेटीक स्टाइलने वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवली.
=========
हे देखील वाचा : पांच : फिल्म रिलीज झाली नाही तरी लाखो लोकांनी पाहिली !
=========
९०च्या दशकाच्या शेवटी त्यांनी तेजपाल कौर यांच्याशी लग्न केले. तेजपाल या चंदीगड मधील एका पंजाबी पेपर साठी पत्रकार म्हणून काम करायच्या तसेच त्या गीतकार सुद्धा होत्या. लग्नानंतर दोघांनी ‘बी फॉर भांगडा डी फॉर डान्स’ नावाचा एक अल्बम काढला. तो अल्बम सुपरहिट ठरला. दरम्यान दोघांमध्ये काही कारणामुळे मतभेद होऊ लागले होते. पण हे एका घटनेमुळे विकोपाला गेले जेव्हा तेजपाल दिल्लगी फिल्मसाठी गीतकार म्हणून काम करत होत्या तेव्हा काही कारणामुळे त्यांचे सहारा स्टुडिओ मध्ये जाण झाले तर तिथे सुखविंदर एका गाण्याचे रेकॉर्डिंग करत होते. तस करण्याची परवानगी ना म्युझिक कंपनीची घेतली होती ना तेजपालची. ते गाणं होते दाग दि फायर फिल्ममधील मेरा लकी कबुतर ! तेजपाल यांनी लकी कबुतर ही लाइन लिहिली होती आणि त्यातील काही लाइन्स बदलून जावेद अख्तर यांनी हे गाणी लिहिले होते. या गाण्यावरून तेजपाल आणि सुखविंदर (Sukhwinder Singh) यांच्यात खूप मोठी भांडणे झाली आणि त्याचे पर्यावसन घटस्फोटात झाले. लग्नाच्या ५ वर्षानंतर दोघे विभक्त झाले. पुढे सुखविंदर खूप वर्षे एका अनुरूप जोडीदाराच्या शोधात राहिले आणि २०१७ साली त्यांनी एका पत्रकार परिषदेत मिश्कीलपणे म्हटले की, मला जर आता जोडीदार नाही मिळला तर मी विहिरीत उडी मारेन !