
Bollywood : १ कोटी फी घेणारी पहिली अभिनेत्री; सलमान, शाहरुखलाही तिने टाकलेलं मागे
चंदेरी दुनिया अर्थात चित्रपसृष्टी म्हटलं की लाखो करोडोंची फलाढाल ही आलीच शिवाय जितके प्रसिद्ध कलाकार तितकी त्यांची एका चित्रपटाची फी देखील आली. ९०च्या दशकात हिंदी चित्रपसृष्टीत खान्सचा बोलबाला होता. सलमान खान (Salman Khan), शाहरुख खान, आमिर खान अगदी सैफ अली खान सुद्धा. एका एका चित्रपटासाठी हे अभिनेते ६०-७० लाखांच्या घरात फी घेत होते. पण तुम्हाला माहित आहे का या सगळ्यांना मागे टाकत एका अभिनेत्रीने चक्क १ कोटी प्रत्येक चित्रपटासाठी तिची फी आकारली होती. कोण होती ती अभिनेत्री जाणून घेऊयात. (Bollywood News)
तर, मुळात हिंदी असो किंवा अन्य कोणत्याही भाषेतील चित्रपसृष्टी असो स्त्री-पुरुपष हा भेभाव पैश्यांच्या बाबताती होत होताच आणि कदाचित आताही होतो. आजही हा मुद्दा वादाचा आहेच. पण तरीही या वादापलिकडे जात अभिनेत्री श्रीदेवी (Sridevi) यांनी काही अंशी पुरुष प्रधान असणाऱ्या या इंडस्ट्रीत आपलं अनोखं स्थान निर्माण करत चक्क १ कोटी फी चित्रपटांसाठी आकारण्यास सुरुवात केली होती. १९९२ ते १९९७ या काळात सर्वाधिक मानधन घेणाऱ्या त्या एकमेव भारतीय अभिनेत्री होत्या. आणि बॉलिवूडमध्ये रिटायर्ड होण्यापर्यंत त्या सर्वाधिक फी घेत होत्या. २०१७ साली ‘मॉम’ हा त्यांनी शेवटचा चित्रपट प्रेक्षकांना दिला होता.

श्रीदेवी (Bollywood News) या ऑफ स्क्रिन आणि ऑन स्क्रिन पारच वेगळ्या होत्या. कॅमेऱ्याचा कट झाला की शांत, आपल्या कोषात राहणाऱ्या श्रीदेवी अॅक्शन म्हटलं की एका वेगळ्याच अवतारात दिसायच्या. मग तो नागिन, जुदाई, मिस्टर इंडिया, चालबाज, इंग्लिश विंग्लिश किंवा इतर दाक्षिणात्य चित्रपट असो. Amitabh Bachchan, रजनीकांत, सनी देओल, अनिल कपूर, जितेंद्र, राजेश खन्ना, ऋषी कपूर अशा अनेक हिंदी आणि साऊथच्या सुपरस्टार्स सोबत स्क्रिन शेअर कर त्यांनी प्रेक्षकांच्या नजरा केवळ त्यांच्यावर खिळवून ठेवल्या होत्या. (Entertainment Masala)
===========
हे देखील वाचा : Sridevi : ‘या’ सिनेमातील ‘तांडव’ नृत्य करायला श्रीदेवी का तयार नव्हत्या ?
===========
अभिनय,नृत्य., सौंदर्य अशा विविध कलागुणांनी ओतप्रोत भरलेल्या श्रीदेवी (Sridevi) यांची या जगातून झालेली आकस्मिक एक्झिट आजही पचवतां येत नाही. २४ फेब्रुवारी २०१८ रोजी त्यांचं निधन झालं. पण आजही श्रीदेवी यांच्यासरखी मल्टीटॅलेंटेन्ड अभिनेत्री इंडस्ट्रीला मिळाली नाही यात शंकाच नाही. श्रीदेवी यांनी तमिळ, तेलुगू, कन्नडा भाषेतही चित्रपट केले पण तुम्हाला माहित आहे का? ‘ज्युरासिक पार्क’ (Jurassic park)या हॉलिवूड चित्रपटात Steven Spielberg यांनी त्यांना काम करण्याची ऑफर दिली होती जी श्रीदेवींनी नाकारली होती. श्रीदेवींनी बाल कलाकार म्हणून ‘राणी मेरा नाम’ या चित्रपटातून पदार्पण केले. आणि त्यानंतर एकामागून एक सुपरहिट चित्रपटांची मालिका त्यांनी दिली.