
“‘दशावतार’ हा मराठी चित्रपटसृष्टीसाठी अत्यंत अभिमानास्पद…”; Sonali Bendre हिची खास पोस्ट
२०२५ या वर्षात मराठी चित्रपटसृष्टीतून बरेच कमाल चित्रपट आपल्या भेटीला आले. यापैकीच एका चित्रपटाने थेट ऑस्करपर्यंत मजल मारली आहे. सुबोध खानोलकर दिग्दर्शित ‘दशावतार’ (Dashavatar Movie) चित्रपटाची ऑस्करसाठी निवड झाली असून जगभरातून या चित्रपटाचं आणि बाबूल मेस्त्री ही भूमिका साकारणाऱ्या दिलीप प्रभावळकरांचं विशेष कौतुक केलं जात आहे. आता अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिने देखील सोशल मिडियावर खास पोस्ट करत चित्रपटाच्या टीमचं खास अभिनंदन केलं आहे.

९८ व्या ऑस्कर पुरस्कारांच्या मुख्य स्पर्धेत या दशावतार चित्रपटाची अधिकृत निवड झाली आहे. जगभरातील हजारो चित्रपटांतून निवडल्या गेलेल्या १५० चित्रपटांमध्ये स्थान मिळवणारा हा एकमेव मराठी चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाबद्दल सोनाली बेंद्रेने स्टोरी शेअर करत लिहिलं आहे की,” ‘दशावतार’ हा मराठी चित्रपटसृष्टीसाठी अत्यंत अभिमानास्पद आणि खास असा क्षण आहे. आपल्या संस्कृतीशी घट्ट नातं असणारी आणि दिलीप प्रभावळकरजींनी अत्यंत मनापासून व संवेदनशीलतेने साकारलेली भूमिका मनाला भावली. आपली कला,परंपरा आणि प्रतिभेची सुंदर आठवण करून देणारी ही एक हृदयस्पर्शी गोष्ट आहे.” (Sonali Bendre Post)

पुढे सोनाली हिने दिग्दर्शकाला शुभेच्छा देत लिहिलं आहे की, “दिग्दर्शक सुबोध खानोलकर आणि संपूर्ण टीमचं खूप खूप अभिनंदन.ऑस्करच्या स्पर्धेत स्थान मिळवणं हा एक अत्यंत अभिमानास्पद क्षण आहे.”अशा भावना तिने व्यक्त केल्या आहेत. दशावतारने प्रेक्षकांची मनं केवळ महाराष्ट्रातच नाही तर साऊथमध्येही जिंकली असून हा चित्रपट मल्याळम भाषेत डब करत प्रदर्शित झाला आहे. एखादा मराठी चित्रपट मल्याळम भाषेत डब होऊन रिलीज होण्याची ही पहिलीच वेळ आहे. (Marathi Movies 2025)
================================
हे देखील वाचा : Dashavatar Film : कोकणातील ‘दशावतार’ बॉक्स ऑफिसवर गाजला…
================================
दरम्यान, जागतिक स्तरावर आपली ओळख निर्माण करणाऱ्या ‘दशावतार’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २८ कोटींचा टप्पा पार केला आहे. या चित्रपटात दिलीप प्रभावळकरांसह सिद्धार्थ मेनन, प्रियदर्शनी इंदलकर, सुनील तावडे, महेश मांजरेकर, भरत जाधव, अभिनय बेर्डे, आरती वडगबाळकर, रवी काळे आणि विजय केंकरे यांसारख्या दिग्गज कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. (Dilip Prabhavalkar Movies)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi