Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    sulochana chavan

    Sulochana Chavan : हिंदी चित्रपटातील लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचा स्वर!

    Dosti

    Dosti : मैत्रीच्या नात्याची भावस्पर्शी संगीतमय कहाणी!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Jarann Marathi Movie Teaser: ‘भूतकाळातून सुटका अशक्य आहे’; ‘जारण’ चा

‘Hera Pheri 3 ‘मधून बाहेर पडले Paresh Rawal; निर्मात्यांसोबत झालेल्या

लग्नाआधी फिजिकल रिलेशन योग्य की अयोग्य? Aishwarya Rai ने दिलेल्या उत्तराने सगळे झाले

April May 99 Movie: ‘थ्री इडियट्स’च्या टीमने दिल्या ‘एप्रिल मे

Amir Khan : ‘सितारे जमीन पर’ मधील झळकणाऱ्या नव्या तारकांबद्दल

Mohammed Rafi : रफी यांनी गाणी गायचे बंद करण्याचा निर्णय

Ott Relelease May 2025 :या आठवड्यात ओटीटीवर काय पाहाल?

Mehboob Khan : ‘मदर इंडिया’ क्लासिक चित्रपटाचे जनक!

Cannes Film Festival 2025 : छाया यांची भावनिक पोस्ट; “जुनी

Dhadkan : चित्रपटाचा क्लायमॅक्स दु:खी असणार होता पण… ५ वर्ष

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

नाही कळले कधी.. जीव वेडावला

 नाही कळले कधी.. जीव वेडावला
मिक्स मसाला म्युझिक मस्ती

नाही कळले कधी.. जीव वेडावला

by गणेश आचवाल 03/12/2020

मालिकांची शीर्षकगीतं तर लोकप्रिय होतातच,पण मालिकांमध्ये सुद्धा एखादं गीत खूप हिट होतं आणि त्यालाही प्रचंड लोकप्रियता लाभते. असंच घडलं होतं ‘होणार सून मी ह्या घरची’ या झी मराठीवरील मालिकेतील एका प्रेमगीताच्या बाबतीत. त्या गीताची जन्मकथा सुद्धा खूप रंजक आहे. ‘होणार सून मी ह्या घरची’ मालिका प्रचंड हिट झाली होती. श्री आणि जान्हवी ह्या व्यक्तिरेखा लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवत होत्या. दिग्दर्शक मंदार देवस्थळी यांचा संगीतकार निलेश मोहरीरला फोन आला की आपल्याला या मालिकेत एक प्रेमगीत करायचं आहे आणि उद्या सकाळी त्याचे शूटिंग करायचे आहे.

संगीतकार निलेश मोहरीरने गीतकार मंदार चोळकर याला फोन केला. आजच्या आजच रात्री गाणे लिहून, त्याला संगीतबद्ध करून ते गाणे अप्रूव्ह करून घेऊन मग रेकॉर्डिंग करायचं आहे, असं मंदारला सांगितलं. पुढे काय घडलं हे सांगताना या गीताचा गायक मंगेश बोरगावकर म्हणाला, “मी त्यावेळी गोरेगावला एका शूटिंगमध्ये होतो आणि हे निलेशला माहित होतं. त्यानं मला माझं काम झाल्यावर पार्ल्याच्या बझ – इन स्टुडिओत यायला सांगितलं. हे गीत युगुलगीत असल्याने निलेशने गायिका सावनी रवींद्र हिला फोन केला होता. ती त्यावेळी पुण्यात होती. ती म्हणाली की मी लगेच पुण्याहून निघते आणि मग रात्री साडे अकराच्या सुमारास ती स्टुडिओत आली.

तोपर्यंत मंदारने लिहिलेल्या ‘नाही कळले कधी जीव वेडावला, ओळखू लागलो, तू मला मी तुला’ या ओळी निलेशने मंदार देवस्थळीला पाठवल्या होत्या. सर्वांना त्या ओळी आवडल्या. मग माझ्या आणि सावनीच्या आवाजात गाणे ध्वनिमुद्रित झाले”.

यापुढचा किस्सा अजून मस्त आहे. गाणे रेकॉर्ड करून पाठवले तेव्हा रात्रीचे दोन वाजले होते. गाणे आवडले, पण पुन्हा असं सांगण्यात आलं की अजून एखादी ओळ काहीतरी यात हवी आहे. गीतकार मंदार चोळकर याला रात्री पुन्हा फोन केला. तेव्हा मंदार चोळकरला झोपेतून उठवले आणि एक ओळ सांग, असे सांगण्यात आले. तेव्हा त्याने ओळ लिहून दिली ‘तू मला मी तुला, गुणगुणू लागलो, पांघरू लागलो, सावरू लागलो’ ही ओळ त्या गीतात समावेश करून पुन्हा संपूर्ण गाणे पाठवले गेले. ते गीत जेव्हा मंदार देवस्थळी याने ऐकले, तेव्हा मालिकेचे शूटिंग रात्री चालू होते. मंदारला आणि सेटवरील सर्वांना ते गाणे खूप आवडले आणि मग  दुसऱ्या दिवशी ते गाणे चित्रित होणार असे ठरले.

हे ही वाचा : ‘स्पर्धा स्वत:शीच करा, तरच लांबचा पल्ला गाठालं’, सावनी रविंद्र

दुसऱ्या दिवशी शशांक केतकर आणि तेजश्री प्रधान अर्थात श्री आणि जान्हवी यांच्यावर हे गीत ठाणे परिसर, उपवन अशा ठिकाणी चित्रित केले गेले. संगीतकार निलेश मोहरीर, गीतकार मंदार चोळकर, गायक मंगेश बोरगावकर आणि गायिका सावनी रवींद्र असं टीम वर्क प्रचंड यशस्वी झालं. आजही मंगेशला त्याच्या कार्यक्रमात हे गीत गायची फर्माईश केली जाते. मालिकेतलं तुफान यशस्वी झालेलं प्रेमगीत असा या गीताचा उल्लेख करावा लागेल.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bollywood Music Entertainment marathi Show Marathi songs Singer zee marathi
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.