Wagh Aala Marathi Rap: कोल्हापुराचा यंग रॅपर ‘ए किंग’चा हटके

Sonalee kulkarni वर कोसळला दुःखाचा डोंगर; भावाच्या निधनाने अभिनेत्री भावूक, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना…
मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाने वेगळी ओळख निर्माण करणारी सोनाली कुलकर्णी (Sonali Kulkarni) सध्या अतिशय कठीण प्रसंगातून जात आहे. पडद्यावर नेहमी आत्मविश्वासाने झळकणाऱ्या या अभिनेत्रीच्या आयुष्यात दुःखाची सावली दाटून आली आहे. तिच्या अत्यंत जिवलग असलेल्या चुलत भावाचे, अनिरुद्धचे निधन झाल्याने कुलकर्णी कुटुंबावर शोककळा पसरली आहे. अनिरुद्धच्या अचानक जाण्याने सोनाली पूर्णपणे हादरली आहे. भावाशी असलेले जिव्हाळ्याचे नाते, त्याच्या आठवणी आणि त्याचा निरागस स्वभाव यामुळे हा धक्का तिच्यासाठी असह्य ठरत आहे. आपल्या भावना शब्दांत मांडताना तिने सोशल मीडियावर अत्यंत हळवी पोस्ट शेअर केली.(Sonalee kulkarni Brother Death)

त्या पोस्टमध्ये तिने म्हटलंय की, “आमचा अन्नूमा… हे जग सोडून तू एका चांगल्या ठिकाणी निघून गेलास. तुझ्या आत्म्याला शांती लाभो. तिकडे वेदनारहित नवीन आयुष्य मिळो. अध्यात्मिक, निरागस आणि जीव लावणारा असा मला माहीत असलेला सर्वात निर्मळ मनाचा व्यक्ती तू होतास. तुझं प्रत्येकासोबत छान नातं होतं. सगळ्यांवर निस्वार्थ प्रेम केलंस. सगळी गाणी तुला माहीत होती. तबला अगदी छान वाजवायचास…आणि तुझ्या हातचा चहा… तू जसा होतास तसाच राहिलास आणि सगळ्यांना प्रेम दिलंस. तुझ्यावर नेहमीच प्रेम करत राहू. ओम शांती”.

या शब्दांतून तिच्या मनातील वेदना आणि भावावरील अपार प्रेम स्पष्ट जाणवत आहे. चाहत्यांनीही या पोस्टवर मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया देत अनिरुद्धला श्रद्धांजली अर्पण केली आहे. अनेकांनी सोनालीला धीर देत, या कठीण काळात ती मजबूत राहावी अशी प्रार्थना व्यक्त केली आहे.(Sonalee kulkarni Brother Death)
================================
================================
करिअरमध्ये अनेक यशस्वी चित्रपट देणारी आणि विविध भाषांमध्ये काम करून स्वतःचं स्थान पक्कं करणारी सोनाली खंबीर स्वभावासाठी ओळखली जाते. मात्र, कुटुंबातील या दुःखद घटनेने ती भावनिकरित्या कोलमडल्याचं दिसत आहे. सध्या तिच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, चाहत्यांकडून सतत सांत्वनाचा ओघ सुरू आहे.