
Son Of Sardar 2 : अजय देवगणचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ५० कोटी देखील पार करेना….
अजय देवगण आणि मृणाल ठाकूर यांची प्रमुख भूमिका असणारा ‘सन ऑफ सरदार २’ (Son Of Sardar 2) चित्रपट १ ऑगस्ट रोजी रिलीज झाला. याच दिवशी तृप्ती डिमरी व सिद्धांत चतुर्वेदी यांचा ‘धडक २’ देखील रिलीज झाल्यामुळे आधीपासून थिएटरमध्ये धुमाकूळ घालत असणाऱ्या ‘सैय्यारा’ चित्रपटामुळे ‘धडक २’ (Dhadak 2) आणि ‘सन ऑफ सरदार २’ यांना प्रेक्षकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही आहे… जाणून घेऊयात ‘सन ऑफ सरदार २’ चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन…

सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार सन ऑफ सरदार २ चित्रपटाने पहिल्या दिवशी ७.२५ कोटी, दुसऱ्या दिवशी ८.२५ कोटी, तिसऱ्या दिवशी ९.२५ कोटी, चौथ्या दिवशी २.२५, पाचव्या दिवशी २.७५ कोटी, सहाव्या दिवशी १.६४ कोटी, सातव्या दिवशी १.४० कोटी कमवत आत्तापर्यंत चित्रपटाने केवळ ३२.८९ कोटींची कमाई केली आहे… विशेष म्हणजे सन ऑफ सरदार १ या चित्रपटाने १०५.०१ कोटी कमावले होते…(Son of sardar 2 box office collection)
================================
=================================
दरम्यान,या पूर्वी आलेल्या अजय देवगण याच्या ‘रेड २’ (Raid 2) चित्रपटाने सगळे रेकॉर्ड मोडित काढले होते… १२० कोटींच्या बजेटमध्ये तयार करण्यात आलेल्या रेड २ ने १७९.३० कोटी कमावले होते…. इतकंच नाही कर गेल्या १० वर्षांचा अजय देवगणच्या चित्रपटांचं कलेक्शन पाहिलं तर प्रत्येक चित्रपटाने १०० कोटींचा टप्पा पार केला आहेच… ‘तानाजी’ (२७७.७५ कोटी),’ ‘दृश्यम २’ (२३९.६७ कोटी), ‘टोटल धमाल’ (१५५.६७ कोटी) अशी प्रत्येक चित्रपटांनी यशस्वी कमाई केली आहे… मात्र, ‘सैय्यारा’ (saiyaara) चित्रपटाच्या गोंधळात अजय देवगण आणि मृणाल ठाकूरचा चित्रपट चांगलाच रखडला आहे…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi