Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    sulochana chavan

    Sulochana Chavan : हिंदी चित्रपटातील लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचा स्वर!

    Dosti

    Dosti : मैत्रीच्या नात्याची भावस्पर्शी संगीतमय कहाणी!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Manik Moti Marathi Book: गायिका माणिक वर्मा यांच्यावरील श्री. शोभा बोंद्रे लिखित ‘माणिक मोती’ चरित्र

Ek Tichi Gosht: नृत्य,संवाद आणि अभिनय यांचा उत्तम मिलाफ असलेली ‘एक तिची

War 2 : ह्रतिक रोशनचा चित्रपट रिलीजआधीच कमावणार १२० कोटी?

Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत

Prateik Smita Patil : “….नाहीतर आज फरहान अख्तर माझा सावत्र

Virat Kohli : “विराटसोबत शूट करताना खूप निर्बंध, खूप सुरक्षा”;

Aata Thambayach Naay : चित्रपटाने इतिहास घडवला; सगळीकडे लागले हाऊसफुल्लचे

Virat Kohli : “या प्रवासात तुझी प्रगती होताना पाहणं म्हणजे

‘ना थमेगा कभी, ना मुड़ेगा कभी…’ अखेर १९ दिवसानंतर Amitabh

‘वामा लढाई सन्मानाची’ चित्रपटातील Kailas Kher यांच्या आवाजातील टायटल साँग

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

दीक्षा केतकर : न्यूयॉर्क ते मुंबई प्रवास

 दीक्षा केतकर : न्यूयॉर्क ते मुंबई प्रवास
टीव्ही वाले मिक्स मसाला

दीक्षा केतकर : न्यूयॉर्क ते मुंबई प्रवास

by गणेश आचवाल 10/04/2021

सध्या सोनी मराठीवर ‘तू सौभाग्यवती हो’ ही नवी मराठी मालिका सुरु झाली आहे. त्यात ‘ऐश्वर्या’ ही प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजे दीक्षा केतकर. तिने फर्ग्युसन कॉलेजमधून पदवी मिळवल्यानंतर न्यूयॉर्क येथील ‘दि ली स्ट्रेसबर्ग थिएटर अँड फिल्म इन्स्टिट्यूट’ मधून एम एफ ए अर्थात मास्टर ऑफ फाईन आर्ट ही पदवी मिळवली. दीक्षाला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. कॉलेजला देखील अनेक एकांकिका स्पर्धातून ती सहभागी झाली होती ‘मृगदर्पण’ या प्रायोगिक नाटकात देखील तिची भूमिका असून या नाटकासाठी  २०१५ मध्ये झी गौरव सोहळ्यात तिला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचे नामांकन मिळाले होते.

न्यूयॉर्क मधून प्रशिक्षण घेऊन आल्यानंतर ती आय टी ए या संस्थेत अभिनयाचे प्रशिक्षण सुद्धा विद्यार्थ्यांना देत असे. पुण्यातील ‘थियट्रॉन’ या नाट्यसंस्थेतर्फे सुद्धा तिने नाटकातून भूमिका केल्या आहेत. त्यात ‘डावीकडून चौथी बिल्डिंग’ मध्ये तिची भूमिका होती. ‘तू सौभाग्यवती हो’साठी दीक्षाने ऑडिशन दिली, मग लूक टेस्ट झाली आणि मग तिला या मालिकेत ‘ऐश्वर्या’ ही भूमिका साकारण्याची संधी मिळाली. दीक्षा म्हणते, “ऐश्वर्या ही एका छोट्याशा गावातील मुलगी आहे. ती स्वभावाने अल्लड आहे. तिचे तिच्या सावत्र आईशी सुद्धा उत्तम नातं आहे. हे नातं अगदी मैत्रिणीसारखे आहे. तिचे प्राण्यांवर सुद्धा खूप प्रेम आहे. अशी अल्लड, प्रेमळ, निरागस मुलगी साकारताना खूप चांगले वाटत आहे.

 Deeksha Ketkar Family
Deeksha Ketkar Family

मनवा नाईक या ‘तू सौभाग्यवती हो’ मालिकेच्या निर्मात्या आहेत. या मालिकेच्या निमित्ताने हरीश दुधाडे, ज्योती चांदेकर या कलाकारांबरोबर काम करताना खूप चांगले वाटत आहे, सेटवर वातावरण देखील खूप खेळीमेळीचे असते, असेही तिने सांगितलं. दीक्षा ही सुप्रसिद्ध अभिनेता शशांक केतकर याची बहीण आहे. शशांक कडून काही टिप्स घेतेस का? असे विचारल्यावर ती म्हणाली, “आम्ही कधीच एकमेकांना कोणत्या बाबतीत टिप्स देत नाही. पण मला या मालिकेत काम  मिळाले, याचा शशांकला अर्थातच आनंद झाला आहे आणि या क्षेत्रात मी करिअर करणार, या गोष्टीला त्याचा भाऊ या नात्याने कायमच पाठिंबा असेल.”

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actress Entertainment marathi actress Television
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.