Housefull 5 OTT: थिएटर्सनंतर आता ओटीटीवर झळकणार ‘हाउसफुल 5’; जाणून घ्या, कधी आणि कुठे

Chidiya Movie: ‘चिडिया’ या हिंदी चित्रपटाचे विशेष स्क्रीनिंग !
आजवर अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरविलेला “चिडिया” (Chidiya) हा चित्रपट येत्या ३० मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरला सोशल मीडियावर रसिक प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नुकतेच या चित्रपटाचे विशेष स्क्रिनिंग सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्यासाठी रविंद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी येथे आयोजित करण्यात आले होते. (Chidiya Hindi Movie 2025)

बालपणातील स्वप्न आणि संघर्ष याच प्रभावी चित्रण या चित्रपटातून दाखविण्यात आले असून अतिशय उत्तम असा चित्रपट झाल्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार (Shri. Asish Shelar) यांनी सांगितले तसेच चित्रपट सगळ्यांनी चित्रपट आवर्जून पहावा असे आव्हान करुन चित्रपटाच्या यशसाठी टीमला शुभेच्छा दिल्या.

“चिडिया” (Chidiya) ही मुंबईच्या चाळीत रचलेली एक सुंदर कथा असून मुलांची निरागसता आणि स्वप्न पुर्ण करण्याची जिद्द यात दाखवण्यात आली आहे. हृदयस्पर्शी कथा असलेल्या या चित्रपटाने जगभरातील प्रमुख आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये प्रेक्षकांची दाद मिळवली आहे. (Chidiya Hindi Movie 2025)
====================================
====================================
या चित्रपटात विनय पाठक,(Vinay Pathak) अमृता सुभाष (Amruta Subhash), श्रेयस तळपदे (Shreyas Talpade), इनामूल हक, ब्रिजेंद्र काळा यांच्या उत्कृष्ट बालकलाकार स्वर कांबळे, आयुष पाठक आणि हेतल गडा यांच्या प्रमुख भूमिका आहेत.