‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
पंचम यांची काही सदाबहार गाणी…
काही कलाकृती/गाणी कधीच जुनी होत नाहीत किंबहुना कालानुरूप त्यातील नवनवीन सौंदर्य स्थळे जाणवल्याने त्या आणखीनच आवडू लागतात. संगीतकार आर डी बर्मन तथा पंचम यांच्या संगीताबाबत असेच म्हणावे लागेल. पंचम हयात होता तोवर रसिकांनी त्याला फारसं कधी सिरीयसली घेतलंच नाही पण तो गेल्यावर त्याच्या एकेका गाण्याची त्यात त्याने केलेल्या अभिनव प्रयोगाची चर्चा सोशल मिडीयाच्या माध्यमातून जगभर चालू असते. आज २७ जून पंचमचा जन्म दिन. त्याच्या एका गाण्याची आठवण. “ये साये हैं ये दुनिया हैं परछाईं ये साये हैं भरी भिड में खाली तनहाईंकी ये साये हैं” पंचमने स्वरबद्ध केलेलं असच हे “सितारा” सिनेमातील गीत. ऐंशीच्या दशकाततील हा सिनेमा आज कुणालाही आठवण्याची सुतराम शक्यता नाही; पण हे गाणं आजही काळजाला भिडतं. Some of Pancham’s evergreen songs …
हे देखील वाचा: बॉलिवूडवर अधिराज्य गाजवणारे हरहुन्नरी कादर खान !
पंचमच्या अचाट सूर सामर्थ्याच प्रत्यंतर येतं. ऐंशीच्या दशकाच्या उत्तरार्धात पंचमची अवस्था या गीताप्रमाणेच “गर्दीतील एकले पणाची” होती. नवीन संगीतकाराच्या भाऊगर्दीत तो चौकटीच्या बाहेर पडला होता. पंचमला अभिजात पाश्चात्य नृत्य संगीताची मोठी गोडी होती. साठच्या दशकाच्या अखेरीस त्याचा एक सिनेमा आला होता नासिर हुसैन यांचा “प्यार का मौसम” यातील “तुम बिन जाऊं कहां” या गाण्याची मोहिनी आजही कायम आहे. यात त्याने म.रफी आणि किशोरकुमार या दोघांच्या स्वरात हे गाणं ध्वनीमुद्रीत केलं आहे. सिनेमात हे गाणं पीसेस मध्ये बर्याचदा येतं. पंचमने या करीता केलेली वाद्यरचना अफाट होती.
किशोरचा स्वर भारत भूषण साठी वापरला. तो काळ रफीचा होता. आराधना अद्याप प्रदर्शित व्हायचा होता…! त्यामुळे मुख्य नायकाकरीता म्हणजे शशीकपूरसाठी रफीचा आवाज होता. या गाण्यातील मेंडोलीनचा अतिशय सुंदर वापर करण्यात आला. हे मेंडोलीन मनोहारी सिंग यांनी वाजवले आहे. अंतर्यातील व्हायोलीनचे पीसेस मनात आजही ताजे आहेत. मजरूह सुलतान पुरी यांनी लिहिलेल्या या गीतातील भावना रसिकांना ओलावून गेल्या. वस्तुत: हे गाणं किशोर-पंचमच्या “एक दिन पाखे उरे जे आकाशे” या बंगाली गीताच्या चालीवर बेतलं होतं. रफी आणि किशोर या दोघांनी अतिशय अप्रतिम गायलं.
रफीचं व्हर्जन जरा जास्त लोकप्रिय ठरलं कारण ते नायकावर चित्रीत होतं. किशोरच्या व्हर्जनमधील ओपनिंग सुरावटीची कल्पना पंचमचीच होती. या गाण्याने सिनेमाच्या कथानकाला पुढे नेण्याचं मोठं काम तर केलंच आहे शिवाय त्यातील साकार झालेल्या भावनांनी व्यक्तीरेखांमधील नाते संबंध दृढ व्हायला मदत मिळाली. नासिरच्या पुढच्या दोन सिनेमात यादोंकी बारात (टायटल सॉंग) आणि हम किसीसे कम नही (क्या हुआ तेरा वादा) अशाच प्रकारचे मध्यवर्ती गीत टाकून सिनेमाच्या यशाचा पाया घट्ट केला. त्या अर्थाने हे गाणे ऐतिहासिकच म्हणावे लागेल…!
हे वाचलंत का: बेगम पारा: भारताची पहिली बोल्ड अभिनेत्री…
आज ४ जानेवारी पंचम तथा आर डी बर्मन यांचा स्मृती दिन. (४ जानेवारी १९९४) त्या निमित्ताने हा किस्सा रसिकांना नकीच आवडेल. 4 January – Music Composer R. D. Burman Death Anniversary