Shubhvivah मालिकेत चिन्मय उद्गीरकरची एंट्री; आकाशच्या जीवासाठी भूमी करणार संघर्ष

Sonali Bendre : डॉक्टरने वेस्टर्न कपडेच का घातले पाहिजे? ‘हम साथ साथ है’ वेळी अभिनेत्रीचा दिग्दर्शकाला सवाल!
हिंदीत कौटुंबिक चित्रपटांचे जादूगर म्हणजे सूरज बडजात्या. ‘हम आपके है कौन?’, ‘हम साथ साथ है’, ‘विवाह’ असे अनेक कौटुंबिक आणि आपल्या संस्कृतीला सेलिब्रेट करणारे चित्रपट त्यांनी दिले. त्यापैकी एक गाजलेला चित्रपट म्हणजे ‘हम साथ साथ है’. या मल्टिस्टारर चित्रपटात कोणताही कलाकार दुसऱ्या कलाकाराचा अभिनय मागे पडू देणार नाही याची विशेष काळझी सूरज यांनी घेतलेली नक्कीच दिसली. सोनाली बेंद्रे (Sonali bendre) हिने साकारलेली प्रिती म्हणजे आजच्या काळातील मॅरेज मटेरियल मुलगी. या चित्रपटातील सोनालीचा अभिनय, तिचं सौंदर्य, लाघवीपणा खरंच इतका मनमोहक होता की आजही तो चित्रपट आणि तिची भूमिका तितकीच टवटवीत वाटते. पण तुम्हाला माहित आहे का सोनालीने या चित्रपटासाठी एक खास अट ठेवली होती. काय होती जाणून घेऊयात..(Hum sath Sath Hain movie)

तर, ‘हम साथ साथ है’ चित्रपटात सोनालीच्या तोंडी संवाद अगदी हातावर मोजण्याइतकेच होते. पण तिचा अभिनया त्या पलीकडे आऊटस्टॅंडिंग होता. १९९९ साली आलेल्या या आयकॉनिक चित्रपटात काम करण्यापूर्वी सोनाली बेंद्रेने एक अट घातली होती. त्याचा खुलासा तिने नुकत्याच ‘बॉलीवूड बबल’ला दिलेल्या मुलाखतीत केला. ‘हम साथ साथ हैं’ चित्रपटातील भूमिकेबाबत म्हणाली, “त्या काळात माझे केस सरळ असायचे, क्रॉप टॉप व जीन्सवर मी पैंजण घालायचे. माझं नाक टोचलेलं होते आणि मी नोज रिंग घालायचे. जेव्हा मी शूटिंग करत नसायचे, त्यावेळी मी याच लूकमध्ये राहायचे. मी जीन्स जरी घातली असेल तरी त्यावर मी पारंपरिक भारतीय दागिने घालायचे.” (Entertainment)

सोनाली पुढे म्हणाली की, “मी सूरज बडजात्यांना भेटले तेव्हा मी पांढऱ्या रंगाचा सलवार-कुर्ता परिधान केला होता. मी त्यावेळी शूटिंग करीत नव्हते, त्यामुळे मी नोज रिंग घातलीच होती. पण, सूरज बडजात्या यांनी मला सांगितलं की, तु साकारणारी भूमिका एका डॉक्टरची आहे. त्यामुळे तिने पाश्चात्त्य पद्धतीचा पेहराव केला पाहिजे. जेव्हा मी चित्रपटाची पटकथा ऐकली, त्यावेळी मला असं वाटलं की, या पात्राने भारतीय पारंपरिक कपडे परिधान केले पाहिजेत. कारण- ती मुलगी एका भारतीय कुटुंबातील आहे. जरी ती डॉक्टर होण्यासाठीचं शिक्षण घेत असली तरी तिने पाश्चात्त्य पद्धतीचे कपडे का परिधान केले पाहिजे? असा प्रश्न मला पडला.” (Bollywood classic movies untold stories)

पुढे सोनाली म्हणाली की, “मी सूरज बडजात्यांना त्याबद्दल सांगितलं, तर त्यांनी त्यावर सहमती दर्शवली. मात्र, त्यांनी माझ्यापुढे एक अट ठेवली. ते म्हणाले होते की, जरी तू या भूमिकेसाठी भारतीय पद्धतीचे कपडे परिधान केलेस तरी तू ही नोज रिंग शूटिंगदरम्यान वापरशील, असे मला वचन दे. त्यावर मीदेखील होकार दिला होता”. (Bollywood news)
================================
हे देखील वाचा: ‘या’ रुपात माधुरी हवी होती असं आता वाटतंय का?
=================================
१९९९ साली आलेल्या ‘हम साथ साथ है’ चित्रपटाला रिलीज होऊन २६ वर्ष झाली आहेत. या चित्रपटात रीमा लागू, सलमान खान, तब्बू, नीलम कोठारी, सोनाली बेंद्रे, करिश्मा कपूर, सैफ अली खान, मोहनीश बहल, आलोक नाथ, सतीश शाह, सदाशिव अमरापुरकर अशी तगडी कलाकारांची फौज होती. (Hum Sath Sath Hain movie cast)