Madhuri Dixit : सलमान-शाहरुख नव्हे तर ‘या’ अभिनेत्यासोबत सर्वाधिक चित्रपटात

Reema Lagoo : बॉलिवूडच्या ‘कूल आई’ला पाहून श्रीदेवीलाही वाटायची भीती!
हिंदी चित्रपटांमध्ये अनेक मराठी अभिनेत्रींनी अजरामर भूमिका साकारल्या आहेत. अगदी स्मिता पाटील, माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) , अमृता सुभाष, सोनाली बेंद्रे, सोनाली कुलकर्णी अशा अभिनेत्रींनी आजवर एकाहून एक दर्जेदार चित्रपट केले असून सोबतच्या हिंदीतील दिग्गज अभिनेत्रींनाही मागे टाकलं आहे. याच यादीत अग्रस्थानी येणारं नाव म्हणजे रिमा लागू (Reema Lagoo). सहसा आई हे पात्र म्हणजे सोशिक, रडणारी ही इमेज बदलून रिमा लागू यांनी हिंदीत कुल आई हा टॅग मिळवला. मराठी रंगभूमी, चित्रपट, मालिका गाजवणाऱ्या रिमा लागू किती ताकदीच्या अभिनेत्री होत्या हे सर्वांनाच माहित आहे. पण तुम्हाला माहित आहे का बॉलिवूडच्या एका दिग्गज अभिनेत्रीला चक्क रिमा लागूंमुळे complex आला होता. कोण होती ही अभिनेत्री आणि तिने काय केलं होतं वाचा… (Untold story)

रिमा लागू यांना अभिनयाचं बाळकडू घरातूनच मिळालं. त्या आई मंदाकिनी या ज्येष्ठ अभिनेत्री होत्या. त्यांच्याकडे पाहूनच अभिनय ही कला रिमा लागूंच्या अंगी भिनली ती अगदी शेवटच्या श्वासापर्यंत. रिमा यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत १०० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये कामं केली. त्यापैकी जवळपास २५ चित्रपटांमध्ये रिमा यांनी आईची भूमिका साकारली आहे. सर्वाधिक वेळा सलमान खानच्या आईचं काम केलेल्या रिमा लागू यांनी अजय देवगण, काजोल, करिश्मा कपूर, माधुरी दीक्षित यांच्याही आईची भूमिका केली होती. या व्यतिरिक्त एका चित्रपटामध्ये चक्क रिमा लागू यांनी श्रीदेवी (Sridevi) यांच्याही आईचं काम केलं होतं. तो चित्रपट होता ‘गुमराह’ (Gumraah).

१९९३ साली आलेल्या ‘गुमराह’ या चित्रपटात रिमा यांनी श्रीदेवींच्या आईची भूमिका केली होती. रिमा यांनी कायम सहायय्क भूमिका केल्या पण त्यांनी प्रत्येक भूमिकेत जीव ओतून काम केलं. त्यांच्या अभिनयामुळे खरं तर बऱ्याच कलाकारांना शिकताही येत होतं आणि कॉम्पलेक्सही येत होता. बऱ्याचदा त्यांच्या अभिनयापुढे प्रमुख कलाकाराचा अभिनय किंवा त्यांची भूमिका झाकोळली जात होती. आणि असंच काहीसं घडलं होतं ‘गुमराह’ या चित्रपटावेळी. या चित्रपटात रीमा यांना अभिनेत्री श्रीदेवीच्या आईची भूमिका साकारायची होती.

दरम्यान, चित्रपटाच्या शुटींगवेळी असं म्हटलं गेलं होतं की रिमा यांचा जबरदस्त अभिनय पाहून श्रीदेवी देखील Insecure झाल्या होत्या. आणि म्हणूनच श्रीदेवी यांनी चित्रपटातील रिमा यांच्या भूमिकेला अनेक ठिकाणी कात्री लावली होती. आपल्यापेक्षा रिमा यांचा अभिनय ताकदीचा होत असल्याचं लक्षात आल्यानंतर श्रीदेवींनी निर्मात्यांना सांगून त्यांचे काही सीन्स कट केले होते. कारण त्यावेळी श्रीदेवी चित्रपटात असणं म्हणजे चित्रपट हिट होणार हे समीकरण पक्कं होतं. आणि याचमुले कोणताही निर्माता त्यांना नकार देत नव्हता. शिवाय बॉलिवूडमधील श्रीदेवी या पहिल्या अभिनेत्री होत्या ज्यांनी १ कोटींच्या मानधनाची मागणी केली होती. पण रिमा लागूंच्या अभिनेत्रीमुळे बॉलिवूडची क्वीन श्रीदेवी देखील Insecure झाली होती हा किस्सा खरंच अविस्मरणीय आहे. (Entertainment gossip news)
==============
हे देखील वाचा : Sridevi : ‘या’ सिनेमातील ‘तांडव’ नृत्य करायला श्रीदेवी का तयार नव्हत्या ?
==============
दरम्यान, रिमा लागू यांनी ‘मैने प्यार किया’, ‘हम आपके है कौन’, ‘कुछ कुछ होता है’, ‘कयामत सें कयामत तक’, ‘कल हो ना हो’, यासारख्या अनेक चित्रपटांमधून शाहरुख खान (Shah Rukh Khan), सलमान खान, काजोल, जुही चावला यांच्या ‘ग्लॅमरस आई’ची भूमिका साकारली होती. १९८८ साली कयामत से कयामत तक या चित्रपटात जुही चावलाच्या आईची भूमिका रिमा लागू यांनी पहिल्यांदा साकारली आणि त्यानंतर त्यांच्या वाट्याला आलेल्या प्रत्येक आईच्या भूमिकेत रिमा लागू यांनी वेगळेपण प्रेक्षकांना दिलं. (Bollywood gossips)

रिमा लागू यांच्या चित्रपटांबद्दल सांगायतं झालं तर ‘हमारा खांदान’, ‘साजन’, ‘छोटी बहू’, ‘कानुन’, ‘प्रेम ग्रंथ’, ‘माहिर’, ‘कुछ कुछ होता है’, ‘गद्दार’, ’कल हो ना हो’ अशा अनेक हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी कामं केली. (Reema Lagoo movies)
रसिका शिंदे-पॉल