Ranbir-Alia ने ‘राहा’ला गिफ्ट केलेल्या घराच्या नावाची खासियत आहे तरी

Sonali Bendre : शर्मिला ठाकरेंचा फोन आणि ‘ती’ अट;काय घडलं Michael Jacksonच्या स्वागतावेळी?
मायकल जॅक्सनचे (Michael Jackson) जगभरात चाहते आहेतच पण भारतात विशेष फॅन क्लब जॅक्सनचा आहे. १९९६ मध्ये मायकल जॅक्सन ‘World Tour’ वर होता त्यादरम्यान तो भारतात आला असता त्याचं जंगी स्वागत करण्यात आलं होतं. यावेळी त्याच्या स्वागताला अख्ख्या बॉलिवूडमधून केवळ अभिनेत्री सोनाली बेंद्रे (Sonali Bendre) ही राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यासोबत एअरपोर्टवर गेली होती. आता तब्बल २९ वर्षांनी सोनालीने मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यापूर्वी एक अट घातली होती ती काय होती याचा खुलासा केला आहे.(Bollywood news)

सोनाली बेंद्रे हिने नुकत्याच एका मुलाखतीमध्ये राज ठाकरे आणि तिच्या नात्याबद्दल खुलासा केला होता. त्यासोबतच १९९६ साली मायकल जॅक्सनच मुंबईत स्वागत करण्यापूर्वी तिने काय अट घातली होती याबद्दल बोलताना सोनाली म्हणाली की, राज ठाकरे यांची बायको शर्मिला ठाकरे (Sharmila Raj Thackeray) यांनी मायकल जॅक्सनच्या स्वागतासाठी येण्यासंदर्भात संपर्क साधला होता. “राज ठाकरेंच्या बायकोने मला फोन केला. तुला यावेच लागेल आणि मायकल जॅक्सनचं स्वागत करावंच लागेल, असं त्यांनी सांगितलं. त्यावर मी मला त्याच्या शोची तिकीटं हवी आहेत. तिकीटं मिळाली तरच मी त्याचं स्वागत करेन अशी मी अट घातली”,अर्थात अट पूर्ण झाली आणि सोनाली बेंद्रे हिने मुंबई विमानतळावर मायकल जॅक्सन याचं नऊवारी नेसून अगदी मराठमोळ्या संस्कृतीप्रमाणे टिळा लावून जंगी स्वागत केलं. (Pop Music Culture and Michael Jackson)
================================
हे देखील वाचा: Sonali Bendre हिने अखेर तिच्या आणि राज ठाकरे यांच्या नात्याबद्दल मौन सोडलं!
=================================
मायकल जॅक्सन याने जगभरात असंख्य कॉन्सर्ट्स केले. पण आजही १९९६ मध्ये मुंबईत त्याच्या झालेल्या म्युझिक कॉन्सर्टची विशेष आठवण काढली जाते. पॉपच्या या बादशहाने १ नोव्हेंबर १९९६ रोजी भारतात त्याचा एकमेव लाईव्ह शो सादर केला. स्मार्ट फोन, सोशल मिडियाच्या आधीचा जरी तो काळ असला तरी मायकल जॅक्सनच्या त्या कॉन्सर्टची लोकप्रियता इतकी होती की त्यावेळी ३५००० पेक्षा अधिक लोकांनी गर्दी केली होती.(Entertainment news)