Dadasaheb Phalke यांच्या आधीही मराठी माणसाने चित्रपट तयार केला होता!

Sonakshi Sinha चा चित्रपट ‘सैयारा’मुळे चांगलाच आपटला; १ कोटींचाही टप्पा झाली नाही पार
सगळीकडे सध्या ‘सैयारा’ (Saiyaara) चित्रपटाची चांगलीच क्रेझ निर्माण झालेली दिसत आहे… अहान पांडे आणि अनित पड्डा यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या या लव्ह स्टोरीने भल्या भल्या कलाकारांच्या चित्रपटांना मागे टाकलं आहे… सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) हिची प्रमुख भूमिका असणारा ‘निकिता रॉय’ (Nikita Roy) हा चित्रपट १८ जुलै रोजीच प्रदर्शित झालेल्या सैयारामुळे सपशेल आदळला असून चित्रपटाने १ कोटींचा टप्पा देखील बॉक्स ऑफिसवर पार केला नाही आहे…(Bollywood News)

निकिता रॉय या चित्रपटाचं दिग्दर्शन कुश सिन्हा याने केलं होतं… त्याचा हा पहिलाच दिग्दर्शकिय चित्रपट सुपर फ्लॉप ठरला आहे… सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार निकिता रॉय या चित्रपटाने पहिल्या दिवशी २२ लाख, दुसऱ्या दिवशी २४ लाख, तिसऱ्या दिवशी ४० लाख आणि चौथ्या दिवशी १० लाख कमवत आत्तापर्यंत केवळ ९६ लाखांचं कलेक्शन केलं आहे… आत्तापर्यंतच्या सोनाक्षीच्या चित्रपटांपैकी ही सर्वात कमी कमाई झाली आहे…(Nikita Roy movie box office collection)

तर, दुसरीकडे अहान पांडे यांच्या सैयारा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी २१.५ कोटी, दुसऱ्या दिवशी २६ कोटी, तिसऱ्या दिवशी ३५.७५ कोटी, चौथ्या दिवशी २३.५ कोटी, पाचव्या दिवशी ४.३४ कोटी कमवत आत्तापर्यंत अवघ्या ५ दिवसांत १११.०९ कोटींची कमाई केली आहे… महत्वाचं म्हणजे केवळ ६० कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने अवघ्या ५ दिवसांत बजेटची कमाई दुप्पटरित्या वसूल केली आहे…(Saiyaara movie box office collection)
================================
=================================
इतकंच नाही, तर सैयारा चित्रपट पाहून यंगस्टर्स अक्षरश: थिएटरमध्ये ढसाढसा रडत आहेत… तसेच, या चित्रपटाच्या क्रेझमुळे अजय देवगणच्या सन ऑफ सरदार २ चित्रपटाची रिलीज डेट देखील २५ जुलै वरुन आता १ ऑगस्ट २०२५ करण्यात आली आहे… आता सैयारा चित्रपट ५०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री करणार का याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे…(Entertainment)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi