Anandi New Serial: जिद्द आणि सकारात्मकतेने आयुष्याचा सामना करणारी ‘आनंदी’

Spirit Movie : प्रभासच्या चित्रपटाचा ऑडियो टीझर रिलीज; विवेक ऑबरॉयचंही नशीब पालटणार…
‘बाहुबली’, ‘सलार’, ‘कल्की’ असे सुपरहिट चित्रपट देणारा प्रभास (Prabhas) आता पुन्हा एकदा एका नव्या भूमिकेसह प्रेक्षकांना आपल्या अभिनयाच्या जाळ्यात ओढायला तयार झाला आहे… संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ‘स्पिरिट’ चित्रपटाची खरं तर बऱ्याच महिन्यांपासून चर्चा सुरु होती… अखेर या चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांसमोर आली आहे… २३ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रभासच्या वाढदिवशी ‘स्पिरिट’ चित्रपटाचा पहिला प्रोमो रिलीज करण्यात आला असून यात केवळ संवादच्या रुपात प्रभासचं कॅरेक्टर बिल्डअप करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे… (Spirit Movie promo)

‘स्पिरिट’च्या या ऑडिओ टीझरमध्ये प्रभाससह केवळ चित्रपटातील काही महत्वाच्या व्यक्तिरेखांचे आवाज ऐकायला येतात… प्रभास त्याच्या व्यक्तिरेखेची एक अत्यंत गंभीर वाईट सवय सांगताना दिसतो. प्रभास म्हणतो की, “माझी वाईट सवय ही आहे की… मला गोष्टींचं लगेच व्यसन लागतं. ते दारू असो, सिगारेट असो किंवा मुली. मी पटकन त्यांच्या आहारी जातो आणि तितक्याच लवकर त्यातून बाहेरही पडतो. पण यावेळेस समस्या ही आहे की, मला अशा गोष्टीचं व्यसन लागलं आहे, जे मी सोडू शकत नाही.” आता प्रभासला नेमकं कसलं व्यसन लागलंय, हे ‘स्पिरीट’ रिलीज झाल्यावरच कळेल. (Telugu Movies)
================================
हे देखील वाचा : Deepika Padukoneचा ‘कल्की २’ मधून पत्ता कट; दीपिकाच्या करिअरला उतरती कळा लागली?
================================
मुळात तेलुगू भाषेतील हा चित्रपट असून या चित्रपटाच्या निमित्ताने बऱ्याच वर्षांनी विवेक ऑबरॉय (Vivek Oberoi) तेलुगू चित्रपटात दिसणार आहे… प्रभाससोबत स्क्रिन शेअर करणाऱ्या विवेकची स्पिरिटमध्ये कोणती भूमिका साकारणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र, दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगाने ‘ॲनिमल’च्या माध्यमातून बॉबी देओलच्या करिअरला दिलेली वेगळी कलाटणी आता विवेक ऑबरॉयच्या बाबतीतही घडणार असं लोकं म्हणत आहेत…

तसेच, स्पिरिट चित्रपटात प्रभाससोबत आधी दीपिका पादूकोण (Deepika Padukone) दिसणार होती… मात्र, काही अचणींमुळे तिचा या चित्रपटातील पत्ता कट झाला… आता तिच्या जागी तृप्ती डिमरी (Tripti Dimri) दिसणार आहे… दरम्यान, स्पिरिटच्या ऑडियो टीझरमधून या चित्रपटात प्रभास पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसेल असा अंदाज लावला जात आहे… या चित्रपटात प्रकाश राज, कांचना यांच्या देखील महत्वाच्या भूमिका असणार आहेत… २०२६ मध्ये हा तेलुगू पॅन इंडिया चित्रपट हिंदी, तमिळ, मल्याळम आणि कन्नडा भाषेत रिलीज होणार आहे… (Prabhas Movies)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi